' हे आहे दक्षिण भारतातलं एकमेव गाव, जिथे चक्क ‘हिमवर्षाव’ होतो…! – InMarathi

हे आहे दक्षिण भारतातलं एकमेव गाव, जिथे चक्क ‘हिमवर्षाव’ होतो…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

दक्षिण भारत म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर मंदिरांची उंच गोपुरे, कॉफीचे मळे, उंच उंच निलगिरीच्या झाडांनी सजलेले रस्ते येतात. दक्षिण भारत लोकांना अनेक गोष्टींसाठी आवडतो – मग ती त्याची समृद्ध अशी द्रविड संस्कृती आणि तिचा इतिहास असो की चित्तथरारक आणि विलोभनीय असा समुद्रकिनारा असो नाहीतर रस्सम, पायसम, इडलीसारखी खाद्य मेजवानी असो..!

 

idli sambar inmarathi

 

एक गोष्ट आहे जी आपल्याला दक्षिण भारतात पहायला मिळत नाही, ती म्हणजे बर्फ आणि बर्फाने वेढलेली पर्वत शिखरे.

जेव्हा आपण हिमवर्षावाचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात लगेच मनाली, गुलमर्ग, जम्मूतावी, नैनीताल असा काश्मीरचा नजारा दिसू लागतो. तिथले सुखावणारे थंड हवामान आणि निसर्ग आपल्याला मोहवून टाकतो. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की हाच निसर्ग अनेक चमत्कार दाखवत असतो. कुठे गरम पाण्याचे झरे, तर कुठे जंगलाच्या मधोमध वाळवंट…

 

hot water stream inmarathi

 

अशीच एक नवलाईची गोष्ट म्हणजे उष्ण कोरड्या हवामानाच्या ठिकाणी होणारी बर्फवृष्टी! नाही पटत ना! मित्रांनो हा चमत्कार आपल्याला पाहायला मिळतो तो ही चक्क आंध्र प्रदेशमध्ये!

कुठलं आहे हे गाव?

आंध्रात एक पर्वतराजीने वेढलेले गाव आहे,’लंबसिंगी’ जिथे तुम्ही ही बर्फवृष्टी अनुभवू शकता. समुद्रसपाटीपासून १००० मीटर उंचीवर वसलेले, विशाखापट्टणमच्या चिंतापल्ली शहरातील हे धुक्याने वेढलेले हिल स्टेशन, प्रेमाने ‘आंध्र प्रदेशचे काश्मीर’ म्हणूनही ओळखले जाते.

बर्फाचे दुसरे नाव ‘कोररा बयालु’ आहे, ज्याचा मराठीत अर्थ आहे, “जर कोणी रात्री उघड्यावर राहिला तर सकाळी तो काठीसारखा गोठतो!” निसर्गसौंदर्याने नटलेल्या विलक्षण दर्‍या आणि थंड हवामान असणारे ‘लंबसिंगी’ हे दक्षिणेतील हिम वर्षाव होणारे एकमेव ठिकाण आहे.

 

lambasingi inmarathi

 

संपूर्ण वर्षभर, हे लहान गाव एका पांढऱ्या धुक्याने झाकलेले असते, जे वाऱ्यासह संपूर्ण परिसर वेधून टाकते, परंतु हिवाळ्यात (नोव्हेंबर ते जानेवारी), लंबसिंगीचे तापमान शून्य अंश सेल्सिअस इतके कमी होते आणि नंतर अनुभवता येतो कापसासारखा मऊ शुभ्र असा ‘लंबासिंगी बर्फ’.

दक्षिणेकडील प्रदेशात बर्फ दिसणारे एकमेव ठिकाण असण्याव्यतिरिक्त, लंबासिंगी एक स्वतंत्र आदिवासी समुदायाचा प्रदेश आहे. हे आदिवासी मिरपूड आणि कॉफीच्या मळ्यात काम करतात. ठिकठिकाणी वृक्षारोपण केलेले असल्याने हा परिसर कायम हिरवागार दिसतो.

पर्यटनाच्या दृष्टीने पाहता तसे काही इथे पाहण्यासारखे काही नसले, तरी तुम्हाला एका शांत सुट्टीचा अनुभव घ्यायचा असेल, निरभ्र चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली कॅम्पफायर एंजॉय करायचं असेल किंवा आपल्या कुटुंबासोबत क्वालिटी टाईम व्यतीत करायचं असेल तर कॉफीच्या मळ्यांनी वेढलेला हा परिसर नक्कीच उत्तम पर्याय आहे.

 

lambasingi beauty inmarathi

 

इतकेच नाही तर गावात राहण्यासाठी सर्व सोईंनी युक्त असे तंबू देखील मिळतात. आपण आपल्यासोबत आपले तंबू घेऊनही जाऊ शकतो किंवा गावात ओळख काढून तुम्ही तिथल्या स्थानिक घरांमध्येही राहू शकता.

लंबसिंगी पासून २ किमी अंतरावर असणारे कोठापल्ली धबधबे हे एक भौगोलिक वैशिष्ट्य असलेले धबधबे आहेत. खडकांच्या मालिकेतून झिरपून खाली तलावात मिसळणारे हे धबधबे डोळ्यांचे पारणे फेडतात. स्थानिक आणि पर्यटकांसाठी हा लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे.

लंबसिंगीपासून फक्त ६ किमी अंतरावर, तुम्ही लंबसिंगीहून विशाखापट्टणमला परत जाताना ‘थजंगी’ जलाशयाजवळ थांबू शकता. पार्श्वभूमीवर डोंगर आणि हलके पाणी असलेले जलाशय, छायाचित्रकारांसाठी एक सुंदर सेटअप प्रदान करते.

लंबासिंगीचे सर्वात जवळचे विमानतळ विशाखापट्टणम विमानतळ आहे, जे लंबासिंगीपासून १०७ किमी अंतरावर आहे. विशाखापट्टणम येथून शासकीय आणि खाजगी बस आहेत ज्या तुम्ही लंबसिंगीला जाण्यासाठी निवडू शकता.

 

visakhapatnam airport inmarathi

 

नोव्हेंबर ते जानेवारी हा सहसा लंबासिंगीला भेट देण्याचा उत्तम काळ मानला जातो. १५ जानेवारी २०१२ रोजी लंबासिंगीने बर्फवृष्टी अनुभवली होती. तापमान दरवर्षी ० डिग्री सेल्सिअसच्या खाली जात नाही, पण जेव्हा ते होते, तेव्हा लंबासिंगीला पांढऱ्या बर्फाचे आवरण मिळते!

निसर्ग आपल्या दोन्ही हातांनी आपल्याला भरभरून देत असतो. अनुभवायला कमी पडतो ते आपण ! तेव्हा या सुट्टीमध्ये नक्कीच तुम्हाला शांतता अनुभवायची असेल तर आंध्रप्रदेशातील या ‘मिनी काश्मीर’ला जरूर भेट द्या आणि तिथल्या निसर्गाचा जरूर अनुभव घ्या..

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?