' फुटक्या आरशात पाहू नये ते पापणी फडफडणे अशुभ, वाचा विचित्र ११ “अंधश्रद्धांबद्दल” – InMarathi

फुटक्या आरशात पाहू नये ते पापणी फडफडणे अशुभ, वाचा विचित्र ११ “अंधश्रद्धांबद्दल”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

मनुष्याने धर्माच्या बाबतीत श्रद्धाळू असावं पण अतिभोळं असू नये असं म्हणतात, जे अगदी खरं आहे. कारण श्रद्धा जेवढी चांगली, अंधश्रद्धा तेवढीच वाईट आणि मूर्खपणाचे लक्षण असणारी आहे. आपण भारतीय देखील अश्याच अनेक अंधश्रद्धा आजही पाळतो.

त्यातील काहीतर इतक्या अजब आहेत की त्या पाहून पोट धरून हसायला येतं.

चला जाणून घेऊया अश्याच काही अंधश्रद्धांबद्दल…

१) एखादी व्यक्ती जमिनीवर झोपली असल्यास त्याला ओलांडून जाऊ नये…

 

 

sleeping
sleeping

 

असे केल्यास जी व्यक्ती ओलांडतो त्याची वाढ होत नाही असे समजले जाते. अर्थातच हा निव्वळ बालिशपणा आहे.

२) अंधार झाल्यावर दिव्याचा एक तरी बल्ब लावणे…

 

house-with-lights-InMarathi

 

बरेच जण संध्याकाळच्या वेळेस घराच्या बाहेर जात असतील आणि अंधार पडणार असले तर घरातील एक तरी दिवा सुरु करून बाहेर पडतात. असे न केल्यास वाईट आणि दुष्ट प्रवृत्ती घरात वास करतात असे मानले जाते.

 

३) तुटलेल्या आरश्यात स्वत:ला पाहू नये…

 

broker mirror inmarathi

 

जर तुम्हाला स्वत:ला भविष्यात दु:खी पाहायचं नसेल, हाताश झालेलं पाहायचं नसले तर तुटलेल्या आरश्यात कधीही स्वत:ला पाहू नये असे म्हणतात. जर खरंच असं आहे तर चांगल्या आरश्यात स्वत:ला पाहणारे नेहमी सुखी दिसले पाहिजेत, नाही का?

४) अंगावर पाल पडली की तो शुभशकून मानला जातो…

 

lizard inmarathi
navbharat times

 

सगळ्या अंधश्रद्धा नकारात्मकच असतात असं काही नाही!

कोण कुठली पाल…ती कुणाच्यातरी अंगावर पडणार आणि त्यामुळे अख्खं जग स्वतःला अश्या दिशेने पुढे नेणार की त्या माणसासाठी काहीतरी सुखद घटना घडावी!

५) डोळ्याची पापणी फडफडणे…

 

papni inmarathi

 

पुरूषांची जर उजव्या डोळ्याची पापणी फडफडली तर एखादी चांगली गोष्ट होणार आहे असे मानले जाते, तर स्त्रियांची डाव्या डोळ्याची पापणी फडफडली तर त्यांचा दिवस चांगला जाणार असे मानले जाते.

काय बोलावं ह्याला? शरीर शास्त्राची अगदी जुजबी माहिती असणारा शाळकरी मुलगासुद्धा ह्या “श्रद्धेला” उडवून लावेल!

६) काळी मांजर रस्त्यात आडवी येणे…

 

black cat inmarathi

 

ही आजवरची सर्वात प्रसिद्ध अंधश्रद्धा आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. आणि भले भले सुशिक्षित ही ह्यावर विश्वास ठेवतात, तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.

७) १ लिंबू आणि ७ मिरच्या घराबाहेर लावल्याने वाईट शक्तींपासून घराचे रक्षण होते…

 

nimbu mirch inmarathi

 

मांजर आडवी जाणे प्रकारानंतर ह्याच अंधश्रद्धेचा क्रमांक लागतो!

घरच काय अगदी ऑफिस, दुकान ह्यांच्याबाहेर देखील लिंबू मिरची लावलेली आढळते. असाही समज प्रचलीत आहे की जर लिंबू लाल पडला तर समजून जावं की आजूबाजूला वाईट शक्तींचा वास आहे.

आणि जर एखाद्या व्यक्तीने त्या लिंबावर पाय ठेवला तर त्या व्यक्तीच्या शरीरात भूत पिशाच्च घुसतात असेही मानले जाते.

८) रात्रीच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली झोपणे टाळावे…

 

peepal inmarathi

 

रात्रीच्या वेळीस पिंपळाचे झाड हे नेहमीच अपशकुनी मानले जाते. कारण रात्रीच्या वेळेस ही ते दिसायला अगदी एखाद्या अवाढव्य पसरलेल्या भूतासारखे दिसते. तसेच ह्या झाडावर रात्रीच्या वेळेस भुते वास्तव्यास येतात असे म्हणतात.

पण विश्वास ठेवा – ह्या सर्व खोट्या गोष्टी आहेत.

खरं तर रात्रीच्या वेळेस पिंपळाचे झाड कार्बनडाय ऑक्साईड मोठ्या प्रमाणावर बाहेर सोडतं. (जे इतर झाडं सुद्धा करतातच!) त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली रात्रीच्या वेळेस झोपू नये असे म्हणतात.

त्यामुळे उगाच ह्या गोष्टीचा बाऊ कारण्यात काही अर्थ नाही.

९) ज्या भांड्यात अन्न शिजवता त्या भांड्यातून थेट अन्न खाऊ नये…

 

cooking inmarathi

 

ह्या मागे असा समज आहे की ज्या भांड्यात अन्न शिजवले, त्या भांड्यातूनच थेट अन्न खाल्ल्यास आपल्या लग्नाच्या दिवशी जोरदार पाऊस येतो.

खरंच जर असं असले तर हा पाऊस लग्नाच्याच दिवशी का पडतो इतर दिवशी का नाही? ह्याचंही उत्तर कोणीतरी द्या…!

१०) मासिक पाळीत असताना महिलेने लोणच्याच्या बरणीला हात लावू नये…

 

Touch-the-Pickle-InMarathi

 

आपल्याकडे मासिक पाळीत महिलांना जी वागणूक दिली जाते ती अतिशय निराशाजनक आहे. त्यात कहर म्हणून त्यांना विविध वस्तूंना हात लावण्यास देखील मनाई असते.

त्यातील एक आहे लोणच्याची बरणी! त्याला हात लावल्यावर म्हणजे संपूर्ण लोणचं खराब होतं. जग कुठे चाललंय आणि आपण कुठे अडकलोय?

११) घरातून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला “कुठे जातोयस” असं विचारू नये…

असं केल्यास कामानिमित्त बाहेत जाणाऱ्या व्यक्तीच्या कामात अडथळा येतो असे म्हणतात. ही देखील आजवरची सगळ्यात मजेशीर अंधश्रद्धा आहे.

देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत एवढी प्रगती केल्यावरही आजही आपण यासर्व गोष्टीवर विश्वास ठेवतो हे खरच हास्यास्पद (आणि तेवढंच लज्ज्यास्पद देखील!) आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?