' हे १० हॉरर चित्रपट भयानक थरकाप उडवणाऱ्या खऱ्या घटनांवर आधारित आहेत!

हे १० हॉरर चित्रपट भयानक थरकाप उडवणाऱ्या खऱ्या घटनांवर आधारित आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

‘भूत’ म्हटलं की सगळे म्हणजे अगदी सर्व वयोगटातील लोक सरसावून बसतात.

लोकांच्या मनात याबद्दल कुतूहल आणि हलकीशी भीती पण आहे. भूत या संकल्पनेबद्दल नेहमीच वेगवेगळी मतं ऐकायला मिळतात.

 

horror inmarathi
Horror Freak New

 

काही लोकं ठामपणे भूत वगैरे या जगात काही नाही असं तावातावानं सांगतात, तर काही लोकं मी प्रत्यक्ष पाहिलंय भूत,

पण जाऊदे आता माझ्यावर कोण विश्वास ठेवणार असा युक्तिवाद करून हलकेच माघार घेतात.

काही का असेना पण लोकांना हा विषय फारच आवडतो हे खरं आहे ना मंडळी?

अगदी लहान मुलांमध्ये सुद्धा ‘भूत’ हा विषय अगदीच प्रिय. सगळे मित्र, भावंड जमली आहेत आणि भुताचा विषयच निघाला नाही असं होतच नाही.

रात्री-अपरात्री भुताच्या गोष्टी ऐकायच्या आणि मग घाबरून ओरडत उठायचं किंवा पाणी प्यायला जायचं झालं तरी चार-पाच जणांना सोबत घेऊन जायचं हे अगदी ठरलेलं.

भुताच्या गोष्टी ऐकल्या नाहीत असा माणूस क्वचितच बघायला मिळतो.

भुतांवरच्या याच कुतूहलाचा परिणाम ठिकठिकाणांमधून माध्यमांद्वारे दिसून येतो, भुतांच्या गोष्टी, पुस्तके, टीव्ही सिरीयल्स, नाटके आणि सिनेमे हे आजही सर्रास बनतात आणि लोक त्याचा मनसोक्त आस्वाद घेतात, बघतात आणि नंतर घाबरतात.

गोष्टी – सिनेमे काल्पनिक असू शकतात. काल्पनिक हॉरर सिनेमे पाहताना त्यातील घटनांवर आपण नकळतपणे विचार टाळतो व फारशी भीतीसुद्धा वाटत नाही,

पण ती सत्य घटना आहे असं म्हटलं की अंगावर शहारा येतो.

भुतांचे सिनेमे हा एक अजून लोकप्रिय प्रकार आहे. हॉरर सिनेमाचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. ‘सिनेमा भीतीदायक हवा तरच मजा’ अशी मतं या चाहतावर्गाची असतात.

काही निर्माता आणि दिग्दर्शकांनी खर्या घटनांवर चित्रपट बनवले आहेत असा त्यांचा दावा आहे. म्हणजे भूत आहे म्हणायला हरकत नाही ना?

हॉरर सिनेमाची खरी भीती सनेमा संपल्यानंतर जास्त वाटू लागते. त्यातून जर तो सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे असं कळलं तर त्यातील प्रसंगाचा गांभीर्याने विचार करण्यास आपण सुरुवात करतो.

असे काही प्रतिष्ठित हॉरर सिनेमे आहेत जे सत्य घटनेवर आधारित आहेत असा निर्मात्याचा दावा आहे व तसे पुरावे पण आहेत. कदाचित त्या दाव्यामुळेच हे सिनेमे अजून भीतीदायक वाटत असतील.

हे ही वाचा –

===

 

चला तर मग अशा दहा सत्य घटनेवर आधारीत सिनेमाचे कथानक आपण थोडक्यात पाहू. हा लेख आपण आपल्या जबाबदारीवर वाचावा. भीती वाटल्यास वाटू द्यावी.

१. A Nightmare In Elm Street (१९८४)

या सिनेमातील फ्रेडी क्रुगर किशोरवयीन मुलांना त्यांच्या स्वप्नात जाऊन मारत असतो.

 

horror 1 inmarathi
Nerdist

 

क्रॅवन ज्यांनी हा सिनेमा बनवला आहे ते सांगतात की, हा सिनेमा एका लेखावरून प्रेरित होऊन बनवला आहे. त्या लेखामध्ये एका कंबोडियन शरणार्थींपैकी एका परिवारातील मुलाबद्दल उल्लेख होता. त्या मुलाला खूप भयानक स्वप्नं पडायची.

त्याने पालकांना सांगितले की, तो जर झोपला तर स्वप्नातील ‘ती’ पाठलाग करणारी गोष्ट त्याला पकडेल आणि म्हणून तो न झोपता पूर्णवेळ जागा राहायचा.

जेव्हा तो मुलगा झोपला तेव्हा त्याच्या आई-वडिलांना वाटले की, तो बरा झाला व सगळं सुरळीत झालं, पण मध्यरात्री एक भयानक किंकाळी त्यांनी ऐकली व ते मुलापर्यंत पोहोचेपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता.

थोडक्यात, ही घटना होती, एका मुलाची आणि त्याला भयावह स्वप्नं पडत होती, पण त्यावर कुणीही विश्वास ठेवत नव्हतं, आणि याच सत्यघटनेवर हा सिनेमा बनला.

२ . Poltergiest (१९८२ )

ही गोष्ट एका कुटुंबाची आहे. ते कुटुंब राहात असलेल्या घरात विचित्र घटना घडू लागतात. त्यातील एका मुलीचं सुद्धा अपहरण होतं. अर्थात ते घर वाईट शक्ती व भुतांच्या सावटाखाली असतं.

 

horror 2 inmarathi
The 13th Floor

 

जोरदार आवाज होणे, दार, खिडक्या एकमेकांवर आपटणे, गोष्टी आपोआप हलणे अशा विचित्र घटना हर्मन्स यांच्या घरी 1958 मध्ये घडत होत्या.

सी फोर्ड, न्यूयॉर्क येथे ते राहात होते व याच घटनांवरून प्रेरित होऊन हा सिनेमा बनला आहे.

३ . The Amityville Horror (१९७९)

हा सिनेमा आहे एका पछाडलेल्या घराबद्दल!

१९७९ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमामध्ये जेम्स ब्रोलिन व मार्गोट किडर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एका जोडप्याबद्दल हा सिनेमा आहे. ते एक घर खरेदी करतात, ते भुतांनी पूर्णत: पछाडलेलं असतं.

 

horror 3 inmarathi
kimt.com

 

जॉर्ज व कथि या खर्या दांपत्यांच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगावरून चित्रपट बनला आहे. न्यूयॉर्क मधील अॅमिटीव्हिले येथे त्यांनी एक घर खरेदी केलं होतं.

या घराबाबत भयानक घटना घडली होती १९७४  साली. जेव्हा एका माणसाने त्या घरात आपल्याच परिवारातील ६ जणांना मारलं होतं.

या घटनेनंतर एका वर्षाने जॉर्ज व कथि तेथे राहायला गेले, पण तिथे घडणार्या भयानक व भीतीदायक गोष्टींमुळे त्यांनी २८ दिवसांतच घर सोडले. हा चित्रपट सर्व हॉरर चित्रपटांपैकी एक प्रतिष्ठित चित्रपट मानला जातो.

४. The Conjuring (२०१३)

या सिनेमामध्ये ‘असामान्य घटना’ यांचा शोध घेणार्या दोघांची गोष्ट आहे जे एका परिवाराला (पेरॉन परिवारास भुतांपासून वाचवण्यासाठी मदत करतात.

एड व लॉरेन (सिनेमातील तपासकर्ते) ही खरी माणसं असून ते खरोखरीच असामान्य शक्ती/ घटना यांचा अभ्यास करतात व तपास करतात. चित्रपटात पॅट्रिक व वेरा यांनी या भूमिका केल्या आहेत.

 

horror 4 inmarathi
horrorhomeroom.com

 

त्याचप्रमाणे या सिनेमातील त्या कुटुंबाची घटनासुद्धा त्यांनीच तपास केलेल्या एका सत्य घटनेवरून घेण्यात आली आहे.

त्या पेरॉन फॅमिलीमधील एक मुलगी अँड्रिओ पेरॉन यांनी एका मुलाखतीमध्ये त्या घटनेतील बाथशेबा या आत्म्याबद्दल सांगितलं होतं.

‘‘तो आत्मा स्वत:ला त्या घराची मालकीण समजायचा आणि माझ्या आईने ती जागा घेणं त्या आत्म्याला कधीच मान्य नव्हतं.’’ असं अँड्रिआ यांनी सांगितलं.

५ . The Conjuring 2 (२०१६)

एड व लॉरेन (असामान्य घटनांचे तपासकर्ते) यांचा हा सिनेमाही सत्य घटनेवर आधारित आहे. इंग्लंडमधील हॉजसन परिवाराला मदत करण्यासाठी ते जातात, हे या सिनेमाचे कथानक आहे.

ही घटना होती एका मुलीबद्दल. तिला एका भुताने पछाडलं होतं व ते भूत त्या मुलीद्वारे बोलायचं, याबद्दल सांगताना मुलीची बहीण म्हणते की,

‘‘त्यावेळी सगळंच खूप भयानक होतं, नक्की काय घडतंय हेच आम्हाला कळायचं नाही.’’

किती अकल्पित गोष्टी आहेत ना? बरं सत्य घटनेवर आधारित आहेत म्हटल्यावर थोडं तरी तथ्य त्यात असणारच ना? मंडळी, तुम्हाला काय वाटतं? पण काही तरी असल्याशिवाय अशा कथा कशा काय लिहिल्या जातील?

 

horror 5 inmarathi
Patheos

 

कल्पना करायला सुद्धा थोडी तरी वास्तवता हवीच ना? तर भूत आहे असे आपण मानू आणि पुढील पाच चित्रपटांच्या कथानकांवर प्रकाश टाकू.

६. Annabelle (२०१४)

एक बाहुली व त्यामुळे पछाडून गेलेल्या घराचा हा सिनेमा. अॅनाबेल या बाहुलीचा उल्लेख ‘द कॉनजुरींग’ या चित्रपटातसुद्धा आहे.

तपासकर्ते वॉरन यांनी सांगितलं होतं की, खरोखरीच ही एक भयानक बाहुली होती, जी आपोआप हालायची आणि ‘आमची मदत करा’ अशा भीतीदायक चिठ्ठ्यासुद्धा लिहायची.

 

horror 6 inmarathi
hitc.com

हे ही वाचा –

===

 

एका महिलेकडे ही बाहुली होती व तिला असं समजलं की, ती बाहुली अॅनाबेल नावाच्या सात वर्षांच्या मुलीची होती व त्या मुलीचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला होता.

बापरे ! आता कोणतीही बाहुली पाहिली की ती अॅनाबेलच वाटेल.

७. The Disappoint Rooms (२०१६)

एक आर्किटेक्ट नवीन घरी राहायला जाते आणि नंतर तिला त्या घरातील आतल्या बाजूच्या एका गूढ खोलीबद्दल असे समजते की, ही खोली पूर्वी श्रीमंत लोक आपल्या अक्षम मुलांना फेकून देण्यासाठी, डांबण्यासाठी वापरत होते.

 

horror 7 inmarathi
BookMyShow

 

हे कथानक सत्य घटनेवरून प्रेरित आहे, एका महिलेला आपल्या घरात अशी खोली सापडली होती व एकोणिसाव्या शकतात एका न्यायाधीशाने आपल्या अक्षम मुलीला डांबण्यासाठी ती खोली बांधली होती.

८. The Shining (१९८०)

स्टॅनली कुब्रीक यांची ही एक सुप्रसिद्ध आणि अप्रतिम हॉरर सिनेमा कथा आहे.

 

horror 8 inmarathi
IndieWire

 

ही कथा आहे एका माणसाची जो एका हॉटेलमध्ये राहायला जातो व तेथील असामान्य घटना त्याला अक्षरश: वेडं करून टाकतात.

हा सिनेमा स्टिफन किंग या लेखकाच्या एका पुस्तकावरून प्रेरणा घेऊन बनविला आहे. या पुस्तकात हॉटेल स्टॅनलीचा उल्लेख आहे. जिथे असंख्य लोकांनी भूत, आत्मा पाहिल्याचं सांगितलं आहे.

चित्रीकरणासाठी मात्र या हॉटेलचा वापर केला नाही कारण स्टॅनले यांना ते हॉटेल दिसताना तरी भयानक वाटलंच नाही!

९. Veronica (२०१८ )

एक पंधरा वर्षांची मुलगी Ouija (मुळाक्षरे व खुणा असलेला फळा ज्याचा उपयोग परलोकविद्येत केला जातो) बोर्डद्वारे अपघातानेच एक सैतानाच्या संपर्कात येते व त्यामुळे तिला व संपूर्ण परिवाराला त्रास होतो.

अशी कहाणी असलेला हा सिनेमा नुकताच नेटफिक्सी द्वारे प्रदर्शित झाला.

 

horror 9 inmarathi
vulture.com

 

हा सिनेमा प्रेरित आहे मॅड्रिड येथील एका पोलीस रिपोर्टवरून.

त्या मुलीच्या मृत्यूसंबंधी बोलताना पोलीस म्हणाले की, भरपूर गूढ व दुर्मीळ गोष्टी समोर आल्या आहेत व त्यातच मुलीचा मृत्यूही झाला.

१०. Winchester (२०१८ )

या सिनेमाचे कथानक असे, एक विधवा, जिच्या नवर्याचा बंदूक बनवण्याचा कारखाना असतो, तिला असे वाटत असते की, तिला काही प्रेतात्मे त्रास देत आहेत आणि ही त्याच लोकांची भुतं आहेत, ज्यांचा मृत्यू त्या विधवेच्या नवर्याच्या कारखान्यात बनविलेल्या बंदुकीमुळे झाला आहे.

 

horror 10 inmarathi
GeekTyrant

 

ती सिनेमामध्ये ज्या घरात राहात असते ती जागा खर्या स्थळावरून प्रेरित असून त्या जागेचं नाव विंचेस्टर मिस्ट्री हाउस असे आहे.
तर मंडळी असे आहेत हे दहा लोकप्रिय सत्य घटनेवर आधारित दहा चित्रपट.

या कथा सत्य असोत वा असत्य, पण हे हॉरर सिनेमे लोकांना घाबरवण्यात मात्र पुरेपूर यशस्वी झाले आहेत.

असं म्हणतात की, ‘‘तुम्हाला एकटं एकटं वाटत असेल तर लाइट बंद करा व एखादा हॉरर सिनेमा बघा,’’ काही वेळात तुम्हाला तुम्ही एकटे आहात असं अजिबात वाटणार नाही.’’बघा मग प्रयोग करून आणि अनुभव नक्की शेअर करा.

अर्थात स्वतःचा जीव टांगणीवर लावून चित्रपट पाहू नका, कारण हे चित्रपट केवळ पडद्यावर घडणारी घटना आहेत, हे लक्षात ठेवा.

ते केवळ मनोरंजन आहे, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या मनावर, बुद्धीवर आणि शरिरावर होणार नाही याची काळजी घ्या.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?