' धोनीची धडाकेबाज बॅटिंग आणि विजयानंतर चिमुकलीला रडू आवरेना...

धोनीची धडाकेबाज बॅटिंग आणि विजयानंतर चिमुकलीला रडू आवरेना…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

जगातला बेस्ट फिनिशर हा टॅग धोनी आजही मिरवतो. खरंतर वयोमानाने आता त्याच्या फलंदाजीतील स्पार्क आधीसारखा उरलेला नाही. धोनीचं वाढतं वय पाहता यात वावगंही काही नाही. कॅप्टन कूलचं डोकं मात्र आजही तितकंच शार्प आहे हे मात्र सगळेच मान्य करतील.

उत्तम यष्टीरक्षक आणि कर्णधार म्हणून त्याचा आजही बोलबाला असला तरी त्याच्या फलंदाजीची जादू पाहण्यासाठी मात्र खूप दिवस वाट पाहावी लागतेय अशी स्थिती होती.

 

 

कालच्या सामन्यात मात्र त्याची बॅट तळपली. त्याला बेस्ट फिनिशर का म्हणतात, ते पुन्हा एकदा पाहायला मिळालं. ६ चेंडूत १८ धावा ठोकत त्याने सामना जिंकून दिला.

शार्दूल ठाकूर आणि मोईन अली यांना त्याने फलंदाजीत दिलेली बढती हा चर्चेचा विषय ठरलाच, मात्र त्याच्या धमाकेदार फलंदाजीने चाहत्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. कारण सामना सीएसकेच्या हातातून निसटतो की काय, असं वाटत असतानाच त्याने ३ चौकार आणि १ षटकार हाणून २ चेंडू शिल्लक ठेवत सामना जिंकला.

या विजयानंतर अनेकांना आनंदाश्रू अनावर झाले असतील. पण खऱ्या अर्थाने चर्चेत आली, ती एक लहान मुलगी…

 

csk crying girl inmarathi

‘धोनी नाम नहीं इमोशन हैं’ असं म्हणत एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. एक लहान मुलगी, धोनीची चाहती धोनीची फलंदाजी आणि सीएसकेचा विजय पाहून फारच भावुक झाली. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. बरोबर हाच क्षण कॅमेऱ्यात टिपला गेला हेदेखील खरं…

या सामन्यात विजयी षटकार मारला गेला, तो बॉल धोनीने या मुलीला भेट म्हणून दिला. त्याच्यातला उत्तम व्यक्ती पुन्हा एकदा पाहायला मिळाली असंच म्हणता येईल.

 

dhoni smiling inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?