' ७ MMS स्कँडल्स, ज्यामुळे लोकांच्या मनात इंटरनेटची भीतीच बसली होती...

७ MMS स्कँडल्स, ज्यामुळे लोकांच्या मनात इंटरनेटची भीतीच बसली होती…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सोशल मीडिया हा समुद्र आहे असे मानले, तर फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम किंवा यूट्यूब हे सगळे त्या समुद्रातले लहान मोठे मासे आहेत, असे म्हणता येईल. जे निरनिराळे बातम्यांचे बुडबुडे तयार करत असतात. लोक त्या बुडबुड्यांना जास्तीत जास्त हवा देऊन खळबळ निर्माण करत असतात.

सोशल मीडियाला खाद्य पुरवण्यात आघाडीवर असतात आपल्या ‘बी टाऊन’मधली मंडळी… जी प्रसिद्धीसाठी आणि लाईम लाईटमध्ये राहण्यासाठी काहीही करत असतात, असे म्हटले तरी चूक ठरू नये.

 

bollywood pairs inmarathi

 

प्रसिद्धी हा संसर्गजन्य रोग आहे. एकदा प्रसिद्धीची चटक लागली, की ती मिळवण्यासाठी लोक काहीही करू शकतात. कोणत्याही थराला जाऊ शकतात. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे भोजपुरी अभिनेत्री ‘त्रिशाकर मधु’ हिचा सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेला ‘एमएमएस’!

मधू ही भोजपुरी अभिनेत्री काही दिवसांपासून बरीच चर्चेत आहे. कारण काय तर या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ लिक झाला, ज्यामधे ती आपल्या मित्रासोबत इंटीमेट सीनमध्ये दिसली. लोकांनी आणि तिच्या चाहत्यांनी तिला यासाठी प्रचंड ट्रोल केले.

लोकांच्या या प्रतिक्रियेमुळे असे वाटत होते, की आता तिला भोजपुरी चित्रपटसृष्टीत स्थान मिळणार नाही, परंतु एमएमएस घोटाळ्याला फार काळ झाला नव्हता, तोपर्यंत त्रिशाकर मधूला भोजपुरी चित्रपट ‘नमक हरामची’ ऑफर देण्यात आली. या चित्रपटाचा फर्स्ट लूकही समोर आला आहे. यातून हेच दिसून येते की सारा खेळ प्रसिद्धीसाठी होता…

 

trisha kar madhu inmarathi

 

ही ‘खेला होबे’ सिचुएशन काही पहिल्यांदा झाली नाही. या आधीही सर्वांच्या लाडक्या ‘बी टाऊन’ म्हणजे बॉलीवूड मधल्या काही सेलेब्रिटींनी सुदधा असे एमएमएस कांड केले आहेत. आज त्रिशाकर मधुच्या एमएमएसवरुन पुन्हा चर्चेत आलेल्या त्या ‘एमएमएस’ची आपण स्टोरी जाणून घेऊ…

१. मोना सिंग

जस्सी जैसी कोई नही. या टिव्ही मालिकेतून घराघरात पोचलेली मोना सिंग ही चुलबुली अभिनेत्री तिच्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. ती ही एका स्कँडलमध्ये अडकली होती.

एका बनावट क्लिपमध्ये एका मुलीला अर्धनग्न अवस्थेत खोलीत फिरताना दाखवण्यात आले जिचा चेहरा मोनाचा होता. एमएमएस वृत्तवाहिन्या आणि इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. जेव्हा मोनाला या क्लिपबद्दल कळले तेव्हा तिने दावा केला की ती व्हिडिओक्लिप खोटी आहे.

 

mona singh mms inmarathi

 

२. करीना आणि शाहिद कपूर

करीना आणि शाहिद कपूर ही ‘बी टाऊन’मधली एकेकाळची सर्वात हिट आणि हॉट जोडी सुद्धा त्यांच्या लिक झालेल्या एमएमएसमुळे चर्चेत आली होती.

हे दोघेही तेव्हा रिलेशनमध्ये होते. या व्हायरल एमएमएसमुळे त्यांचे नाते सार्वजनिक झाले. या एमएमएस त्यांचा नसल्याचे दोघांचेही म्हणणे होते. तरी त्यावर कोणी विश्वास ठेवला नाही.

 

shahid kapoor and kareena mms inmarathi

३. प्रीती झिंटा

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असलेली प्रीती, बॉलिवूडच्या एमएमएस घोटाळ्यांपासून दूर राहू शकली नाही. ती बॉलिवूडमधील आणखी एक अभिनेत्री होती, जिची बनावट क्लिप इंटरनेटवर व्हायरल झाली होती.

 

preity zinta mms inmarathi

 

या क्लिपमध्ये प्रीती आंघोळ करताना दाखवली गेली होती. मात्र, प्रीतीने क्लिपचा भाग असल्याचे पूर्णपणे नाकारले. आपल्या कॉलममध्ये लिहून प्रीतीने या स्कॅम्स ताशेरे ओढले होते.

४. मल्लिका शेरावत

ज्या अभिनेत्रीचे नुसते नाव घेतले तरी तिची बोल्ड प्रतिमा डोळ्यांसमोर येते त्या मल्लिका शेरावत हिला देखील बनावट एमएमएस स्कँडलचा सामना करावा लागला.

एका व्हिडीओ क्लिपमध्ये तिला शरीरसुख घेताना दाखवले गेले आणि पार्श्वभूमीवर ‘मर्डर’ चित्रपटातील गाणे वाजत होते. अर्थात मल्लिकाने क्लिपचा भाग असल्याचे नाकारले होते.

 

mallika sherawat murder inmarathi

 

५. ईसाबेला कैफ

केवळ बॉलीवूडमधील सेलेब्रिटीच नाहीत तर त्यांची भावंडे सुद्धा या एमएमएस कांडची शिकार झालेली आहेत. व्हायरल झालेल्या एका पॉर्न क्लिपमध्ये ईसाबेला दिसली होती. कतरिनाने ती क्लिप बनावट असल्याचे सांगत बहिणीची पाठराखण केली होती.

 

issabelle kaif mms inmarathi

 

६. अश्मित पटेल – रिया सेन

त्यांनी काम केलेल्या चित्रपटांपेक्षा जास्त, या बॉलिवूड एमएमएस वादाने त्यांना प्रकाशझोतात आणले. या जोडप्याचे खाजगी क्षण एका व्हिडिओमध्ये लीक झाले. तथापि, दोन्ही कलाकारांनी व्हिडिओचा भाग असल्याचे नाकारले.

 

riya sen and ashmit patel inmarathi

कालांतराने अश्मित पटेलने हे मान्य केले होते, की ती क्लिप त्याचीच होतीपण  ती व्हायरल कशी झाली याबद्दल त्याला ठाऊक नाही.

७. शर्लिन चोप्रा

शर्लिन चोप्रा,जी ट्विटरवर आपल्या बोल्ड इमेजसाठी ओळखली जाते आणि जिने आपल्या प्लेबॉय अभिनयाने आणि नंतर आलेल्या ‘कामसूत्र’ या चित्रपटाद्वारे सर्वांना रोमांचित केले, ती देखील या एमएमएस घोटाळ्यात अडकली होती. तिचा चेंजिंग रूममध्ये कपडे बदलतानाचा व्हिडिओ लीक झाला होता.

 

sherlyn chopra inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?