' सेट मॅक्सवर सतत सूर्यवंशम दाखवणे ही मुद्दाम आखलेली एक बिझनेस स्ट्रॅटेजी आहे! – InMarathi

सेट मॅक्सवर सतत सूर्यवंशम दाखवणे ही मुद्दाम आखलेली एक बिझनेस स्ट्रॅटेजी आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सेट मॅक्स म्हणजे सूर्यवंशम आणि सूर्यवंशम असं जणू समीकरणचं बनलंय. त्याला कारण म्हणजे सेट मॅक्स चॅनेल वर सतत सूर्यवंशम चित्रपट दाखवला जाणे.

आयपीएलचा हंगाम सोडला तर इतर वेळेस तुम्हाला महिन्यातून असंख्य वेळा सूर्यवंशम हमखास बघायला मिळणार. सेट मॅक्सच्या या ‘सततपणाला’ आता प्रेक्षकही कंटाळले आहेत.

म्हणूनच की काय सोशल मिडीयावर या प्रकाराची बरीच खिल्ली उडवली जाते आणि आपण मंडळींनीही त्याची खूप मजा घेतो.

 

set-max-suryavansam-marathipizza01

 

बरं हा थट्टेचा विषय राहू दे बाजूला, पण कधी तुम्ही जरा गांभीर्याने विचार केलाय का की, सेट मॅक्स चॅनेल सतत सूर्यवंशम चित्रपट का दाखवते? त्यामागे काही कारणे आहेत का? अश्याने आपण प्रेक्षकवर्ग गमावून बसू अशी सेट मॅक्सला भीती नाही का?

चला जाणून घेऊया या मागची काही लॉजिकल कारणे, जी लॉजिकली विचार केल्यावर सेट मॅक्स वर सतत सूर्यवंशम का दाखवतात या प्रश्नाचं उत्तर देतात.

पहिलं उत्तर आहे – अर्थातच प्रसारणाचे हक्क.

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने १९९९ साली सूर्यवंशम च्या प्रसारणाचे हक्क विकत घेतले. किती वर्षांसाठी? तब्बल १०० वर्षांसाठी! म्हणजे, २०९९ सालापर्यंत सेटमॅक्सवर सूर्यवंशम दिसत रहाणार!

 

sooryavansham InMarathi

दुसरं उत्तर आहे – “गॅप फिलर”

फक्त हिट चित्रपटाचे हक्क विकत घेणं कुठल्याही चॅनलला शक्य असतं. त्यामुळे उत्तम चित्रपट दाखवण्याची शक्यता मर्यादित असते. मग ज्या दिवशी किंवा दिवसाच्या ज्या वेळी फारसे दर्शक नसतात – अश्या वेळी काय दाखवायचं? तर सूर्यवंशम सारखे चित्रपट! अश्या चित्रपटांना गॅप फिलर म्हणतात.

तिसरं उत्तर सर्वात भारी (आणि समजायला, पटायला जरासं कठीण!) आहे – स्पर्धा तीव्र होणं टाळण्यासाठी!

१) एकच चित्रपट वा कन्टेन्ट रिपीट दाखवून सोनी ग्रुप गेम थेअरीचा वापर करतंय असं दिसून येते. म्हणजेच काय, तर सोनी ग्रुपला सेट मॅक्स चे मार्केटमधील इतर स्पर्धक म्हणजेच इतर वाहिन्यांना बाहेर करायचे नाही. त्यांना ही स्पर्धा सुरूच ठेवायची आहे.

 

sony-max InMarathi

 

सोनी ग्रुप हे एन्टरटेन्मेन्ट इंडस्ट्री मधील एक मोठे नाव आहे. त्यांना नवीन युनिक कन्टेन्ट लोकांपुढे आणणे जास्त कठीण नाही. पण यामुळे इतर वाहिन्या पिछाडीवर पडतील, सोनीला कोणताही स्पर्धक उरणार नाही आणि मार्केटमध्ये त्यांची मोनोपॉली निर्माण होईल आणि हीच गोष्ट सोनी ग्रुपला नको आहे…!

कारण असे केल्यास अजून नवनवीन चॅनेल्स उदयाला येतील आणि चित्रपट दाखवणाऱ्या भारतीय वाहिन्यांमध्ये अधिक चढाओढीची स्पर्धा निर्माण होईल.

त्यामुळे रिपीट कन्टेन्ट दाखवून सोनी ग्रुप ही स्पर्धा थंडच ठेऊ पाहत आहे आणि त्याचवेळी इतर वाहिन्यांना देखील थोपवून धरत आहे.

२) एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये सेट मॅक्सवर दाखवण्यात येणाऱ्या आयपीएल सामन्यांदरम्यान सोनी ग्रुपला जाहिरातींमधून भरपूर उत्पन्न मिळते. त्यामुळे या दोन महिन्यांमध्ये सोनी ग्रुप त्यांच्या वर्षभराच्या टार्गेट उत्पनाची सहज कमाई करते.

 

set-max-suryavansam-marathipizza02

 

त्यामुळे उरलेल्या महिन्यांत रिपीट कन्टेन्ट दाखवूनही त्यांच्या उत्पन्नावर म्हणावा तितका परिणाम होत नाही. पुन्हा एकदा हीच गोष्ट त्यांच्या वरील गेम थेअरीसही देखील उपयोगी ठरते.

३) जर सोनी ग्रुप देखील अॅग्रेसीव्ह झाला आणि त्यांनी देखील सेट मॅक्सवर नवनवीन चित्रपट आणि इतर कन्टेन्ट दाखवण्यास सुरुवात केली तर ते एक प्रकारे चित्रपट दाखवणाऱ्या सर्वच भारतीय चॅनेल्समध्ये स्पर्धा निर्माण करेल.

मग सर्वच चॅनेल्समध्ये प्रेक्षकांना आपल्या बाजूने करण्यासाठी नवनवीन कन्टेन्ट दाखवण्याची चढाओढ सुरु होईल आणि हळूहळू cost of acquisition per customer मध्ये वाढ होईल.

 

SetMaxCover InMarathi

 

म्हणजेच कन्टेन्ट खरेदी करण्यासाठी सध्याच्या रकमेपेक्षा अधिक पटीने रक्कम मोजावी लागले.

जे सोनी ग्रुप आणि इतर चॅनेल्ससाठी बिझनेसच्या दृष्टीने नक्कीच चांगले नसेल, हेच सर्व टाळण्यासाठी रिपीट कन्टेन्ट दाखवणे सोनी ग्रुपला परवडते.

४) सातत्याने सुर्यवंशम चित्रपट दाखवून सोनी ग्रुप इतर चॅनेल्सला असे भासवू पाहते की सेट मॅक्सला “ग्रोथ” करण्यामध्ये कोणताही रस नाही. आपण “सेम पेज” वरच आहोत हे सेट मॅक्स इतर चॅनेल्सन पटवून देत आहे. जेणेकरून इतर चॅनेल्स देखील सोनी ग्रुप कॉम्पीटीशन मध्ये नाही असा समज करून कोणतीही नवी स्पर्धा निर्माण करणार नाहीत.

याचा परिणाम असा होतो की चित्रपट दाखवणारी भारतीय चॅनेल इंडस्ट्री नेहमीच डाऊन असते.

यामुळे समजा एखाद्या नवीन चॅनेलला या क्षेत्रात यायचे असल्यास तो विचार करतो की, या क्षेत्रात स्पर्धा नाही आणि मजबूत नफाही नाही, त्यामुळे गेल्या कित्येक वर्षात फारच कमी नवीन चॅनेल्स उदयाला आले आहेत.

 

set-max-suryavansam-marathipizza03

 

५) एकंदर काय तर, सारखे सारखे तेच तेच चित्रपट दाखवणे ही सोनी ग्रुपची खेळी आहे, ज्यामार्फत ते त्यांना अपेक्षित असलेले रिझल्ट सहज मिळवतात.

फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील अनेक बड्या वाहिन्या ही स्ट्रॅटेजी फॉलो करतात हे विशेष!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?