' गाण्यातला झंडू बाम कंपनीला चांगलाच झोंबला! नंतर तीच मुन्नी बनली ब्रँड अँबेसेडर

गाण्यातला झंडू बाम कंपनीला चांगलाच झोंबला! नंतर तीच मुन्नी बनली ब्रँड अँबेसेडर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

बॉलीवूडच्या सिनेमांची ओळख म्हणजे त्यातलं संगीत, मूकपटांपासून सुरु झालेला सिनेमाचा प्रवास अखेर बोलपटांकडे वळला. सिनेमांमध्ये तंत्रज्ञान येऊ लागले कृष्णधवल सिनेमे  रंगीत होऊ लागले.

सिनेमाच्या बदलत्या तंत्राबरोबरीने सिनेमातील संगीतात सुद्धा अनेक बदल झाले. पूर्वी लोक संगीत ऐकण्यासाठी खास संगीत नाटक बघायला जायचे मात्र सिनेमात गाणी येऊ लागली आणि लोक रेडिओवर ती गाणी ऐकू लागले.

 

old music inmarathhi
mrandmrs55.com

सिनेमातील संगीत जस बदलत गेलं तशी गाणी सुद्धा बदलत गेली. पूर्वी संथ चालीची असलेली गाणी काळाप्रमाणे उडत्या चालीची होत गेली. त्यातच सत्तर ऐंशीच्या काळात एक नवा ट्रेंड उदयास आला तो म्हणजे आयटेम सॉंग. शोले मधलं मेहबुबा  किंवा डॉन मधला ये मेरा दिल, आजही या आयटम सॉंग्सची  जादू कायम आहे. आयटम सॉंग हे सिनेमातील एक्का असल्याने दिगदर्शक आवर्जून याचा वापर करत.

 

bollywood songs in hollywood inmarathi 1
indianquarterly.com

आयटेम सॉंग ट्रेंड हिट होत होता पण त्याच ट्रेंडमध्ये अश्लीलपणा, दुहेरी अर्थाची गाणी येऊ लागली. चोली के पीछे क्या है सारख्या गाण्यांनी अनेक वाद निर्माण झाले होते. असाच वाद एका आयटेम सॉंग मुळे झाला होता काय नेमका वाद होता? चला तर मग जाणून घेऊयात..

जरा आपण दहा वर्ष आधी जाऊयात, जेव्हा सलमान खानचे कोणतेच सिनेमे चालत नव्हते. बुडत्याला काडीचा आधार म्हणून त्याने साऊथच्या रिमेकचा आधार घेतला. सलमानने वॉन्टेड केला आणि सुपरहिट ठरला, मात्र पुढे काय? सलमान एका सुपरडुपर हिटच्या प्रतीक्षेत होता. आणि त्याला स्क्रिप्ट मिळाली.

 

salman khan dabang goggle inmarathi

 

अनुराग कश्यपच्या भावाने आपल्या भावाच्या पायावर पाय ठेवत दिग्दर्शनात पाऊल टाकले. उत्तर प्रदेशमधल्या एका पोलीस ऑफिसरच्या धर्तीवर हा सिनेमा होता. यूपीच्या स्टाईलनुसार सिनेमाला नाव दिले गेले ते म्हणजे दबंग. प्रेक्षकांचा टाळ्या शिट्या मिळतील असे संवाद, सलमानचा दबंग अंदाज, दमदार पार्श्व्संगीत अशी उत्तम भट्टी जमली होती.

इतका मसाला सिनेमात होताच त्याला फोडणी देणार आयटेम सॉंग ही टाकण्यात आलं, सलमानच्या घरचाच सिनेमा असल्याने  भावाच्या बायकोला घेऊन गाणे करायचे ठरले. तत्पूर्वी या गाण्याचे देखील अनेक किस्से सांगितले जातात, या सिनेमात खरं तर हे गाणे आले ते जतीन ललित या संगीतकारणांमुळे, या सिनेमाचे संगीतकार होते साजिद वाजिद मात्र जतीन आणि ललित यांनी अरबाजच्या मागे लागून हे गाणे सिनेमात टाकायला लावले.

 

munni inmarathi 1

 

सुरवातीला असं ठरलं होते की या गाण्यात सलमान नको म्हणून पण नंतर सलमानला या गाण्यात घेण्यात आले. सलमानच्या एंट्रीने तर या गाण्याला चार चांद लावले. याच गाण्यात एक वस्तूचा उल्ल्लेख होता जी वस्तू आज अनेकांच्या वेदना दूर करते ती म्हणजे बाम, झंडू बामचा वापर गाण्यात केल्याने साहजिकच कॉपीराइटचा मुद्दा घेऊन कंपनीने कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवले.

कंपनीने कायदेशीर कारवाई केल्याने सिनेमाकर्त्यांनी कंपनीशी वाटाघाटी करण्याचे ठरवले. आटल्यात आत दोघांची सेटलमेंट झाली आणि कंपनीनें थेट मलयकाला वर्षाच्या करारावर ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित केले.

 

zandu bam inmarathi

आज मार्केटिंग आणि कॉर्पोरट सेक्टर या क्षेत्रात गळेकापू स्पर्धा असतेच त्यात सिनेमा हे माध्यम एखाद्या वास्तूच्या मार्केटिंगसाठी एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे कंपनीच्या हे लक्षात आले की जो दिखता है वही बिकता है, गाणं सुपरहिट ठरतंय हे लक्षात आल्यावर कंपनीने लगेचच माघार घेऊन चक्क मलयाकचा ब्रॅण्डिंग म्हणून वापर केला.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?