' शेतात सनी लिओनचं पोस्टर… पिकांना ‘नजर लागू नये’, म्हणून लढवली भलतीच शक्कल! – InMarathi

शेतात सनी लिओनचं पोस्टर… पिकांना ‘नजर लागू नये’, म्हणून लढवली भलतीच शक्कल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काही असेल, तर ते म्हणजे त्याचं शेत आणि त्या शेतात उगवणारं पीक! पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून त्याची काळजी घेण्याचं काम प्रत्येक शेतकरी इमानेइतबारे करत असतो.

पशुपक्षांच्या उपद्रवामुळे शेताचं आणि पिकाचं नुकसान होऊ नये, म्हणून बुजगावण्याचा वापरही अगदी सर्रासपणे केला जातो. बुजगावणं वापरण्याचा प्रकार वर्षानुवर्षे सुरु आहे. पण या पिकाला कुणाची नजर लागू नये, म्हणून कुणी काही केल्याचं कधी ऐकलं आहे का?

 

scarecrow inmarathi

 

वाचायला विचित्र वाटलं असलं, तरी हे खरंय… आंध्र प्रदेशातील एका शेतकऱ्याने याचा विचार केला होता आणि एवढंच नाही तर त्यावर एक भन्नाट उपाय सुद्धा शोधला होता. नेमकं काय घडलं होतं, काय आहे या शेतकऱ्याची गोष्ट जाणून घेऊयात…

आंध्रप्रदेशातील एक छोटंसं गाव, बांदा किंदी पल्ले असं त्या गावाचं नाव आहे. तिथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याची ही गोष्ट आहे. चेंचू रेड्डी यांच्या शेतात एक वेगळंच बुजगावणं पाहायला मिळायचं. या बुजगावण्यावर चक्क सनी लिओन आणि किम कार्डीशियन यांचे फोटो बघायला मिळतील.

 

sunny leone poster inmarathi

 

होय, तुम्ही अगदी योग्य वाचलं आहे. पूर्वाश्रमीची पॉर्नस्टार आणि सध्याची बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन हिचा फोटो रेड्डी यांनी चक्क बुजगावणं म्हणून वापरला आहे. लाल बिकिनीमध्ये असणारी हॉट सनी चक्क शेतातल्या बुजगावण्याचं काम करतेय.

यामागचा विचार काय?

१० एकरच्या जागेत, त्यांची शेती विस्तारलेली आहे. या शेतात मुख्यतः कोबी आणि फ्लॉवरचं पीक ते घेतात. याची निगराणी करण्यासाठी उपाय म्हणून १२ पोस्टर्सचा वापर रेड्डी यांनी केला होता. सनीच्या या पोस्टरवर “तिथे नको (पिकांकडे) इथे (माझ्याकडे) बघा” असं लिहिलेलं दिसून येतं.

यामुळे लोकांचं लक्ष पिकांकडे जाणारच नाही या पोस्टरकडे जाईल, जेणेकरून शेतातल्या पिकांना कुणाचीही नजर लागणार नाही असं रेड्डी यांना वाटतं.

 

sunny leone and poster inmarathi

 

लोकांची नजर लागू नये म्हणून…

आंध्रप्रदेशातील एका जुन्या प्रथेतून ही कल्पना रेड्डी यांना सुचली. घोष किंवा दिष्ठि असं नाव असणाऱ्या एका दानवाचा फोटो शेतात लावण्याची प्रथा या राज्यात पूर्वापार चालत आली आहे. या दानवच्या चेहऱ्याच्या भीतीने माणसंच नव्हे तर पशुपक्षीही शेताकडे फिरकत नाहीत. त्यामुळे पिकांचे रक्षण होते.

आताच्या मॉडर्न जगात रेड्डी यांनी ही प्रथा मॉडर्न करून टाकली असं म्हणायला हवं. नाही का… आता ही अशी शक्कल लढवणाऱ्या शेतकऱ्याला नक्की म्हणावं तरी काय?

 

farmer and sunny leone inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?