'बाहुबली विरुद्ध बॅटमॅन - ह्या फाईटमध्ये कोण जिंकेल? वाचून बघा - आश्चर्यचकित व्हाल!

बाहुबली विरुद्ध बॅटमॅन – ह्या फाईटमध्ये कोण जिंकेल? वाचून बघा – आश्चर्यचकित व्हाल!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

बाहुबली चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरात इतका धुमाकूळ घातलं आहे की त्याची प्रशंसा करण्यामध्ये हॉलीवूडकर देखील मागे नाहीत. त्यांनी तर बाहुबलीला (दोन्ही बाहुबली बरं का! पहिला आणि दुसऱ्या भागामधील) थेट सुपरहिरोंच्या पंक्तीत नेऊन बसवले आहे. सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन, कॅप्टन अमेरिका यांसारख्या नावाजलेल्या सुपरहिरोंबरोबर त्याची तुलना होऊ लागली आहे. असाच एक तुलनात्मक प्रश्न क्वोरा वर विचारला गेला होता.

प्रश्न होता- बाहुबली विरुद्ध बॅटमॅन – ह्या फाईटमध्ये कोण जिंकेल?

bahubali-vs-batman-marathipizza00
(इथे आपण पहिल्या पार्टमधील शिवा म्हणजेच महेंद्र बाहुबलीची तुलना करतोय)

आणि या प्रश्नाला अगदी समर्पक उत्तर दिलंय, Tom Thomas यांनी.. ते म्हणतात,

एकीकडे असा सुपरहिरो अर्थात बाहुबली आहे जो उंचच उंच डोंगरावर लीलया चढतो काय, दऱ्यांवरून सहज उड्या मारतो काय, सामान्य मनुष्याला शक्य नाही अश्या गोष्टी हातोहात करतो काय..वगैरे…वगैरे, तर दुसरीकडे आहे बॅटमॅन नावाचा सुपरहिरो. ज्याच्याकडे आहे प्लॉट आर्मर, जे अतिशय शक्तिशाली आहे. यामुळेच बॅटमॅनला सहजासहजी हरवण आपल्या भारतीय सुपरहिरो बाहुबलीसाठी सोप्प नाहीये.

जेव्हा कधी हे दोघ समोर उभे ठाकतील तेव्हा नक्कीच बॅटमॅनचं पारडं जड असणार, कारण काही झाले तरी बाहुबली हा एक मनुष्य आहे. त्याच्याकडे पिळदार शरीर आणि महत्त्वकांक्षा या शिवाय दुसरी कोणतीही शक्ती नाही की अस्त्र नाही. बॅटमॅन देखील एक मनुष्यचं आहे पण त्याच्याजवळील प्लॉट आर्मरमुळे तो सुपरहिरो ठरतो. तरीही बाहुबलीला एका झटक्यात हरवणे त्यालाही सोप्पे नाही, कारण बाहुबली अतिशय चपळ आहे, त्याच्या अंगात शंभर हत्तीचं बळ आहे, त्यामुळे लढाईत जेथे कुठे बॅटमॅनने त्याला हात उघडण्याची संधी दिली तर तेथे बॅटमॅन नक्की बाहुबली कडून मार खाणार.

bahubali-marathipizza
timesnow.tv

इथे जर आपण बॅटमॅनकडून त्याच्या प्लॉट आर्मर मधली शक्ती काढून घेतली आणि त्यानंतर बाहुबली आणि बॅटमॅनला लढाईसाठी सामोरासमोर उभं केलं तरच ती लढाई बरोबरीची ठरेल, कारण तेव्हा दोघांकडेही कोणतीही सुपर पावर्स, गॅजेट्स नसतील. दोघांनाही केवळ आपल्या शारीरिक शक्तीच्या आधारावर मुकाबला करायचा आहे. जर दोघांची केवळ शारीरिक शक्तीच्या आधारावर तुलना करायची झाली तरी काही अंशी बॅटमॅनच सरस ठरतो, कारण बाहुबलीच्या पहिल्या पार्टमध्ये एक प्रसंग होता जेथे तो एका डोंगरावर असंख्य सैनिकांना एकट्याने मारतो, पण त्याला त्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते, त्या जागी जर बॅटमॅन असता तर त्याने अगदीच काही मुव्ह्ज वापरुन बाहुबली पेक्षा कमी वेळामध्ये त्या सैनिकांन लोळवलं असतं. ज्यांना बॅटमॅन म्हणजे किती पोचलेला सुपरहिरो आहे, हे माहित आहे, त्यांना हे देखील नक्कीच माहित असणार की बॅटमॅनचा एक ठोसा समोरच्याला गार करण्यास कसा पुरेसा आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅटमॅन त्याच्या सूटमुळे शक्तिशाली आहे असा कोणाचा समाज असेल तर तो आताच काढून टाका, कारण तो सूटशिवायही एका फटक्यात कोणत्याही वस्तूचे तुकडे करू शकतो.

batman-marathipizza
youtube.com

हे उत्तर पाहून असे वाटते की भले बॅटमॅन जरी बाहुबलीसमोर कसाही लढाईला उभा राहिला तरी तोच जिंकणार. पण आपल्या भारतीय सुपरहिरोला कमी लेखून चालणार नाही कारण या लढाईत बॅटमॅनला देखील बाहुबलीचे जबरदस्त ठोसे खावे लागणार हे देखील खरे! 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?