' न्यूड डान्सर, दरवर्षी नव्या ‘व्हर्जिन’ मुलीशी लग्न! अय्याश राजाची शानशौकी… – InMarathi

न्यूड डान्सर, दरवर्षी नव्या ‘व्हर्जिन’ मुलीशी लग्न! अय्याश राजाची शानशौकी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लग्नासाठी मुलगी “सेकंड हॅन्ड” नको, “वापरलेली” वस्तू नको, “उष्टा नैवेद्य” वगैरे मूर्ख संकल्पना काय फक्त आपल्याच देशात नाहीत. जगात इतर ठिकाणी देखील अशी हिपोक्रसी भरपूर चालते.

स्वतः लग्नाआधी भरपूर मुली फिरवायच्या, सगळी मज्जा मारून घ्यायची, अनेक गर्लफ्रेंड्स फिरवून मित्रांमध्ये “स्टड” किंवा “डूड” असं स्वतःचं कौतुक करून घ्यायचं आणि ह्यांना लग्नासाठी मुलगी मात्र “सेकण्ड हॅन्ड” नको. असली मानसिकता फक्त मुलांचीच नसते तर टिपिकल पुरुषप्रधान समाजाची सुद्धा असते.

मुलं तर चुकणारच, पण मुलीची अब्रू म्हणजे काचेचं भांडं! ते जपायलाच हवं! अब्रूचा संबंध योनिशुचितेशी जोडून समाजातील असल्या ढोंगी लोकांनी फक्त स्वतःची सोय केली आहे.

आफ्रिकेतील एका देशाचा राजा तर दर वर्षी एका “व्हर्जिन” मुलीशी लग्न करतो. ज्या देशाचा राजाच असा आहे त्या देशातील मुलींच्या स्वातंत्र्याबद्दल तर काही बोलायलाच नको.

 

swaziland king 1 inmarathi

 

जगात बहुतांश ठिकाणी लोकशाही आहे. पण अजूनही काही देशांत राजेशाही/हुकूमशाही अस्तित्वात आहे.

राजा चांगला असेल तर त्या देशातल्या प्रजेचे जीवन चांगले असते. एक राजा कसा असावा तर आपल्या मनात आधी श्रीराम, श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची नावे येतात, कारण ह्यांनी वेळप्रसंगी स्वतः कष्ट, त्रास सहन करून प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्य खर्ची केले.

प्रजेचे अपत्याप्रमाणे पालन पोषण, प्रजेच्या सुख-दुःखाची काळजी, प्रजेचे रक्षण ह्या सगळ्या राजाच्या जबाबदाऱ्या असतात. पण जिथे रक्षकच भक्षक होतो तिथल्या प्रजेचे जीवन हे दुःखी आणि कष्टप्रद असते.

आफ्रिका खंडात इस्वातीनी किंवा स्वाझीलँड नावाचा एक देश आहे. दक्षिण आफ्रिकेचा शेजारी असणारा देश जगातील सर्वात छोट्या देशांपैकी एक आहे.

स्वातंत्र्याच्या ५० वर्षांनंतर २०१८ साली ह्या राजाने आपल्या देशाचे नाव बदलून “किंग्डम ऑफ ईस्वातीनी” असे ठेवले. ह्या देशात अजूनही राजेशाही चालते आणि ह्या देशाचा राजा प्रजेचे पालनपोषण करण्याला सर्वात शेवटचे प्राधान्य देतो.

 

swaziland king 2 inmarathi

 

प्रजा अत्यंत गरिबीत जीवन कंठत असताना देखील स्वतःची मौजमजा,स्वतःची छानछोकी हेच राजाचे आयुष्य आहे. इतकेच नव्हे तर हा राजा दर वर्षी एक कुमारिका निवडून तिच्याशी लग्न करतो. इतर बऱ्याच कारणांसाठी देखील ह्या राजाचे नाव चर्चेत असते.

स्वाझीलँड देशात दर वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इथल्या महाराणीच्या आईच्या गावात एका उत्सवाचे आयोजन केले जाते. ह्या गावाचे नाव लूदजिजीनी आहे.

ह्या गावात उम्हालांगा नामक उत्सव असतो. ह्या उत्सवात दहा हजाराहून अधिक कुमारिका आणि लहान मुली सहभागी होतात. उत्सवादरम्यान राजासमोर ह्या मुली नृत्य करतात.

दर वर्षी समारोहात सहभागी होणाऱ्या ह्या मुलींपैकी एक मुलगी निवडून राजा तिच्याशी लग्न करतो. आश्चर्याची बाब म्हणजे ह्या समारोहात मुलींना वस्त्रहीन होऊन नृत्य करावे लागते. म्हणजे केवळ राजासमोरच नव्हे तर इतर संपूर्ण प्रजेपुढे ह्या मुली वस्त्रहीन होऊन नृत्य करतात.

 

swaziland dance inmrathi

 

ह्या विचित्र परंपरेचा देशातील अनेक मुलींना विरोध केला. अनेक मुलींनी ह्या समारोहात सहभागी होण्यासाठी नकार दिला. पण जेव्हा ही गोष्ट राजाला समजली तेव्हा त्याने त्या मुलींच्या कुटुंबाकडून भली मोठी रक्कम दंड म्हणून वसूल केली.

ह्या विचित्र समारोहामुळे आणि परंपरेमुळे स्वाझीलँडच्या राजावर अनेक आरोप केले जातात. ह्या राजावर असे आरोप केले जातात की हा राजा स्वतःचे सगळे शौक पूर्ण करतो. सगळा पैसा स्वतःच्या छानछोकीवर खर्च करतो, परंतु प्रजेला मात्र हलाखीत आयुष्य कंठावे लागते.

२०१५ साली झालेल्या भारत-आफ्रिका शिखर संमेलनात स्वाझीलँड देशाचा हा राजा ‘मस्वाती तृतीय’ सहभागी झाला होता. तो भारतात येऊन गेला.

ह्या संमेलनासाठी तो आपल्या संपूर्ण कुटुंबकबिल्याबरोबर आला होता. राजा, त्याच्या १५ राण्या, त्याची २३ मुले आणि त्याचे १०० नोकर ह्या सगळ्यांच्या व्यवस्थेचा भार आपल्यावर पडला होता. ह्या सगळ्यांची व्यवस्था नवी दिल्लीच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली होती.

 

swaziland king 1 inmarathi1

 

ह्या देशात ही परंपरा १९४० पासून सुरु झाली आहे. मुलीचे “पावित्र्य” सिद्ध करणे आणि राजमातेची सेवा करण्यासाठी ही परंपरा सुरु झाली असे म्हणतात.

दर वर्षी ह्या मुलींना वेगवेगळ्या गटात विभागले जाते. मुलींचे वेगवेगळ्या गटात विभाजन राजाचे पुरुष सैनिक करतात. मुलींना नंतर राजमहालाच्या परिसरात वाढलेले उंच गवत काढण्यासाठी पाठवले जाते. हे गवत एकत्र करून नंतर मुलींना राजमहालाच्या परिसरात पाठवले जाते.

मग तो दिवस मुली दुसऱ्या दिवशीचा पोशाख तयार करण्यात घालवतात. हा पोशाख म्हणजे मण्यांचा हार, एक लहानसा स्कर्ट, पैंजण आणि कंबरपट्टा असा असतो. हा सगळा पोशाख मुली स्वतः हाताने तयार करतात.

ह्याव्यतिरिक्त काही घालण्याची मुलींना परवानगी नसते. म्हणजेच शरीराचा वरचा भाग पूर्णपणे उघडा ठेवणे त्यांना सक्तीचे असते. अशा पोशाखात ह्या मुली शाही पाहुणे, राजा, आणि उत्सव बघायला आलेल्या सगळ्या प्रजेसमोर नृत्य करतात.

राजा स्वतःसाठी दर वर्षी नवी राणी निवडतो. आजवर त्याने तीन राण्यांना घटस्फोट दिला आहे. १९८६ साली वयाच्या अठराव्या वर्षी मस्वाती तृतीय राजा झाला आणि तेव्हापासून तो दर वर्षी लग्न करतोय. आजवर त्याने ३० पेक्षा अधिक मुले जन्माला घातली आहेत.

अर्थात त्याच्या सगळ्या राण्यांपैकी फक्त दोन राण्यांना शाही दर्जा आहे. इतर राण्यांना शाही दर्जा नाही. आता जोवर हा माणूस राजाच्या पदावर आहे तोवर तो दर वर्षी एका “व्हर्जिन” मुलीशी लग्न करत राहणार.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?