' बॅन कुराण ॲप, चीनच्या अटींसमोर झुकून ॲप्पलने बंदीला लगेच होकार दिला, असं का?

बॅन कुराण ॲप, चीनच्या अटींसमोर झुकून ॲप्पलने बंदीला लगेच होकार दिला, असं का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

चीन हा देश नेहमीच आपल्या हेकेखोर विचारांमुळे चर्चेत येत असतो. महासत्ता म्हणून जगभरात मिरवण्याची इच्छा असलेला हा देश कायमच माणसांना एखाद्या यंत्रासारखं वागवत असतो.

चीनमध्ये काम करण्यासाठी येणाऱ्या लोकांनी आपला धर्म, आपली श्रद्धा हे सगळंच विसरून फक्त कामच करावं अशी त्या देशाची, तिथल्या लोकांची अपेक्षा असते. मुस्लिम धर्मीय लोकांवर मध्यंतरी चीनने केलेले अत्याचार आपण सर्वांनीच बघितले.

आपलं धोरण, किचकट नियमावली रेटण्यासाठी चीनने नुकतंच ‘आयटी महासत्ता’ असलेल्या अमेरिकेच्या मायक्रोसॉफ्ट आणि अॅपल सारख्या दिग्गज कंपन्यांना चीनने त्यांचे जगभरात लोकप्रिय ‘लिन्क्ड इन’ आणि ‘कुराण माजिद’ या अॅप्लिकेशनवर बंदी आणून आपल्या आडमुठेपणाचं पुन्हा एकदा दर्शन करून दिलं आहे.

 

app inmarathi1

 

अॅपल सारख्या कंपनीने चीनसमोर झुकून त्यांच्या सर्व अटी मान्य केल्या आहेत. अॅपलने चीनसमोर झुकणं हे सध्या का चर्चेत आहे? 

‘कुराण माजिद’ या अॅप्लिकेशन बद्दल दिड लाख लोकांनी रिव्ह्यू देऊन त्याला जगातील सर्वात लोकप्रिय अॅप पैकी एक म्हणून दर्जा दिला आहे.

चीनमध्ये रहाणारे मुस्लिम लोक या अॅप द्वारे आपल्या धर्मग्रंथात दिलेली माहिती नियमित वाचायचे आणि ती इतरांसोबत शेअर सुद्धा करायचे, पण झिंगपिंगच्या डोळ्यात हे खुपलं आणि त्यावर बंदी आणली.

कमालीची गोष्ट ही आहे, की भारतातील प्रत्येक छोट्या बदलांवर ताशेरे ओढणाऱ्या मुस्लिम बांधवांना चीन मध्ये कुराण माजिद वर चीन मध्ये आलेली ही बंदी अजूनही डोळ्यात खुपत नाहीये. शिवाय, चीन मधल्या मुस्लिम बांधवांना अजूनही तिथे रहाणं ‘असह्य’ वगैरे होत नाहीये.

चीनने अॅपलला स्पष्ट शब्दात हे सांगितलं, की “कुराण माजिद’ या अॅप मधील माहितीत बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, हे अॅप आम्ही चीनमध्ये चालू देणार नाही.”

 

app inmarathi

 

कोणतीही कंपनी सेवा देतांना आपला होणारा फायदा बघत असते. अॅपलने तेच केलं. ‘कुराण माजिद’ मध्ये बदल करणं तर त्यांना शक्य नव्हतं आणि चीन मधून आपले सर्व फोन तयार करून ‘चीन से पंगा’ घेणं हे काही अॅपलला शक्य नव्हतं. मग काय, अॅपलने ‘कुराण माजिद’ या अॅपचे निर्माते ‘पीडीएमएस’ला सांगितलं, की चीन मध्ये आपल्याला हे अॅप सुरू ठेवता येणार नाही.”

अॅपल कंपनीला जेव्हा अशी कोणतीही विनंती इतर देशातून येते, तेव्हा ती अॅपल कडून त्वरित झिडकारली जाते. त्यावर बरेच हॅशटॅग तयार केले जातात. त्या देशाची मागणी कशी चुकीची आहे हे दर्शवण्यासाठी अॅपलचे भाडोत्री ट्विटरवीर पुढे सरसावतात, त्या देशातील डाव्या आघाडीचा पाठींबा मिळवतात आणि आपलं अॅप त्या देशात सुरू ठेवतात.

 

apple iphone InMarathi

 

चीनमध्ये मात्र यापैकी काहीच घडतांना दिसत नाहीये. आज चीन मध्ये रहाणारे जवळपास १० लाख लोक हे ‘कुराण माजिद’वर आणलेल्या बंदीचं कारण चीनच्या ‘सायबर स्पेस’ कडून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, पण चीन सरकार त्यांना कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये.

चीनने सुरू केलेल्या ‘क्रॅकडाऊन’ या मिशन अंतर्गत आधी कुराण माजिद आणि नंतर ‘ओलिव्ह ट्री’ या कंपनीने तयार केलेल्या ‘बायबल’च्या अॅप वर बंदी आणली आहे.

बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, अॅपलच्या मानवाधिकार समितीने या पूर्ण प्रकरणावर अशी प्रतिक्रिया दिली आहे, की “आम्हाला प्रत्येक देशातील स्थानिक सरकारची संमती घेऊनच प्रत्येक गोष्ट करावी लागते. काही वेळेस आमच्यात मतभिन्नता देखील असते.”

चीनने केवळ मायक्रोसॉफ्ट, अॅपल या कंपन्यांनाच त्रास दिला आहे असं नाहीये. ‘अपनी दुकान’ म्हणून भारतात पाय पसरवलेल्या ‘अमेझॉन’ला सुद्धा चीनच्या धोरणांचा नुकताच फटका बसला आहे.

अमेझॉनच्या ‘ऑडीबल’ या अॅप्लिकेशनला चीनने नुकतंच आपल्या देशातून हद्दपार केलं आहे. परवानगी रद्द करून अशा काही अटी अमेझॉनसमोर ठेवल्या, की त्या अटी मान्य करण्यापेक्षा ‘ऑडीबल’चा गाशा गुंडाळणं हे अमेझॉनला योग्य वाटलं.

चीन सरकारला बीबीसी या वृत्तसंस्थेने त्यांच्या या सर्व कारवायांबद्दल माहिती देण्याची विनंती केली आहे, पण बीबीसीला काही स्पष्टीकरण द्यावं  हे चीनला गरजेचं वाटलं नाहीये.

चीन मधील कम्युनिस्ट पक्ष हा ‘इस्लाम’ धर्म मानतो, मुस्लिम लोकांच्या मानवाधिकारांची काळजी घेण्याची ग्वाही देतो, पण प्रत्यक्षात असं काहीच घडतांना दिसत नाहीये.

झिनजीयांग या शहरात मध्यंतरी ‘उयघुर एथनिक ग्रुप’वर चीनच्या लोकांकडून होणारे अत्याचार हे सर्वश्रुत आहेतच. त्यामध्ये ‘कुराण माजिद’ या अॅपच्या बंद पडल्याने चीनचं मुस्लिमविरोधी धोरण हे अजूनच अधोरेखित झालं आहे.

 

app inmarathi2

 

‘कुराण माजिद’ हे अॅप जगभरातील साडेतीन कोटी वाचक नियमितपणे वापरत असतात, पण चीनमध्ये ते बंद करून अॅपल ने स्वतःच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

हे तेच अॅपल आहे ज्याचे प्रवक्ते ‘टीम क्रूक’ यांनी २०१७ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुस्लिमविरोधी धोरणावर ताशेरे ओढले होते. आज त्याच ‘टीम क्रूक’ने चीनमधून ‘कुराण माजिद’ हे अॅप बंद करून स्वतःचं हसं करून घेतलं आहे.

अॅपलच्या सेन्सॉरशिपचे प्रोजेक्ट डायरेक्टर बेंजमीन इस्माईल यांनी असं विधान केलं आहे की, “अॅपल हे सध्या बीजिंगच्या सेन्सॉरशिपनुसार आपली पाऊलं उचलत आहे.”

प्रत्येक क्षेत्रात प्रथम क्रमांक मिळवण्याची इच्छा बाळगणाऱ्या चीनने सर्वात श्रीमंत, सर्वात शक्तिशाली ही बिरुद मिळवली आहेत, सर्वाधिक ‘दहशत’ असलेलं राष्ट्र म्हणून सुद्धा जगप्रसिद्ध होत आहे.

ही ओळख लोकांना कधी ठळकपणे जाणवेल ? हा एक प्रश्न आहे. त्या बरोबरीनेच, चीनच्या वस्तू न खरेदी करण्यासाठी जगातील लोकांना अजून किती दाखले द्यावे लागतील हा पण एक प्रश्न नेहमीच अनुत्तरित असतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?