' करण जोहरच्या 'धुंद' पार्टीचा व्हिडिओ पुन्हा NCB च्या रडारवर..सत्य बाहेर येणार का?

करण जोहरच्या ‘धुंद’ पार्टीचा व्हिडिओ पुन्हा NCB च्या रडारवर..सत्य बाहेर येणार का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

तब्बल १८ दिवस कोठडीत राहून कालसुद्धा कोर्टाने आर्यन खान याचा जामीन फेटाळला. २ ऑक्टोबरला क्रुज पार्टीवर धाड टाकल्यानंतर NCB नी बॉलिवूडचं सफाई अभियान फारच मनावर घेतल्याचं दिसतंय.

आज जेव्हा शाहरुख आर्यनला भेटायला आर्थर रोड तुरुंगात आला तेव्हाच NCB ने चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे या अभिनेत्रीच्या घरी धाड टाकून तिला दुपारी २ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स धाडले.

 

ananya pandey inmarathi

 

याबरोबरच NCB ने शाहरुखच्या घरावर मन्नत इथेदेखील धाड टाकली आहे. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर हे दुसरं मोठं प्रकरण आहे ज्यात बॉलिवूडचा काळे धंदे पुन्हा उघड झाले आहेत. येणाऱ्या काळात आणखीन किती स्टारकीड NCB च्या गळाला लागतील याचा अंदाज तुम्हाला आला असेलच.

याच स्टारकीडना लॉंच करणारा इंडस्ट्रीतला गॉडफादर म्हणून करण जोहरकडे बघितलं जातं. महेश भट, डेव्हिड धवनपासून चंकी पांडेपर्यंत कित्येक मोठमोठ्या सेलिब्रिटीजच्या मुलांना करण जोहरने रेड कारपेट एंट्री देऊन प्रेक्षकांच्या माथी मारलं.

अभिनयाशी काडीमात्र संबंध नसतानासुद्धा त्यांना मोठमोठ्या सिनेमात काम देऊन त्यांनाच इंडस्ट्रीचं उत्तराधिकारी म्हणून घोषित करणारा करण जोहर २ वर्षांपूर्वी मात्र चांगलाच फसला होता.

karan johar inmarathi

 

२०१९ साली करण जोहरच्या घरात एक पार्टी दिली गेली आणि त्या पार्टीतला एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला, हा व्हिडिओ जसा बाहेर आला तसं लोकांनी या ‘उडत्या बॉलिवूड’वर टीका करायला सुरुवात केली.

या व्हिडिओमध्ये दीपिका पडूकोण, रणबीर कपूर, विकी कौशल, वरूण धवन, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर असे कित्येक स्टार्स दारू किंवा ड्रग्सच्या नशेत दिसत होते. काही सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये तर विकी कौशलसारखा अभिनेता ड्रग्स घेतानासुद्धा लोकांनी पकडला.

 

bollywood drug party inmarathi

 

या व्हिडिओची नंतर चांगलीच कसून चौकशी झाली, NCB नेसुद्धा तपासणी केली, नंतर हळू हळू प्रकरण थंड झालं, करण जोहरने जाहीररित्या स्पष्टीकरण दिलं की माझ्या घरातल्या पार्टीत ड्रग्सचं सेवन केलं गेलं नाही. कित्येक स्टार्सनीसुद्धा यावर त्यांची बाजू मांडली.

वादंग झाल्यावर सोशल मीडियावरून तो व्हीडियो काढला, पण इंटरनेटच्या दुनियेत काहीच डिलिट होत नसतं. आजही इंटरनेटवर तो व्हिडीओ तुम्हाला मिळेल आणि तो पुन्हा बघून ही नक्की खात्री होईल की त्या पार्टीत नक्कीच काहीतरी चुकीचं घडलं होतं.

आता करण जोहरच्या पार्टीतला हाच व्हिडिओ पुन्हा चर्चेत आलाय, कारण काही मीडिया पोर्टलच्या माहितीनुसार NCB ने या व्हिडिओचा तपास बंद केलेला नसल्याचं समोर आलं आहे.

समीर वानखेडे यांनी या व्हिडिओ संदर्भात तपास पुन्हा सुरू करण्याची मागणी सरकारकडे केली असून त्यावर परवानगीसुद्धा मिळाली आहे अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगतीये.

 

sameer wankhede inmarathi

 

शिवाय या चौकशीसाठी NCB ला केंद्र सरकारकडून ६ महिन्यांचा वेळ मिळाल्याचंसुद्धा बोललं जातंय. करण जोहरने जरी यावर स्पष्टीकरण दिलं असलं तरी या प्रकरणात अजूनही NCB कडून क्लीन चीट मिळाली नाहीये.

अर्थात या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळात आणखीन स्पष्ट होतील आणि या पार्टीतल्या व्हिडिओमागचा बॉलिवूडचा खरा चेहेरा लवकरच समोर येईल.

आर्यन खानचं हे प्रकरण नेमकं कोणाकोणाची पोलखोल करणार, किती स्टारकिड्सचे कारनामे बाहेर येणार, बॉलिवूडचं स्वच्छता अभियान किती सुपरस्टार्सच्या अंगाशी येणार हे येणारा काळच ठरवेल!

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?