' तुम्हाला ही ‘बबल रॅप’ फोडायला आवडतं का? हा केवळ चाळा नाही तर… – InMarathi

तुम्हाला ही ‘बबल रॅप’ फोडायला आवडतं का? हा केवळ चाळा नाही तर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

माणूस कितीही मोठा झाला तरी, तो लहानपणी केलेल्या खोड्या कधीही विसरत नाही किंवा काही लोकांना लहानपणीच्या गोष्टी अजूनही करायला आवडतात. ज्यात त्यांना आनंद देखील मिळतो.

आपल्यापैकी बऱ्याच लोकांना बबल रॅप फोडायला आवडत असतील. आपल्या घरी जर एखादी नवीन वस्तु आली की, त्यात बबल रॅप येतं आणि त्याला टाकून न देता आपण ते बबल फोडत बसतो.

 

bubble popping inmarathi

 

आपण जेव्हा एखादी नवीन वस्तू घेतो तेव्हा अनेकदा त्याच्या पॅकिंगसाठी बबल रॅपचा वापर केला जातो. हे बबल रॅप आपण फेकून न देता त्या रॅपचे बबल फोडण्यास पसंती देतो. यासाठी वयस्कर लोकं देखील एका लहान मुलांप्रमाणे वागतात. पण तुम्हाला या मागची कारणे माहीत आहेत का?

१. एका संशोधनात असे आढळून आले आहे की, कोणीही स्वतःला बबल रॅप फोडण्यापासून थांबवू शकत नाहीत. जेव्हा आपल्या हाती कोणतीही स्पंजसारखी मऊ वस्तू येते, तेव्हा आपले हात काही प्रमाणात पॅनीक होतात. ज्यामुळे आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि आपण तात्काळ हे बबल रॅप फोडण्याची क्रिया सुरु करतो.

मॅगझिन डॉट कॉम मधील एका रिपोर्टनुसार, याचे कारण एका संशोधनात आढळून आले आहे. जेव्हा मऊसूत प्रकाराची एक छोटीशी गोष्ट आपल्या हातात येते, तेव्हा आपल्या हातात एक विशेष प्रकारचे तरंग तयार होतात जे आपल्याला त्या वस्तूला दाबण्यासाठी भाग पाडतं.

२. मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट ई. थायर स्पष्ट करतात की जेव्हा लोक तणावग्रस्त असतात, तेव्हा जर ते बबल रॅप फोडत असतील तर त्यांचा तणाव काही प्रमाणात कमी होतो.

 

tension inmarathi

 

मानसशास्त्रानुसार जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा अशा म्हणजे बबल फोडण्याच्या कृतीचा आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या कटू गोष्टींशी संबंध जोडला जाऊन आपला ताण निवळण्यास मदत होऊ शकते.

३. शास्त्रज्ञांनी याला ‘वडिलोपार्जित व्यसन’ असेही म्हटले आहे. याचे कारण असे की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर सत्ता मिळवतो तेव्हा आपण समाधानी होतो.

बबल फोडले की आपल्याला अशा प्रकारचे समाधान मिळून आपल्यातील नकारात्मक भावना सुखावू शकतात. आपण ज्यांना आपले पूर्वज समजतो ती माकडे अशा प्रकारे मुंग्या, कीटक यांना अशाच पद्धतीने मारतात,जसे आपण बबल फोडतो.

 

bubble inmarathi

 

४. बबल रॅप पॉपिंग आपल्या मनाला अतिरिक्त विचारांपासून दूर करण्यास मदत करते परंतु त्याच वेळी आपण सध्या करत असलेल्या कामापासून आपले लक्ष विचलित करू शकते.

उदाहरणार्थ, जर तुम्ही एखादा लेख किंवा संशोधन वाचत असाल आणि त्याच वेळी पॉपिंग करत असाल, तर तुमचे मन जास्त एकाग्र होवू शकते आणि अर्थात योग्य वेळी बबल रॅप फोडण्याची क्रिया थाबंवली नाहीत तर मूळ कामावरून लक्षही विचलित होऊ शकतं.

५. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा काही लोक अधिक तणावाखाली असतात आणि त्यांच्या त्रासांबद्दल विचार करतात, तेव्हा जाणूनबुजून किंवा नकळत ते आपले हात आणि पाय हलवू लागतात. हेच कारण आहे की तणावाखाली बबल रॅप फोडल्याने लोकांना शांतता मिळते.

आपल्या मेंदूला बबल रॅप फोडून समाधान मिळते. आपल्या शरीराला एक वेगळाच आनंद मिळतो. हे आपल्या मेंदूला आनंदी हार्मोन्स सोडण्याचे संकेत देखील देते.

 

bubble wrap inmarathi

 

६. बबल रॅप फोडण्याच्या आपल्या सवयीचे आणखी एक मनोरंजक कारण आहे. वास्तविक, जेव्हा बबल रॅप फुटतो तेव्हा आपल्या मेंदूला ऑर्गॅझमसारखे समाधान मिळते. डेक्कन क्रॉनिकल या अग्रगण्य प्रकाशनाने त्याची स्वायत्त संवेदी मेरिडियन प्रतिसाद (एएसएमआर) म्हणून व्याख्या केली आहे. जेव्हा आपण बबल रॅप फोडतो तेव्हा आपला मेंदू आनंदी हार्मोन सोडतो.

तर एकूण बेरीज म्हणजे बबल रॅप फोडण्याची सवय आपल्या समाधानाशी जोडलेली आहे. आपल्याला हे करण्यात मजा येते. कारण कोणतेही आणि काहीही असो. लहानमोठ्या सर्वांना हे बबल रॅप मधील बबल फोडावेसे वाटतात हे नक्की!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?