' दारूचा जन्म कसा झाला माहितीये? दारूच्या उगम व निर्मितीची रोचक कहाणी! – InMarathi

दारूचा जन्म कसा झाला माहितीये? दारूच्या उगम व निर्मितीची रोचक कहाणी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

दारू म्हटलं की आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटतं. परंतु आपल्या प्राणाहून प्रिय असलेल्या दारूची निर्मीती कशी झाली? कोणी लावली दारू प्यायची सवय? खरंच दारू म्हणजे अमृत आहे का, की नुसतं रसायन?

या सगळ्या गोष्टी जाणून घेणं आपल्यासाठी कुतूहलाचा विषय नक्कीच आहे शिवाय दारू घर संसारांची कशी राखरांगोळी करते हे पण जाणून घेतलंच पाहीजे ना !

असं म्हटलं जातं की दारूची निर्मीती सुमारे ९ हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये झाली. ही दारू म्हणजे वाईन आंबवलेल्या तांदळाचं पाणी आणि मधाची मिसळ असायची.

२ हजार वर्षांनंतर ही दारू युरोपीय देशातही निर्मीली जाऊ लागली. पुरातत्वीय उत्खननात इतक्या वर्षांनंचतर सुध्दा दारू बनवण्याचं साहित्य आणि दारूच्या साठ्यांसाठी बनवलेली विशेष भांडी सापडलीत.

अशाच काही प्रकारची उत्खनने युरोपीय देश, पश्चिम आशिया या ठिकाणी केली असता तिथेही दारूचं अस्तित्व असल्याचं जाणवतं. परंतु दारूची खरी सवय ही चीनने साऱ्या जगाला लावली.

 

wine-inmarathi
en.wikipedia.org

इसवी सन पूर्व ७०००-६६०० मध्ये चीनमध्ये दारूची निर्मीती केली जायची याचे भक्कम पुरावे आपल्याला पहायला मिळतात.

तांदूळ,मध आणि टार्टारिक एसिड असणारी काही फळांचा वापर करून ही दारू बनवली जायची. जी तेव्हा घरातील सर्रास प्रत्येकजण प्राशन करत असे.

द्राक्षांच्या बीया, हॉथर्न, लाँगयान किंवा कॉर्लियान चेरी यांच मिश्रण अथवा या फळांपैकी कोणत्याही दोघांचं मिश्रण बनवून वाईन तयार केली जायची.

चीनच्या झोऊ डायनॅस्टी या प्रांतात इसवी सन पूर्व १०४६ ते २२१ या कालखंडात ही फळे वापरल्याचे पुरावे सापडतात. चीनमध्ये केवळ वाईनसाठीचे ४० ते५० प्रकारचे द्राक्ष वापरल्याचे पुरावे मिळतात.

इसवीसन ५४०० ते ५००० मध्ये पूर्वी आशियामध्ये दारू अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळतात. दारूसाठी बनवलेले मोठे मोठे जार आजही अस्तित्वात आहेत.

युरोपीय देशात प्रामुख्याने ग्रीस आणि फ्रांसमध्ये सुमारे १० ते १२ हजार वर्षांपूर्वी दारू अस्तिवात असल्याच्या कथा आहेत मात्र केवळ इसवीसन पूर्व ४०००वर्षांपूर्वीचेच पुरावे इथे पाहायला मिळतात.

फ्रान्समध्ये प्रामुख्याने दारू ही द्राक्षांपासूनच बनवली जायची. त्यामुळे पुरावे जर पाहिले तर सगळ्यात आधी दारूडा देश कोणता होता तर चीन असं म्हणायला हरकत नाही.

भारतामध्येसुधा पुराण कथांमध्ये मदिरेचा उल्लेख आढळतो. दारू पिऊन नशेत झुलणारे मालिकांमधले राक्षस आणि देवता अजूनही डोळ्यासमोर उभे राहतात अर्थात झुलत- झुलत. याचाच अर्थ भारत देखील दारू निर्मीतीत मागे नव्हता. पुर्वी दारू हे विरंगुळ्याचं किंवा थकावट दूर करण्याचं साधन होतं.

 

Wine taste better with age.Inmarathi1
nzwine.com

परंतु आज दारू हे व्यसन बनल्यामुळे समाजाचं स्वास्थ्य बिघडत चालल्याचं आपण आपल्या डोळ्यांनी पाहतोय. उच्चभ्रू समाजासाठी महागडी दारू आणि वाईन मिळते तर अगदीच चिंधीचोर दारूड्यासाठीसुध्दा पाचची देशी हातभट्टी मिळते. मोठ मोठे दारूचे ब्रँड आपण पाहतो. हे ब्रँड दररोज किती जणांच्या घरांना उध्वस्त करतं हे सुध्दा आपल्याला माहिती आहे.

अगदी गावाकडे गाळली जाणारी हातभट्टीसुध्दा भल्या-भल्यांची मती गुंग करते. काही लोक प्रमाणत घेतात परंतु काही पेक्षा जास्त लोक हे प्रमाणाच्या बाहेर दारू पितात त्यामुळे संसाराची राखरांगोळी होते.

आज वाईन आणि दारू शक्यतो द्राक्ष, उसाची मळी, नवसागर आणि मळीचा गुळ यांच्यापासून बनवली जाते. द्राक्षांची बनवलेली वाईन ही महागडी असते तर नवसागर आणि उसमळीच्या घाणेरड्या गुळापासून बनवलेली हातभट्टी मात्र स्वस्त असते.

याचा मध्यम पर्याय म्हणजे संत्र्याचा अर्क आणि उसमळी घालून बनवेली क्वार्टर ही देखील आजकाल चाळीस- पन्नास रूपयांना मिळून जाते. दारू म्हटलं की एखादा हाडाचा दारूडा सरणावरूनही उठून बसेल.

विजय माल्यासारख्या दारू बनवणाऱ्या माणसाची सुध्दा दारूमुळेच वाट लागली.

दारू बनवल्यामुळे देखील एखादी व्यक्ती बर्बाद होणं म्हणजे माल्याचं उत्तम उदाहरण. भले त्याला कारणं अनेक असतील पेशेवार दारूभट्टीवाला म्हणून माल्याची गणना करायला काही हरकत नाही.

भारतीय इतिहासातसुध्दा दारूचं महत्व फार होतं. प्राचीन कालापासून आपण दारू प्राशन करत आलोय. दारूचं महात्म्य हे केवळ दारूच्या प्रशंसकांना आणि चाहत्यांनाच माहिती आहें.

दारूची इतकी प्रशंसा करणं म्हणजे दारूच्या पिण्याचं, निर्मीतीचं आणि विक्रीचं समर्थन करणं नव्हे हे वाचकांनी लक्षात घेतलं पाहिजे.

 

daru-inmarathi
youtube.com

 

हौशेपोटी दारू पिणं किंवा व्यसन म्हणून दारू पिणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आजकाल टेन्शन, घरगुती वाद, स्ट्रेस ही कारणं दारू पिणारे लोक देतात. दारूमुळे सर्व कलहातून काही वेळेपुरते का होईना त्यांना सुटल्याचं समाधान मिळतं.

आपल्या मानसिक आरोग्याची काळजी न घेता दारूच्या आहारी जाऊन पैसा, वेळ आणि आरोग्य या तिन्ही अनमोल गोष्टी आपण नष्ट करतोय हे न समजण्याईतकी झिंग दारूड्यांच्या मनावर आणि मेंदूवर चढत असेल का?

दारूच्या सुरूवातीचा जन्म हा कदाचित व्यसन म्हणून झाला नसेल परंतु तिची नशा अशी काही समाजमनावर चढलीय की आज तिच्या शिवाय जमतही नाही आणि करमतही नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?