'तिने ८ वर्षांच्या अत्याचाराचा बदला म्हणून, कापला 'तो' अवयव...

तिने ८ वर्षांच्या अत्याचाराचा बदला म्हणून, कापला ‘तो’ अवयव…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या समाजात अंधश्रद्धा कोणत्या थराला पोहोचल्या आहेत ह्याची कल्पना करवत नाही. नवनव्या प्रकरणामधून असे  जाणवत राहते की दिवसेंदिवस आणखी नीच पातळी गाठली जात आहे. जीवनात अंधश्रद्धा राहिलेल्या नसून, अंधश्रद्धांमध्ये थोडे थोडे जीवन जगले जात आहे, अशी सुद्धा अवस्था अनेक ठिकाणी झालेली दिसतेय.

धर्माच्या नावाखाली ढोंगीपणा करणाऱ्या साधूंची चंगळ बळावत आहे. लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन त्यांचा गैरफायदा घेणे हा त्यांचा खरा धंदा!

 

fake-sadhu-inmarathi

 

त्यातल्या त्यात धर्म आणि संस्कृतीच्या आडून आपली वासना शमवण्यासाठी निष्पाप तरुणी आणि स्त्रियांचे आयुष्य बरबाद करणाऱ्या या नराधमांना कायद्याने नाही तर पीडितांनीच स्वत: शस्त्र हातात घेऊन जन्माची अद्दल घडवावी, असे मत आपल्यातील अनेक लोक नेहमीच मांडत असतात.

असाच एक प्रकार मध्यंतरी केरळमध्ये घडला होता. जेथे पिडीत तरुणीने स्वत:च स्वत:वरील अत्याचाराचा ‘बदला’ घेऊन एका ढोंगी साधूला तो आयुष्यभर विसरणार नाही असा धडा शिकवला होता.

 

knife-marathipizza02

 

कायद्याचा अभ्यास करणाऱ्या तिरुअनंतपुरम येथील एका २३ वर्षीय तरुणीवर, तब्बल ८ वर्षांपासून एक ढोंगी साधू बलात्कार करीत होता. पन्नाशी उलटलेल्या या साधूचे नाव गणेशनंद होते. तो तिरुअनंतपुरम येथीलच पनामा आश्रमात तळ ठोकून होता.

हा साधू, पीडित तरुणीवर शाळेत असल्यापासून बलात्कार करत होता. पण एक दिवस अचानक, तिच्या संयमाचा बांध तुटला. तिने कायमचा या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याचा विचार केला. साधूच्या येण्यापूर्वी तिने एक सुरा आपल्या जवळ बाळगला होता.

 

knife-marathipizza01

 

जेव्हा त्याने पुन्हा आपल्या वासनेची भूक तिच्याकरवी भागवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र त्या नरकमय परिस्थितीतून आपली सुटका करुन घेण्यासाठी तिने साधूचं गुप्तांगच कापून टाकले.

 

kerala-marathipizza

 

तरुणीने स्वत: पोलीसांपुढे हजर होत आपण स्वसंरक्षणासाठी हे पाऊल उचलल्याचे कबूल केलंय.

पीडित तरुणीचे पालक या साधूचे भक्त होते. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे पिडीत तरुणीच्या आईला देखील साधूच्या ह्या हीन कृत्याची माहिती होती, पण तिने कधीही त्याला विरोध केला नव्हता.

त्यामुळे या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये तरुणीच्या आईला देखील ताब्यात घेण्यात आले. केवळ अंधश्रद्धेपोटी आपल्या मुलीला अश्या नरकयातना सहन करण्यास भाग पडणाऱ्या ह्या आईबद्दल काय बोलावे?

ह्या चीड आणणाऱ्या प्रसंगामुळे काही प्रश्न निर्माण केले जाऊ शकतात… जे आपल्याला बेचैन करून सोडतील.

असल्या साधू बाबांमुळे आपला धर्म बदनाम होतो, हे धर्माभिमानी, धर्मप्रेमी लोकांना समजत नाही का? समजत असेल तर अश्या भोंदू बाबांना शोधून शोधून त्यांना कायदेशीर शिक्षा घडवण्यास एखादी मोहीम सुरू का होत नाही?

त्या मुलीच्या अत्याचाराने परिसीमा गाठली होती – हे तर घटना वाचल्यावरच जाणवते. आपल्या पोटची पोर अशा नरक यातना भोगत जगत आहे हे तिच्या आईला बघवले कसे? अंधश्रद्धेची ही किती भयंकर पातळी आहे?

ह्या भोंदू बाबा आणि आईच्या ह्या उदाहरणाला, त्या मुलीच्या धाडसी कृत्यामुळे वाचा फुटली. पण अशी अनेक प्रकरणे आजही घडत असतीलच. अश्या विकृतीशी लढण्यासाठी शासन-प्रशासन आणि आपण सर्व सुजाण नागरिक तयार आहोत का? कधी होणार आहोत?

हे सर्व कसे थांबणार? कधी थांबणार?

हे सगळेच प्रश्न सोडवता येणे शक्य नाही, तोपर्यंत कदाचित हे असे अनेक प्रसंग घडतच राहतील. ते घडू नयेत यासाठी नागरिक म्हणून आपण प्रयत्न करत राहणे उत्तम!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “तिने ८ वर्षांच्या अत्याचाराचा बदला म्हणून, कापला ‘तो’ अवयव…

  • September 15, 2018 at 11:09 pm
    Permalink

    bhayanak

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?