' तुमच्यात या ५ गोष्टी असतील तर गुगल मध्ये जॉब मिळवण्याचं तुमचंही स्वप्न हमखास पूर्ण होणार – InMarathi

तुमच्यात या ५ गोष्टी असतील तर गुगल मध्ये जॉब मिळवण्याचं तुमचंही स्वप्न हमखास पूर्ण होणार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जेव्हापासून गुगल आलंय तेव्हापासून जगामध्ये जणू क्रांतिकारी बदलंच झालाय म्हणा ना!

अगदी बोटांच्या काही हालचालीवर तुम्ही गुगलच्या मदतीने कोणती माहिती मिळवू शकत नाही ते सांगा! तर अश्या या गुगलमध्ये नोकरी मिळाली तर?

ज्याची बुद्धी शाबूत आहे असा मनुष्य तरी हि सुवर्णसंधी लाथाडणार नाही म्हणा. गुगलमध्ये नोकरी म्हणजे शब्दात वर्णन करता येणार नाही असा अनुभव असतो.

रग्गड पगाराची नोकरी, बक्कळ काम, पण त्याचं जास्त प्रेशर नाही. कंटाळा आला तर गुगलच्या ऑफिसमध्ये मनोरंजनासाठी गेम्सचे भरपूर प्रकार उपलब्ध असतात असंही ऐकलंय.

म्हणजे एका वाक्यात म्हणायचं झाल्यास गुगलची नोकरी म्हणजे चाकोरीबाहेरची नोकरी होय, जिथे तुम्हाला काम करायचा अजिबात कंटाळा येणार नाही.

 

google-job-marathipizza0
digitalinformationworld.com

 

पण ही देखील वस्तुस्थिती आहे की, गुगल मध्ये सहजासहजी कोणालाही नोकरी मिळत नाही. गुगलमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही असामान्य वगैरे असयला हवं असंही काही नाही, पण तुमच्या अंगी काही गुण असायला हवे.

चला तर जाणून घेऊया, गुगल मध्ये जॉब मिळवण्यासाठी काय असायला हवं?

१) चांगले मार्क्स

ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जी अजिबात नाकारून चालणार नाही. गुगलच्या नजरेत जर तुम्हाला यायचे असेल तर तुमचे मार्क्स वा ग्रेड्स हे मजबूत असले पाहिजेत.

गुगलचे मुलाखतकार रिझ्युमे वर सर्वात प्रथम त्याची शैक्षणिक कारकीर्द पाहतात.

 

fear-student-looking-at-exam-paper
isha.sadhguru.org

 

२) तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान

मार्क्स अत्यंत महत्वाचे आहेत पण पुरेसे नाहीत. गुगल ला पुस्तकी किडे नकोत.

 

chatur 3 idiots what you need to get job in google inmarathi

 

बऱ्याचदा होतं असं की एकही उमेदवारांचे मार्क्स चांगले असतात, पण त्यांना बाह्य जगाबद्दल जास्त माहिती नसते. त्यामुळे गुगलचे मुलाखतकार तुमची ज्ञान नुसते पुस्तकी आहे की व्यावहारिक आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.

जर तुम्हाला अनेक बड्या कंपन्यांमधील मुलाखतींचा अनुभव असेल तर तुम्ही त्यांच्या प्रश्नांची सहज उत्तरे देऊ शकाल.

पण जर पहिल्यांदाच तुम्ही एखाद्या बड्या कंपनीच्या मुखातीला सामोरे जाणार असाल तर मात्र तुमची बाह्य विषयांतील तयारी पक्की असयला हवी.

 

३) गुगलमधील कर्मचाऱ्यांशी संबंध:

जर तुम्ही गुगल मधील एखाद्या कर्मचाऱ्याला ओळखत असाल तर ठीक आहे. परंतु तुमची तशी एखादी बिलकुल ओळख नसेल तर तुम्ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून असे कॉन्टॅक्ट्स बिल्ड करणे गरजेचे आहे.

जेणेकरून तुम्हाला कंपनीविषयी माहिती नसलेल्या गोष्टी कळतात, ज्या मुलाखतीमध्ये सादर करून तुम्ही आपली जागा पक्की करू शकता.

 

google-job-marathipizza02
careersidekick.com

 

गुगल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला मार्गदर्शन मिळते. मुलाखतीमधील काही ट्रिक्स सांगितल्या जातात. तसेच ज्यांनी गुगलसाठी मुलाखत दिली आहे, पण रिजेक्ट झाले आहेत अश्या लोकांशी देखील संपर्क साधून त्यांनी ज्या चुका केल्या होत्या, त्या चुका देखील जाणून घेऊन त्या टाळण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता.

४) मेहनत करण्याची तयारी:

गुगलमधील नोकरी ही जरी छान वाटत असली तरी त्यातही तुम्हाला मेहनत करायची आहे हे विसरून चालणार नाही.

तिथे स्मार्ट वर्क हवं आहेच – पण हार्ड वर्क सुद्धा आवश्यक आहे. तुमचे काम वेळेत पूर्ण केले आणि त्यामध्ये सातत्य ठेवले तर तुम्हालाच तुमचे करियर बिल्ड करण्यामध्ये मदत होणार आहे.

 

 

५) नवनवीन गोष्टी शिकण्याची इच्छा:

गुगलमध्ये नोकरी मिळाल्यावर तुम्हाला जेवढ काम दिलं आहे तेवढ्यातच समाधानी न राहता सातत्याने नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे.

याच गोष्टी तुम्हाला तुमच्या अॅप्रेझल किंवा प्रमोशन वेळी उपयोगी पडतात. तुमचा परफॉर्मन्स वगळता तुम्ही कंपनीकडून काय शिकलात या गोष्टींना गुगलमध्ये फार महत्त्व दिले जाते.

 

google-job-marathipizza03
motionnemotions.com

 

ह्या अश्या बारीक सारीक गोष्टी आहेत, ज्या गुगलमध्ये नोकरी मिळवताना कमी येतात. त्यामुळे तुमची जर गुगलमध्ये खरंच नोकरी करण्याची इच्छा असेल तर या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि बिनधास्त अप्लाय करा, यश तुमचेच आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?