' केस कापले तर जास्त वाढतात? - या ६ गोष्टी म्हणजे सत्य आहे की फक्त अफवाच...?

केस कापले तर जास्त वाढतात? – या ६ गोष्टी म्हणजे सत्य आहे की फक्त अफवाच…?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

केस हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. सौंदर्य उत्तम असावं यासाठी ज्या गोष्टींना प्राधान्य दिल जातं, त्यातलीच एक गोष्ट म्हणजे केस! या केसांची निगा राखणं, त्यांची योग्य काळजी घेणं, यासाठी मेहनत घेणारे अनेक लोक तुम्हाला आजूबाजूला पाहायला मिळतील.

केसांची काळजी घेण्यासाठी वर्षानुवर्षे काही ऐकीव गोष्टी पाळल्या जातात. कधी आजीने, कधी मित्रांनी वगैरे सांगितलेल्या या गोष्टी आपण ऐकतो आणि त्यावर विश्वास सुद्धा ठेवतो. पण यातल्या अनेक गोष्टी अशा आहेत, जे सत्य नसून चक्क अफवा आहेत.

 

grey hairs inmarathi
scroll.in

 

आज अशाच काही अफवांबद्दल जाणून घेऊयात. ज्यामुळे यापुढे केसांची काळजी घेताना मनातले गैरसमज तरी दूर झालेले असतील.

१. केस कापले तर अधिक वाढतात…

केस नियमितपणे कापले तरच वाढतात अन्यथा त्यांची वाढ खुंटते किंवा मंदावते असं जर तुम्ही ऐकलं असेल तर ही गोष्ट साफ चुकीची आहे हे लक्षात घ्या. ६ ते ८ आठवड्यातून एकदा केस कापावेत म्हणजे ते अधिक वाढतात असं सलूनमधील मंडळी, आजी-आजोबा किंवा इतरही काही जण सांगत असतील. पण यामुळे केसांची वाढ अधिक होते ही बाब चुकीची आहे.

 

hair cutting inmarathi

 

केसांची काळजी घेण्यासाठी ते नियमितपणे कापले जाणं हा पर्याय उत्तम आहे. त्यामुळे केसांच्या इतर समस्या दूर होण्यास मदत होईल. केसांची निगराणी करणं सोपं जाईल. स्प्लिट एंड्सची वाढ न झाल्याने, केस एकमेकांमध्ये गुंतून तुटणं कमी होईल. यामुळे ते अधिक वाढल्यासारखे भासतील. मात्र, खरं तर केसांची वाढ अधिक प्रमाणात झालेली नसते.

२. केस रोज विंचरले, तर अधिक वाढतात.

आजीकडून बऱ्याच मुलींनी अनेकदा ऐकलं असेल, की ‘दिवसातून १०० वेळा तरी केसांतून फणी फिरली पाहिजे, म्हणजे वाढ अधिक होते.’ असं केल्यामुळे डोक्यावरील नैसर्गिकरित्या तयार होणारं तेल व्यवस्थित पसरण्यास मदत होते असंही सांगितलं जातं. प्रत्यक्षात मात्र सतत केस विंचरल्यामुळे ते अडकून तुटण्याची शक्यता वाढू शकते.

 

hair loss inmarathi

 

केस दिवसातून कितीवेळा विंचरावे, याविषयी कुठलाही लिखित पुरावा नाही.

३. शाम्पूचा वापर केल्याने केसांची वाढ खुंटते

शाम्पूचा अतिवापर केल्याने केसांचं आरोग्य नक्की बिघडतं असं तुम्ही ऐकलं असेल, तर त्यात काहीही तथ्य नाही. केस रोज धुण्याची किंवा रोज शाम्पू करण्याची आवश्यकता नसते, हे जरी खरं असलं तरीही शाम्पूमुळे केसांची वाढ रोखली जाते असं म्हणता येत नाही.

गरज असेल त्यावेळी योग्य त्या प्रमाणात शाम्पूचा वापर करायला हवा. केसांची मुळं तेलकट झाली असतील, डँड्रफचा त्रास असेल, तर शाम्पूचा वापर योग्य ठरतो.

 

hair wash inmarathi1

 

४. पांढरे केस उपटले तर इतर केसही पांढरे होतात

हल्लीच्या काळात लहान वयातच केस पांढरे होण्याचं प्रमाण काहीसं वाढलेलं पाहायला मिळतं. लहान वयातच पांढरे झालेले केस दिसायला नकोत म्हणून केस डाय करणं, मेंदी लावणं हे प्रकार केले जातात. एखाद-दुसराच केस पांढरा झाला असेल, तर तो उपटून टाकण्याचा पर्याय निवडला जातो.

 

hair dye inmarathi

 

डाय आणि अनैसर्गिक मेंदी यामुळे केसांवर केमिकलचा मारा होऊ शकतो. जे केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. मात्र, ‘पांढरे केस उपटून टाकले, तर इतर केस लवकर पांढरे होतात’ या मान्यतेला मात्र कुठलाही शास्त्रीय पुरावा नाही.

५. ठराविक काळानंतर शाम्पू आणि कंडिशनर बदलावा

आपल्याला आवडणारा आणि योग्य वाटणारा शाम्पू आणि कंडिशनर यांचा वापर आपण करत असतो. त्यामुळे केसांना काहीही अपाय होत नाही याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मात्र जो शाम्पू वापरताय तो एका ठराविक काळानंतर बदलावा म्हणजे केसांचे आरोग्य उत्तम राहील, असं जर तुम्ही समजत असाल, तर हा एक गैरसमज आहे हे लक्षात घ्या.

 

hair wash inmarathi

 

शाम्पूचा वापर किती करावा, हे प्रत्येक व्यक्तीची लाइफस्टाइल, केसांची ठेवण, प्रवासाचा कालावधी आणि जागा इत्यादी गोष्टींवर अवलंबून असते.

६. पोनीटेलमुळे केस गळण्याची शक्यता असते

पोनीटेलच्या ताणामुळे केसांची मुळं दुखावली जातात आणि केस गळण्याची प्रक्रिया सुरु होते, असं म्हटलं जातं. मात्र हे पूर्ण सत्य नाही. पोनीटेल किंवा वेणीमुळे जर केसांच्या मुळांवर ताण येत नसेल, तर केस गळण्याचा धोका अजिबातच नाही.

 

ranvir singh ponytail inmarathi

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?