' महागड्या वस्तू भेट म्हणून देणाऱ्या सुकेशचं, जॅकलिन सोबत नक्की काय शिजतंय? – InMarathi

महागड्या वस्तू भेट म्हणून देणाऱ्या सुकेशचं, जॅकलिन सोबत नक्की काय शिजतंय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

बॉलिवूड सेलिब्रिटी हे हल्ली शुटिंगच्या सेटवर कमी आणि ईडी किंवा एनसीबी अशा शासकीय यंत्रणांच्या कार्यालयात अधिक दिसतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ड्रग्स प्रकरणात अडकलेला आर्यन आणि त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करणारा शाहरुख खान असो वा सुशांत सिंगच्या मृत्युनंतर एनसीबी कार्यालयात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले बडे कलाकार असो… हे चक्र अजूनही संपलेलं नाही.

 

actress inmarathi

 

मात्र गेल्या काही दिवसांपासून एनसीबीसह आता ‘ईडी’ची करडी नजरही कलाकारांचा पिच्छा पुरवताना दिसते. याचंच ताजं उदाहरण म्हणजे अभिनेत्री जॅकलिड फर्नांडिस, नृत्यांगना नोरा फतेही यांसारख्या कलाकारांना ईडीने पाठवलेली समन्स!

 

nora inmarathi

 

काही दिवसांपूर्वी ईडीच्या दिल्ली येथिल मुख्ययालयात नोराने हजेरी लावत चौकशीसाठी सहकार्य करणार असल्याचं जाहीर केलं, त्यानंतर  जॅकलिनला समन्स पाठवल्याने ”कुछ तो गडबड है’ म्हणत अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

आता पुन्हा एकदा जॅकलिन ईडीच्या जाळ्यात अडकली आहे,  परदेशात जात असतानाच तिला विमानतळावर अडवण्यात आले होते मात्र नंतर तिची सुटका करण्यात आली. जॅकलिन परदेशी शोच्या निमित्ताने मस्कतसाठी जात होती. 

शनिवारी मनी लॉंड्रिंग संदर्भातील केसवर चार्ज शीट दाखल केली असून त्यात जॅकलिनचे नाव देखील समाविष्ट केले आहे, कस्टम अधिकाऱ्यांनी लुकआऊट नोटीसच्या आधारे जॅकलिनला देश सोडून जाण्यास अधिकाऱ्यांनी मनाई केली, कारण या प्रकरणात तिची पुन्हा एकदा चौकशी होऊ शकते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

EDI च म्हणणं काय?

EDI च्या सूत्रांनुसार वसूली केसचा मास्टरमाईंड सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिनला १० करोड रुपयांची महागडी गिफ्ट्स दिली आहेत. ज्यात लक्झरी गाड्या, घोडे ( ९ लाखांच्या मांजरी) यांसह इतर महाग गोष्टी समाविष्ट आहेत.

सुकेशला पहिल्यांदा जेव्हा जामीन मिळाला होता तेव्हा त्याने चेन्नईसाठी चार्टड प्लेनची बुकिंग केले होते, यात तब्बल ८ करोड रुपये खर्च केला गेला होता तसेच जॅकलिन आणि सुकेश चेन्नईमधील एका हॉटेलात सुद्धा राहिले होते. सुकेशने जॅकलिनसाठी मुंबई ते दिल्ली असे चार्टड प्लेनची सोय केली होती.

 

bmw grill inmarathi

 

नेमकं प्रकरण काय? 

सप्टेंबर महिन्यात मनी लॉंड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन हिला ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवल्याने बॉलिवूडमधील आणखी एक मासा ईडीच्या गळाला या ब्रेकिंग न्युजने बॉलिवूड हादरलं. मात्र प्रत्यक्षात या प्रकरणात जॅकलिनचा सहभाग कितपत याबाबत आजही मतमतांतरे आहेत.

हे प्रकरण सुरु झालं ते हायप्रोफाईल ठग सुकेश चंद्रशेखर याच्यापासून. राजकारण्यांचा नातेवाईक, प्रसिद्ध उद्योगपती, सेलिब्रिटींचा निटकवर्तीय अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा सुकेश खरंतर यापैकी कुणीही नाही. आपली शक्कल लढवत वयाच्या १७ व्या वर्षापासून तो श्रीमंतांना गंडा घालतोय.

याआधीही अनेक गुन्ह्यांचा मास्टरमाईंड असलेल्या सुकेशच्या जाळ्यात जॅकलिन फर्नांडिसही अ़डकली ते तिहार जेलमधून आलेल्या एका कॉलमुळे!

तिहार जेलमधून तब्बल २०० कोटी रुपये वसूल करण्याचं रॅकेट चालणाऱ्या सुकेशने आपली खरी ओळख न सांगता जॅकलीनला फोन केले होते. यापुर्वीही चित्रपट, जाहिराती यानिमित्ताने त्यांची ओळख झाली होती.

 

sukesh jackline inmarthi

या ओळखीनंतरच सुकेशने जॅकलिनला महागडी गाडी, उंची भेटवस्तु दिल्या होत्या. ज्या जॅकलिनने स्विकारल्याचे पुरावेही समोर आले होते.

तिहार जेलमध्ये कैद झालेला सुकेश कारागृहातूनच मनी लॉंड्रिंग करत असल्याची धक्कादायत बाब उघड झाल्यानंतर या प्रकरणात आता बॉलिवूडमधील अनेक नावं पुढे येत आहेत.

”मी त्याला ओळखत नाही”

सप्टेंबर महिन्यात या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर जेंव्हा जॅकलिनचे नाव पुढे आले तेव्हा ईडीने मनी लॉंड्रिंग प्रकरणात तिला समन्स पाठवून साक्षीदार म्हणून सहकार्य करण्यास सांगितले. याप्रकरणी जॅकलिनला ईडी कार्यालयात चौकशीसाठीही बोलवण्यात आले होते.

 जॅकलिन ईडी कार्यालयात हजर होऊन तब्बल ७ तास तिची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी तिने चौकशीला सहकार्य केल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केल होते.

दुपारी साडेतीन ते रात्री १० या वेळेत तिची चौकशी करण्यात आली. यावेळी सुकेश आणि तिच्यात काही व्यवहार झाले का? सुकेशने कोणकोण्या भेटवस्तु दिल्या? तिला सुकेशबाबत काय माहिती आहे ? या धर्तीवर तिची चौकशी करण्यात आली होती.

यावेळी आपल्याला फोन करणारी व्यक्ती नक्की कोण आहे? तसंच ती व्यक्ती तिहार जैलमधून आपल्याला फोन करत आहे याबाबत कोणतीच माहिती नसल्याचं जॅकलिनने सांगितले होते. सुकेश चंद्रशेखर ही त्याची खरी ओळखही आपल्याला ठाऊक नसल्याचं स्पष्टीकरण तिने दिले होते.

 

jacqueline inmarathi

 

मात्र नक्की ओळख ठाऊक नसलेल्या व्यक्तीकडून जॅकलीने महागड्या गिफ्ट्स स्विकारल्या कशा? या गिफ्ट्स स्विकारताना तिने कोणतीही चौकशी केली नाही का? किंवा निनावी भेटवस्तुंबद्दल तिने पोलिसांना माहिती का दिली नाही? यापुर्वी सुकेश आणि जॅकलिनच्या भेटीत काही व्यवहार झाला होता का? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीत असल्याने जॅकलिनवरील संशयाची सुई कायम आहे.

ती आरोपी नाही, मात्र तिचीही फसवणूक झाली आहे का? किंवा सुकेश प्रकरणात ती साक्षीदार म्हणून मदत करू शकते यासाठी तिला चौकशीकरिता बोलवण्यात आल्याचे तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते .

कोण आहे सुकेश :

बंगळुरू, कर्नाटकचा रहिवासी चंद्रशेखर याने अवघ्या १७ व्या वर्षी लोकांना फसवणे सुरू केले. त्याने आपली ही गंडा घालण्याची योजना बंगळुरूपासून सुरू केली आणि काही वेळातच तो चेन्नईला पोहोचला. यानंतर त्याने मोठ्या शहरांमधील अनेक श्रीमंत लोकांची फसवणूक केली. चंद्रशेखरला बालाजी म्हणूनही ओळखले जाते.

नोकरी देण्याच्या नावाखाली त्याने अनेक लोकांकडून पैसे उकळले. त्याने आपले राजकारणी नातेवाईक असल्याचे भासवून १०० पेक्षा जास्त लोकांची ७५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे वृत्त आहे.

२०१७ मध्ये चंद्रशेखरला एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आणि निवडणूक आयोगानं लाचप्रकरणी त्याला तिहार जेलमध्ये पाठवले. निवडणूक चिन्ह देण्याच्या नावाखाली त्याने नेते टीटीव्ही दिनाकरन यांच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप होता. अण्णाद्रमुक गटासाठी निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी त्याने ५० कोटी रुपयांचा सौदा केल्याचे सांगितले जाते.

 

sukesh inmarthi

 

या प्रकरणी त्याला तिहार कारागृहात ठेवल्यानंतरही तो लॉकअपमधून करोडो रुपयांच्या वसुलीचे रॅकेट चालवत होता.

गेल्या महिन्यात ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चंद्रशेखरचा आलिशान बंगला, ८२ लाख रुपये रोख आणि डझनभर महागड्या कार जप्त केल्या होत्या.

तिहार जेलमधून चालवल्या जाणाऱ्या रॅकेटमध्ये बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनाही तो फसवत असल्याचा आरोप असून जॅकलीनसह आणखी किती कलाकार त्याच्या जाळ्यात अडकले आहेत याचा खुलासा करण्याचे आव्हान आता ईडीसमोर आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?