' सेक्स क्लीप, अनौरस मुलगा आणि नव्वदीत लग्न : फिल्मी (खल?) नायकाला लाजवेल असा रंगेल नेता – InMarathi

सेक्स क्लीप, अनौरस मुलगा आणि नव्वदीत लग्न : फिल्मी (खल?) नायकाला लाजवेल असा रंगेल नेता

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राजकारणाच्या मैदानात आक्रमक असलेले नेतेमंडळी खऱ्या आयुष्यात रंगेल असतात हे वेगळं सांगायला नको. एरव्ही बड्याबड्या विरोधकांना चीत करणाऱ्यांची ‘बाईच्या नादी’ लागल्याने दांडी गुल्ल झाल्याची अनेक उदाहरणं इतिहासात सापडतात.

विमानात दारुच्या नशेत हवाई सुंदरीशी लगट करणाऱ्या रामराव आदिकांना थेट महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं, तर काही महिन्यांपुर्वीच विवाहबाह्य संबंधांवरून धनंजय मुंडे अशाच टिकेला सामोरे गेले होते.

 

dhananjay munde inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

मात्र देशाच्या राजाकारणात एक नाव असं आहे, ज्यांनी ‘वादग्रस्त’ असण्याच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. कॅमेऱ्यात कैद झालेलं ‘सेक्स स्कॅन्डल’ ते थेट स्वतःच्याच मुलाला अनौरस ठरवणं यांसारख्या विचित्र घटनांनी ज्यांचं आयुष्य बॉलिवूडच्या चित्रपटापेक्षाही रंजक, थरारक बनवलं होतं, ती व्यक्ती म्हणजे ‘एन डी तिवारी’!.

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, उत्तराखंड, उत्तर प्रदेश यांचे माजी मुख्यमंत्री अशा विविध धुरा सांभाळणारे एन डी तिवारी अर्थात नारायण दत्त तिवारी यांची राजकीय कारकीर्द इतर नेत्यांप्रमाणे असली तरी वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनांमुळे ‘तिवारी’ हे नाव जगभरात गाजलं होतं.

 

tiwari inmarathi

 

१९९० च्या दशकात तिवारी हे पंतप्रधान पदाचे तगडे दावेदार मानले जात असतानाच पी व्ही नरसिंहराव यांनी बाजी मारली. याच रागात पुढे १९९४ साली तिवारी यांनी कॉग्रेसला रामराम ठोकत तिनवारी कॉंग्रेस या स्वंतंत्र पक्षाची स्थापना केली, मात्र तिवारींचा आठमुठेपणा आणि पक्ष हे दोन्हीही जास्त काळ तग धरू न शकल्याने पुन्हा एकदा तिवारी मुख कॉंग्रेसमध्ये परतले.

पती-पत्नी आणि तो

कॉंग्रेसमध्ये परतल्यानंतर तिवारींच्या आयुष्यात अशी एक घटना घडली जिचे परिणाम त्यांना आयुष्याच्या अखेरपर्यंत भोगावे लागले. उज्वला शर्मा या महिलेने तिवारी हे आपले पती असून या संबंधांतून आपल्याला एक तरुण मुलगा असल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर राजकीय वर्तुळात नवी त्सुनामी आली. याचा सर्वाधिक परिणाम अर्थातच कॉंग्रेसला भोगावा लागला.

सुरवातीला तिवारी यांनी ‘तो मी नव्हेच’ म्हणत या प्रकरणातून नामानिराळे होण्याचा पुरेपुर प्रयत्न केला, यासाठी आपली राजकीय आणि आर्थिक ताकदही लावली मात्र या खेळात आईसह जेंव्हा त्यांचा मुलगा रोहित उतरला तेंव्हा मात्र ते चांगलेच घाबरले.

 

rohit tiwari inmarathi

 

२००८ साली या प्रकरणात रोहितने थेट कायद्याची मदत घेत तिवारी हेच आपले खरे वडील असून आता ते आपल्याला नाकारत असल्याची दाद मागितली. ३४ वर्षांपुर्वी आई उज्वला आणि एन डी यांच्या संबंधातून आपला जन्म झाल्याचे रोहितने सांगताच तेंव्हा ती हेडलाईन ठरली होती.

चार वर्ष कोर्टात तिवारी विरुद्ध रोहित हा खटला सुरु होता, ‘हा माझा मुलगा नाही’ या मतावर ठाम असणारे तिवारी आणि हेच माझे वडील म्हणणारा रोहित हे प्रकरण त्यावेळी बरचं गाजलं, मात्र त्याला खरी कलाटणी मिळाली तीर २०१२ साली जेंव्हा कोर्टाने रोहितला डिएनए तपासणीची परवानगी दिली. तेंव्हा न्यायालयाने हे ही निक्षून सांगितलं की या तपासणीसाठी जर तिवारींनी सहकार्य केलं नाही तर पोलिसांचीही मदत घेता येईल, आणि नेमके इथेच तिवारी फसले.

त्या डिएनए टेस्टने हे सिद्ध केलं की रोहित हा तिवारी यांचाच मुलगा आहे. अखेर तिवारींना पळवाट न उरल्याने त्यांनी हे नाचं मान्य केलं, आणि आपला वारसदार म्हणून रोहितचा स्विकार केला.

 

n d tiwari inmarathi

 

नव्वदीतला नवरदेव

मुलाला स्विकारून ते शांत बसले नाहीत, उलट या प्रकरणात गेलेली आब्रू सावरण्यासाठी त्यांनी रोहितची आई उज्वला शर्मा हिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिवारी जेंव्हा बोहल्यावर चढले तेंव्हा ते तब्बल नव्वद वर्षांचे होते.

 

n d tiwari 1 inmarathi

 

तेंव्हा हा विवाह चांगलाच गाजला होता. मात्र त्यांच्या या करामतीमुळे ना त्यांची प्रतिमा उजळली ना कॉंग्रेसमध्ये त्यांचं वर्चस्व वाढलं.

तिवारी आणि सेक्स स्कॅन्डल

२००८ साली रोहितमुळे तिवारींच्या खाजगी आयुष्यात वादळ आलं. या घटनेला एक वर्ष होत असलं तरी कॉंग्रेस या धक्क्यातून सावरली नव्हती. मात्र तिवारींची प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांना आंध्रप्रदेशचे राज्यपालपद दिले. मात्र त्यानंतरही कॉंग्रेसमागील शुक्लकाष्ट संपलं नाही,

२००९ सालं एन डी तिवारींच्या राजकीय जीवनात भूकंप आणणारं ठरलं. यापुर्वीही आपल्या वादग्रस्त विधानासह रंगेल वृत्तीमुळे ते चर्चेत असायचे, मात्र याआधी त्यांच्याविरोधात फारसे पुरावे सापडले नव्हते.

२००९ साली आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी ते नियुक्त होते, अशातच एकेदिवशी एका तेलगू चॅनलने एक व्हिडीओ प्रसारित केला आणि देशासह परदेशी मिडीयातही खळबळ माजली. कारण या वृत्तवाहिनीने प्रदर्शित केलेल्या व्हिडिओत चक्क कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तिवारी तीन तरुणींसह आक्षेपार्ह अवस्थेत दिसत होते.

 

n d scandle inmarathi

यावेळी नशेत धुंद असलेले तिवारी या तिन्ही तरुणींसह दंगा करताना, त्यांच्याशी अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ प्रदर्शित झाला. त्यानंतर या तरुणींनीही तिवारी यांच्याशी असलेले संबंध  आणि त्यांचा रंगेल स्वभाव याविषयी कबुली दिली आणि तिवारी यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली.

विरोधकांचा प्रचंड हल्लाबोल यांमुळे कॉंग्रेसने अखेर नमतं घेतलं आणि तिवारींनी राज्यपालपदाचा राजीनामा दिला.

 

tiwari 1 inmarathi

 

मात्र त्यानंतरही आपला या प्रकरणात काहीही सहभाग नाही, ही विरोधकांची खेळी आहे असा टेंभा मिरवणाऱ्या तिवारींनी आठमुठेपणा सोडला नाही. १८ ऑक्टोबर २०१८ रोजी तिवारी यांचं वृद्धापकाळाने निधन झालं, मात्र आजही त्यांच्या वादग्रस्त विधानांसह कृतींच्या चर्चा रंगतात.

राजकारण्यांचं व्यक्तीमत्व हे विविध रंगांनी बहरेलंल असतं हे मान्य मात्र आपल्या एकाच आयुष्यात इतक्या विविध टिकांना, गंभीर प्रसंगांना सामोरं जाणारा आणि तरिही प्रत्येक घटनांतून सहीसलामत सुटून आपली खुर्ची कायम राहणारा हा नेता वादग्रस्त नेत्यांच्या यादीत आपलं स्थान राखून आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?