' बिग बॉसच्या सदस्यांचे हे १० अतरंगी फोटो बघून पोट धरून हसाल – InMarathi

बिग बॉसच्या सदस्यांचे हे १० अतरंगी फोटो बघून पोट धरून हसाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

‘बिग बॉस’च्या घरात सध्या १५ सदस्य खेळत असले तरी बिग बॉसचा प्रत्येक प्रेक्षकही या खेळात दंग होऊन रमलेला असतो. म्हणजे घरातील दोन सदस्यांचं भांडण टिव्हीवर पाहताना अनेकदा प्रेक्षकांच्या मुठीही आवळल्या जातात तर कधी आपल्या आवडत्या सदस्याला इतरांनी त्रास दिल्याचे पाहिल्यानंतर प्रेक्षकही भांडणासाठी पुढे सरसावतात.

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ही म्हण सार्थ ठरवणारे बिग बॉसच्या घरातील सदस्य म्हणजे शेरास सव्वाशेर आहेत. कुणी भांडणात हुशार तर कुणी कामचुकारपणा करण्यात तरबेज, कुणी टास्क खेळण्यात चपळ तर अरेरावी करण्यात पटाईत!

प्रत्येक सदस्याचा नवा अवतार पाहताना मराठी भाषेतील काही म्हणी, उक्ती सहज ओठी येतात. तुम्हालाही असंच वाटतंय? मग बिग बॉसच्या घरातील तुमच्या आवडत्या सदस्याला कोणती म्हण चपखल बसते हे जाणून घेण्यासाठी हे धमाल फोटो पहाच.

१. बिग बॉसचं घर म्हणजे…

 

big boss home 1

 

सदस्यांसाठी बिग बॉसचं घर सुखसोईंनी सजलं खरं, मात्र त्यातील ढोंगीपणा, स्क्रिप्टेड भांडणं पाहिल्यानंतर बडा घर पोकळवासा असं म्हणावसं वाटतं, हो ना?

२. दोघेही सारखेच

 

jay big boss inmarathi

 

जय दुधाणे आणि विशाल पाटील या दोघांची त-हा काही औरच! व्यायामाने कमावलेली बॉडी प्रेक्षकांना दाखवण्याचा आटापिटा करताना हे दोघंही अनेकदा शर्ट घालायलाच विसरतात.

३. लोका सांगे ब्रह्मज्ञान

 

shivleela inmarathi

 

कीर्तनकार शिवलिला पाटील हिने घरात प्रवेश केला आणि महाराष्ट्रात वादाची ठिणगी पडली. एरवी आपल्या किर्तनातून महिलांविषयी टिपणी करणारी, महिलांचा पोषाख, केशरचना यांबद्दल संस्कृतीच्या टिमक्या वाजवणारी शिवलिला स्वतः मात्र यातील कोणताच नियम पाळत नाही अशी टिका केली गेली.

आजारपणामुळे घराबाहेर पडल्यानंतर अखेर तिने वारकरी संप्रदायाची माफी मागितली.

४. अनावश्यक ओझं

 

avishaakar d inmarathi

 

वाढलेलं वजन, सुटलेलं पोट आणि कायम कन्फ्युज असलेल्या अविष्काराबद्दल केवळ प्रेक्षकच नव्हे तर घरातील सदस्यही हीच म्हण वापरतात.

५. हम करे सो कायदा

 

meera j inmarathi

 

जगन्नाथांच्या लेकीने घरात पहिल्या दिवसापासून धुमाकूळ घातलाय. प्रत्येक भांडणात ती आपला हात दाखवून समोरच्याला गप्प करते.

६. ताईगिरी

 

trupti inmarathi

 

बाहेरच्या जगात स्त्री हक्कांसाठी घसाफोड करणाऱ्या तृप्तीताई घरातही ताईगिरी करणार असा अंदाज होता, मात्र एकंदरित घरात इतर सदस्यांपुढे गप्प झालेल्या ताईंना पाहिल्यावर हीच म्हण डोक्यात येते.

७. नाद करायचा नाय

 

surekha inmarathi

 

मालिकांमधील खाष्ट सासु तर कधी घरेलू गृहिणी अशा भुमिका करणा-या अभिनेत्री सुरेखा कुडची यांचे खरे रंग घरात दिसले आणि प्रेक्षकांनी हिच म्हण एकमताने मान्य केली.

८. वाण नाही पण…

 

friends inmarathi

 

वादग्रस्त ग्रुपमधील हे त्रिकूट! ‘संगत का असर’ ही हिंदीतील म्हण असो वा मराठीतील ‘ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला…’ ही उक्ती, यांना सार्थ ठरते. जयच्या नादाला लागून हे दोघंही बिघडले असं म्हणायलाही प्रेक्षक कमी करत नाहीत.

९. गुपचुप गुपचूप

 

sneha inmarathi

 

बिग बॉसच्या घरातील दिवे बंद झाले की अनेक खलबतांना ऊत येतो. सध्या गुलुगुलु करणारे स्नेहा आणि जय यांच्यात नेमकं काय शिजतंय? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अंधारात घडलेलं कुणाला कळत नाही हा त्यांचा गैरसमज लवकर दूर व्हावा अशी आशा आहे.

१०. सगळे सारखेच

 

big boss team inmarathi

 

काहीही असो, शेवटी हा खेळ आहे, मनोरंजनासाठी तयार केलेला रिअॅलिटी शो आहे हे मान्य करायलाच हवं. या खेळात कधी कुणी चुकतं तर कधी कुणाबाबत सहानुभुती वाटते. शेवटी कधी ना कधी हेच म्हणावसं वाटतं की सगळेच एका माळेचे मणी…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?