भारतात एक नाही तर पाच केदार आहेत, या पंचकेदाराची यात्रा प्रत्येकाने एकदा तरी केलीच पाहिजे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

उत्तराखंड प्रदेशाला हिंदू संस्कृती आणि धर्मात खूप मध्ये महत्वाचे स्थान आहे. येथे गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ सारखी कित्येक साक्षात्कारी तीर्थस्थान आहेत. सर्व जगात भगवान शंकरांची अनेक मंदिरे आहेत, पण उत्तराखंडात असलेले पंच केदार त्यापैकी सर्वोच्च आहेत. काय म्हणता? तुम्हाला माहित नाहीत पाच केदार? फक्त एकच केदारनाथ माहिती आहे? अहो खरंच, भारतामध्ये एक नाही तब्बल ५ केदार आहेत ज्यांना हिंदू धर्मात पंच केदार म्हणून ओळखलं गेलंय. उर्वरित चार केदारांचे धार्मिक महत्व केदारनाथा इतकेच आहे. या सर्व धामांच्या दर्शनाने माणसांच्या इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते.

 

१) केदारनाथ:

kedarnath-marathipizza01
flyjettech.com

हे मुख्य केदारपीठ आहे, याला पंच केदारामध्ये प्रथम स्थान आहे. ग्रंथानुसार महाभारताचे युद्ध संपल्यावर आपल्याच कुळातील लोकांना मारल्याबद्दल आपल्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी वेदव्यास यांनी आज्ञा केल्यावर सर्व पांडवानी इथेच शंकराची उपासना केली होती. इथे महिषरूपधारी शंकराचा दर्शनी भाग शिलारुपात आहे.

कधी भेट द्यावी – केदारनाथला जाण्यासाठी एप्रिल ते ऑक्टोबर च वेळ सर्वात चांगला मानला जातो. परंतु पावसाच्या दिवसात हि यात्रा टाळावीच.

कसे जावे – केदारनाथला जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक हरिद्वार आहे. हरिद्वारच्या पुढचा मार्ग गाडी मार्गाने केदारनाथाला पोचावे. केदारनाथचा चढ खूप कठीण आहे, खूप लोक चालतच तेथे जातात. केदारनाथसाठी जवळचे विमानतळ देहरादून आहे.

केदारनाथच्या जवळपासची पर्यटन स्थळे-

उखीमठ- उखीमठ हे ठिकाण रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. हे ठिकाण समुद्र सपाटीपासून १३१७ मीटर उंचीवर आहे .इथे देवी उषा आणि शंकर देवांचे मंदिर आहे.

गंगोत्री ग्लेशियर- उत्तराखंडातील गंगोत्री ग्लेशियर २८ कि.मी.लांब आणि ४ कि.मी. रुंद आहे. गंगोत्री ग्लेशियर उत्तर पश्चिम दिशेला वाहते आणि एक गायीच्या तोंडासारखी समान ठिकाणावरून वळते.

 

२) मध्यमेश्वर:

madhyammeshwar-marathipizza
indianholiday.com

याला मनमहेश्वर किवा मदनमहेश्वर असेही नाव आहे. याला पंच केदारात दुसरे स्थान दिले जाते. हे उषीमठ पासून १८ मैलांवर आहे. येथे महिषरूपधारी शंकर देवांची नाभी लिंग रुपात आहे. पुराण कथेनुसार शंकरांनी आपल्या मधुचंद्राची रात्र इथेच साजरी केली होती. येथील पाण्याचे काही थेंबच मोक्षप्राप्तीसाठी पुरेसे आहेत, असे मानले जाते.

कधी भेट द्यावी – मध्यमेश्वर मंदिरात जाण्यासाठी सर्वात चांगली काळ म्हणजे उन्हाळ्याचा! मुख्यत: यात्रा मे ते ऑक्टोबरच्या मध्ये केली जाते.

कसे जावे – उखीमठ पासून जॉली ग्रांट विमानतळ (देहरादून) चे अंतर १९६ कि.मी. आहे. उखीमठ पासून उनीअना या ठिकाणी पोचून, तिथून मध्यमेश्वराची यात्रा सुरु केली जाऊ शकते.

रेल्वे मार्ग – उखीमठ पासून सर्वात जवळ ऋषिकेष रेल्वे स्थानक आहे. हे अंतर १८१ कि.मी. इतके आहे. उखीमठ पासून उनीअनाला जाऊन, तिथून मध्यमेश्वराची यात्रा सुरु केली जाऊ शकते.

रस्त्याने जायचे म्हटल्यास दिल्लीवरून पहिल्यांदा उनीअनाला जावे लागते, तिथून मध्यमेश्वर फक्त २१ कि.मी. अंतरावर आहे.

मध्यमेश्वर जवळपासची पर्यटन स्थळे-

वृद्ध मध्यमेश्वर- मध्यमेश्वर पासून २ कि.मी. अंतरावर वृद्ध मध्यमेश्वर नावाचे ठिकाण आहे.

कंचनी ताल- मध्यमेश्वर पासून १६ कि.मी. अंतरावर कंचनी ताल नावाचे तळे आहे, हे तलाव समुद्र सपाटीपासून ४२०० मी.च्या उंचीवर आहे.

गौंधर – हे मध्यमेश्वर गंगा आणि मरकंगाचे संगम स्थान आहे.

 

३) तुंगनाथ:

tungnath-marathipizza
indiantourist-spots.blogspot.in

याला पंच केदारांमध्ये तिसरे स्थान दिले जाते. केदारनाथ वरून बद्रीनाथला जाताना हे ठिकाण लागते. इथे शंकर देवांची भुजा शिलारुपात आहे. असे म्हटले जाते कि या मंदिराची खुद्द पांडवानी शंकर देवांना प्रसन्न करण्यासाठी स्थापना केली होती. तुंगनाथ शिखराची चढण उत्तराखंड यात्रेतील सर्वात उंच मानली जाते.

कधी भेट द्यावी – तुंगनाथला जाण्यासाठी सर्वात चांगली वेळ हि मार्च ते ऑक्टोबरच्या काळातली आहे.

कसे जावे- हरिद्वार पासून जॉली ग्रांट विमानतळ (देहरादून) हे अंतर ३७.९ कि.मी. आहे

तुंगनाथसाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक हरिद्वार आहे, जे जवळपास सगळ्याच मोठया रेल्वे स्थानकांना जोडलेले आहे.

तुंगनाथच्या जवळपासची पर्यटन स्थळे-

चंद्रशीला शिखर- तुंगनाथ पासून २ कि.मी. उंचीवर चंद्रशीला शिखर आहे. हा खूप सुंदर आणि मनमोहक डोंगर परिसर आहे.

गुप्तकाशी- रुद्रप्रयाग जिल्ह्यापासून १३१९ मीटर उंचीवर गुप्तकाशी नावाचे ठिकाण आहे. जिथे शंकर देवांचे विश्वनाथ नावाचे मंदिर आहे.

 

४) रुद्रनाथ:

rudranath-marathipizza
boloji.com

हे पंच केदारमध्ये चौथ्या स्थानावर येते. इथे महिषरुपी शंकरांचे मुख आहे. तुंगनाथ वरून रुद्रनाथ शिखर दिसते. इथे एक गुहा असल्या कारणाने इथे जाण्याचा मार्ग खूप दुर्गम आहे. येथे येण्याचा एक रस्ता हेलंग(कुम्हारचट्टी) वरून पण येतो.

कधी भेट द्यावी – रुद्रनाथला जाण्यासाठी सर्वात चांगली वेळ म्हजे उन्हाळा आणि पावसाळा होय.

कसे जावे- येथून जॉली ग्रांट विमानतळ (देहरादून) चे अंतर २५८ कि.मी. आहे. तिथून रस्त्याने रुद्रनाथची यात्रा सुरु करता येते.

रुद्रनाथला जाण्यासाठी ऋषिकेश, हरिद्वार, देहरादून वरून असंख्य बस सोडल्या जातात.

 

५) कपिलेश्वर :

kapileshwar-marathipizza
travelmyglobe.com

याला पंच केदारमध्ये पाचवे स्थान आहे. येथे महिषरूपधारी शंकर देवांच्या जटेची पूजा केली जाते. अखलनंदा पुलापासून ६ मैल पार गेल्यावर हे स्थान येते. येथील अभयारण्यचा रस्ता एका नैसर्गिक गुहेतून जातो.

कधी भेट द्यावी – कल्पेश्वरला जाण्यासाठी उन्हाळ्यात म्हणजे मार्च ते जूनच्या मध्ये आणि वसंताच्या ऋतूमध्ये जुलै ते ऑगस्ट च्या महिन्यात जावे.

कसे जावे – जोशीमठ, ऋषिकेष वरून जॉली ग्रांट विमानतळ देहरादून चे अंतर २६८ कि.मी. आहे. येथून कल्पेश्वरची यात्रा सुरु करू शकतो.

ऋषिकेश रेल्वे स्थानक देहरादून वरून ४२ कि.मी. आणि हरिद्वार पासून २३.८ कि.मी लांब आहे. ऋषिकेशला तुम्ही रेल्वेने जाऊ शकता. तिथून रस्त्याने कल्पेश्वरला जाते येते. जोशीमठ, ऋषिकेश वरून रस्त्याने आरामात कल्पेश्वरला जाता येते.

कल्पेश्वर जवळपासची पर्यटन स्थळे –

जोशीमठ- कल्पेश्वर पासून थोड्याश्या अंतरावरच जोशीमठ नावाचे ठिकाण आहे. इथूनच चारधाम यात्रेसाठी रस्ता जातो.

मन:शांतीसाठी आणि अद्भुत निसर्ग सौंदय अनुभवण्यासाठी ही पंच केदाराची यात्रा हिंदू व्यक्तीने एकदा तरी करावी!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?