' 'डेंजर' दाखवण्यासाठी कवटी-हाडं, हे चिन्ह आलं कुठून? यामागे आहे भयावह इतिहास

‘डेंजर’ दाखवण्यासाठी कवटी-हाडं, हे चिन्ह आलं कुठून? यामागे आहे भयावह इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आपल्या सर्वांची आकलनशक्ती ही वेगवेगळी असते. एक गोष्ट मात्र आपल्यात सारखी असते, आपल्याला अक्षरांपेक्षा फोटोंचा अर्थ चटकन लक्षात येतो, ते दीर्घकाळ समरणात राहतात.

रस्त्यावरून जातांना एखाद्या ठिकाणी जर काम सुरू असेल, तर तिथे लावलेलं लाल रंगाचं एखादं स्टिकर हे आपल्याला दुरूनच दिसत असतं. वाहतुकीचे चिन्ह सुद्धा याच कारणामुळे तयार करण्यात आलेले असावेत.

“पुढे धोका आहे” हे सांगणारं कवटी आणि दोन हाडांचं चिन्ह सुद्धा अशाच चिन्हांपैकी एक आहे, जे कधीही बघितलं तरी, आपण आहोत तिथेच क्षणभर थांबतो आणि तिथून मागे फिरतो.

संभावित धोका सांगण्यासाठी कवटी आणि दोन हाडांचा फोटो कधीपासून वापरतात? आणि का? याबद्दल कुतूहल म्हणून जाणून घेऊयात.

 

danger sign inmarathi

 

कवटी आणि दोन हाडांच्या फोटोची पद्धत ही इजिप्तने सुरू केली होती. इजिप्त मधील तुतानखामुन या भागात सर्वप्रथम हे चिन्ह वापरण्यात आलं होतं.

इजिप्त मधील राजाने हे चिन्ह त्याच्या सरदारांमार्फत त्याचा ‘आदेश’ म्हणून वापरण्याची सुरुवात केली होती. कवटी आणि दोन हाडांचं पहिलं चित्र तयार करतांना ‘जॅकर्स डी मोली’ या व्यक्तिचे अवयव वापरण्यात आले होते.

‘जॅकर्स’ हा २३ वा आणि शेवटचा सरदार होता. ११२९ मध्ये कॅथलिक चर्चने सरदारांची वाढती मुजोरी कमी करण्यासाठी ‘जॅकर्स डी मोली’ ला जिवंत जाळण्याचा निर्णय घेतला होता.

जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली तेव्हा ‘जॅकर्स डी मोली’चे काही जवळचे सरदार सहकारी त्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा त्यांना फक्त कवटी आणि दोन हाडं इतकंच त्या ठिकाणी सापडलं.

इजिप्त राजाचे सरदार हे त्यावेळी खलाशी म्हणून सुद्धा काम करायचे. त्यांनी ‘जॅकर्स डी मोली’ यांच्या कवटी आणि दोन हाडांचं जतन केलं आणि त्याला ‘जॉली रॉजर’ असं नाव दिलं.

 

crossbone on flag inmarathi

 

‘पोर्ट ऑफ सीदान’ या इजिप्तमधील जागेने नेहमीच खलाशांना तिथे राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करून दिली. कालांतराने ही एक कवटी आणि दोन हाडांचं चित्र हे खलाश्यांच्या झेंड्यावरचं चिन्ह झालं.

ख्रिश्चन धर्मीय लोकांनी हे चिन्ह काही वर्षांनी ‘मृत्यू’चं चिन्ह म्हणून वापरण्यास सुरुवात केली. रोमन अधिपत्याच्या शेवटी कवटी आणि दोन हाडांचं चिन्ह हे ‘जीवनापासून दूर जाणे’ हे सांगण्यासाठी वापरलं जायचं.

दुसऱ्या शतकातील इटली मधील कित्येक ख्रिश्चन पुस्तकात या चिन्हाची माहिती लिहून ठेवण्यात आली आहे. ख्रिश्चन धर्माचे अभ्यासक कवटी आणि दोन हाडांच्या या चिन्हाला “मृत्यू हे एक अंतिम सत्य आहे” हे लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी सुद्धा वापरायचे.

स्पेनमधील रहिवासी हे चिन्ह त्यांच्या स्मशानभूमीच्या दारावर आजही लावतात. ख्रिश्चन असो वा इतर कोणत्याही धर्माचा अनुयायी असो, त्याला हे चिन्ह बघितल्यावर त्याला हा संदेश नक्की मिळतो, की “या पृथ्वीतलावर जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती, प्राणी हा एक ना एक दिवस मरणार आहे.”

 

danger sign inmarathi1

 

१४ व्या शतकापासून या चिन्हाचे अजून वेगवेगळे अर्थ तयार होण्यास सुरुवात झाली. खलाशांच्या झेंड्यावरील चिन्ह इतकीच त्याची ओळख काही वर्षांनी मानली जाऊ लागली.

लाल रंगाचा झेंडा आणि त्यावर हे कवटीचं चिन्ह म्हणजे ‘खलाशांना तुमच्याबद्दल कोणतीही दया नाहीये’ हे सांगण्याचं प्रतीक होतं. १७ व्या शतकात येईपर्यंत हा झेंडा काळ्या रंगाचा झाला आणि या चिन्हाचे बरेच स्वरूप बदलत गेले.

१८३२ मध्ये ‘येले विद्यापीठ’ येथील विद्यार्थ्यांनी ‘स्कल अँड बोन’ नावाच्या एका गुप्तहेर संस्थेची स्थान केली. या संस्थेने कवटी आणि दोन हाडांचं चिन्ह हे समाजातील गुप्त घटनांचं प्रतीक म्हणून वापरण्यासाठो सुरुवात केली.

१८७० मध्ये ग्रेट ब्रिटन मधील रग्बी युनियन या फुटबॉलच्या संघाने कवटी आणि दोन हाडांचं चिन्ह त्यांच्या टी शर्ट वर वापरण्यास सुरुवात केली होती.

१८७६ मध्ये हे चिन्ह ‘कार्डिफ रग्बी फुटबॉल क्लब’ला आपल्या फुटबॉल खेळाडूंच्या टीशर्ट वरून काढून टाकावं लागलं कारण त्यांच्या पालकांना हे चिन्ह अजिबात आवडत नव्हतं.

१९व्या शतकापासून कवटी आणि दोन हाडांचं चिन्ह न्यूयॉर्क मधील काही कंपनी रासायनिक पदर्थ्यांच्या वाहनांवर वापरायला सुरुवात केली. लहान मुलांना रासायनिक पदार्थांपासून दूर ठेवणे हा या चिन्हाचा वापर त्यानंतर प्रचलित झाला. त्यासोबतच, ‘मिस्टर यक’ हे सुद्धा एक चिन्ह अमेरिकेतील काही संस्थांनी वापरण्यास सुरुवात केली.

 

danger sign inmarathi2

 

१९८६ मध्ये कॅनडा येथील ओक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन (ओशा) या संस्थेने ‘डेंजर’चं हे चिन्ह विषारी, प्राणघातक वस्तूंसाठी वापरण्यास सुरुवात केली आणि पुढे ते रूढ  झालं.

या संस्थेने जगभरातील लोकांना ‘धोका’ चटकन लक्षात यावा यासाठी हे चिन्ह वापरण्याचं आवाहन केलं. काळ्या रंगाच्या त्रिकोणी चौकोनात पांढऱ्या रंगाची कवटी आणि दोन हाडं हे ‘ओशा’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ‘सर्वात अचूक धोक्याचं चिन्ह’ म्हणून मान्य करण्यात आलं.

औद्योगिक क्षेत्राने ‘डेंजर’चं हे चिन्ह कंपनीच्या कामाच्या ठिकाणी वापरण्यास सुरुवात केल्यापासून या चिन्हाचा अर्थ सर्वांना कळू लागला. आज कवटी आणि दोन हाडांच्या चित्राला ‘सेफ्टी आयकॉन’ म्हणून जगात मान्यता देण्यात आली आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?