' पदार्पणात 'सुपरहिट' सिनेमा देणाऱ्या रोनित रॉयला सुद्धा संघर्ष करावा लागला होता!

पदार्पणात ‘सुपरहिट’ सिनेमा देणाऱ्या रोनित रॉयला सुद्धा संघर्ष करावा लागला होता!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

गेल्या मागच्या वर्षीपासून पर्यटन क्षेत्राबरोबरीने जर कोणते क्षेत्र थंड पडले असेल तर ते म्हणजे मनोरंजन क्षेत्र. अनेक बिगबजेट सिनेमे रखडले होते, थिएटर सुरु होण्याचा मुर्हूत काही सापडत नसल्याने शेवटी त्यांनी देखील ओटीटी प्लॅटफॉर्मचा पर्याय निवडला.

आज मनोरंजनाचा एकमेव पर्याय म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून बघितले जात आहे, कारण लोक आधीच रटाळ सिरियल्सना कंटाळले आहेत. ओटीटी हे मनोरंजनाचे भविष्य आहे हे आता बड्या बड्या अभिनेत्या मंडळींना देखील कळून चुकले आहे.

कोरोनामुळे मनोरंज क्षेत्रातील अनेकांच्या रोजगारावर गदा आली, आपण पडद्यावर सिनेमा बघतो मात्र तो सिनेमा बघण्यासाठी अनेक मंडळी अहोरात्र मेहनत घेत असतात. कोरोनामुळे तंत्रज्ञ, कलाकार मंडळी घरी बसली आहेत. आजकाल केवळ २० लोकांच्यात शूटिंग पारपडले जाते.

 

on OTT IM

तंत्रज्ञाबरोबरीने कलाकार मंडळींनकडे सुद्धा काम नाहीत, याबद्दल त्यांनी देखील सोशल मीडियावर खंत व्यक्त केली आहे. नुकतंच रोनित रॉय या अभिनेत्याने कलाकारांना दिल्या जाणाऱ्या मानधनाबाबत आपली खंत व्यक्त केली आहे. त्याच असं म्हणणं आहे की ‘कोरोना नंतर ठरविक कलाकारांचे मानधन वाढले आहे बाकीच्यांचं काय’? रोनित रॉयच्या बाबतीत याआधी मनोरंजन क्षेत्रात काही अनुभव आले आहेत .त्यातीलच एक अनुभव आज आपण जाणून घेणार आहोत…

 

ronit roy inmarathi

 

रोनित रॉय हा अभिनेता मनोरंजन क्षेत्रात जवळपास तीन दशकं आहे, अनेकांना हे माहिती ही असेल कदाचित. नव्वदच्या दशकांत जेव्हा खान पर्व उदयास येत होत तेव्हा त्यांना टक्कर देण्यासाठी अनेक अभिनेते येत होते त्यातलाच एक अभिनेता म्हणजे रोनित रॉय.

रोनित रॉयने जान तेरे नाम या सिनेमाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, प्रेमाचा त्रिकोण असलेला हा सिनेमा इतका सुपरडुपर हिट ठरला की सिनेमाने तब्बल २५ आठवडे सिनेमागृहात काढले. बॉलीवूडच्या पदार्पणातच इतके मोठे यश मिळवणे हे सोपे नाही.

सिनेमा सुपरहिट ठरून देखील पुढचा सिनेमा मिळायला त्याला तब्बल तिने महिने लागले होते. तसेच त्याच्या काही चुकीच्या निर्णयांमुळे त्याला कामही मिळत नव्हते. एका मुलाखती दरम्यान त्याने हा किस्सा सांगितला आहे. 

 

ronit roy 1 inmarathi

 

जान तेरे नाम नंतर तो काही सिनेमांमध्ये दिसला मात्र हिरोच्या भूमिका फारश्या त्याच्या वाट्याला आल्या नाहीत. बॉलीवूडमध्ये हव्या तशा भूमिका मिळत नसल्याने त्याने आपला मोर्चा थेट टीव्ही कडे वळवला.

नव्वदच्या दशकांत सिरियल्स हा प्रकार नुकताच चालू झाला होता. झी आणि स्टार चॅनेलमध्ये तुफान स्पर्धा होती. अनेक दर्जेदार सिरियल्स येत होत्या. बॉलीवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनी सुद्धा याच काळात टीव्हीवर आपले दमदार आगमन केले होते. टीव्ही हे आपल्या कारकिर्दीचे एक हुकमाचे पान आहे लक्षात आल्यावर रोनितने देखील आपले पाऊल टीव्ही इंडस्ट्रीमध्ये ठेवले.

 

amitabh kbc inmarathi

एकता कपूरच्या की नावाने प्रसिद्ध असलेल्या कसोटी जिंदगी की, कसोटी जिंदगी की या सिरियल्समधून आपल्या दमदार अभिनयामुळे पुन्हा एकदा रोनित प्रसिद्ध झाला. २०१० पर्यंत त्याने अनेक सिरियल्समध्ये काम केले.

२०१० साली आलेल्या उडान या अनुराग कश्यपच्या सिनेमामध्ये कडक शिस्तीचा ,वयात आलेल्या मुलाच्या वडिलांचा रोल केला होता. त्या रोलची  सुद्धा अनेकांनी प्रशंसा केली होती. २०१९ साली आलेल्या होस्टेजेस या वेबसिरीजमध्ये काम करून ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपले पाऊल टाकले.

 

ronit roy inmarathi 1

 

मनोरंजन क्षेत्र हे असं क्षेत्र आहे जातेः आज काम आहे तर उद्या नाही, अगदी मोठमोठाल्या मंडळींनकडे काही वर्ष काम नव्हते, नैराश्य येऊन काहींनी आपले आयुष्य संपवले तर काहींनी मात्र संघर्ष सुरूच ठेवला.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?