' चीडलेल्या धोनी ने दिलं पत्रकाराला आक्रमक उत्तर – InMarathi

चीडलेल्या धोनी ने दिलं पत्रकाराला आक्रमक उत्तर

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

२३ मार्च २०१६ – भारतीय क्रिकेट टीमच्या चाहत्यांसाठी हा दिवस नेहेमी लक्षात ठेवण्यासारखा आहे. २०१६ T-20 विश्वचषक स्पर्धेतील भारत बांग्लादेश सामना उत्कंठावर्धक झाला. शेवटच्या बॉलवर केवळ एका रनने भारतीय टीम जिंकली आणि देशभर जल्लोषाला उधाण आलं.

सर्वत्र भारावलेलं वातावरण आहे….शेवटच्या शटकात सामना खेचून आणणाऱ्या baller पांड्या आणि हातातून गेलेला सामना जिंकण्यासाठी शेवटपर्यंत जीवाचं रान करणारा कप्तान धोनी…ह्यांच्यावर अक्खा देश एकदम फिदा झालाय…आणि अश्या परिस्थितीत एक प्रेस कॉन्फरन्स होतीये.

एका पत्रकार धोनीला प्रश्न विचारतो :

सामन्याच्या आधी खूप सहज विजय मिळवण्याच्या गप्पा चालू होत्या. मोठा विजय मिळवून, ५० रन्सने विजय मिळवून रन-रेट सुधारण्याच्या गोष्टी चालू होत्या. पण तुम्ही तर कसेबसे जिंकलात. फक्त एक रन ने जिंकलात. ह्या बद्दल कसं वाटतंय?

धोनी खूप शांत, थंड डोक्याचा आहे, चटकन चिडत नाही – हे सर्वजण जाणतात. Fans मधे तो “Captain Cool” म्हणून प्रसिद्ध आहे.

पण पत्रकाराच्या ह्या प्रश्नावर धोनी खवळला. त्याने तडक उत्तर दिलं आणि म्हणाला –

तुमच्या टोनवरून हे स्पष्ट होतंय की भारतीय टीम जिंकल्याचा तुम्हाला आनंद झालेला नाही. शिवाय क्रिकेट match एखाद्या स्क्रिप्टनुसार नसतात (सगळं ठरवून घडत नसतं). आम्ही toss हरल्यानंतर ह्या पीचवर जी batting केली, ती कशी केली – आम्ही कमी रन्स का केले – हे सगळं तुम्ही analyse करायला पाहिजे. तुम्ही बाहेर बसून हे analysis करत नसाल तर असे प्रश्न विचारू नका.

 

ह्या प्रश्नोत्तराचा video :

 

 

धोनीच्या ह्या धमाकेदार उत्तरानंतर त्या पत्रकाराची काय अवस्था झाली असेल हे विचारायलाच नको ! 😀

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?