' “पेट्रोल-डिझेलने सोनं चांदीचा माज उतरवलाय!” म्हणल्यावर सुबोध भावेच झाले ट्रोल! – InMarathi

“पेट्रोल-डिझेलने सोनं चांदीचा माज उतरवलाय!” म्हणल्यावर सुबोध भावेच झाले ट्रोल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

पेट्रोल आणि डिझेलचे वाढते भाव हा काही फक्त आणि फक्त सर्वसामन्यांच्या चर्चेचा विषय उरलेला नाही. कलाकार मंडळींनी सुद्धा यावर मतं व्यक्त करायला सुरुवात केली आहे. सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरलेल्या या मुद्द्यावर अभिनेते सुबोध भावे यांनी सुद्धा फेसबुकच्या माध्यमातून उपरोधिक भाष्य केलं.

 

subodh bhave inmarathi
hindustantimes.com (Sanket Wankhade/HT PHOTO)

 

ते नेमकं काय म्हणालेत ते बघूया.

सुबोध भावे यांची पोस्ट 

सतत असं वाटायचं की या सोनं आणि चांदी चा माज कोणीतरी उतरवला पाहिजे,त्यांना त्यांच्या किंमतीमुळे आपण लैच भारी असं वाटायला लागलं होतं.दरवर्षी सण आला की त्यांचा रुबाब वाढायचा. पण आता नाही …..

कारण आता पेट्रोल आणि डिझेल यांनी सोन्या,चांदीची मस्ती उतरवली. आता दागिने पण यांचेच करणार,बँकेत ठेव म्हणून पण हेच ठेवणार. स्वतःबरोबर अख्खा बाजारभाव वाढवण्याच यांचं कर्तृत्व अफाट आहे . हे दोन नवीन भारीतले दागिने आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

 

 

आता त्यांनी ही अशी उपरोधिक पोस्ट या फोटोसह केल्यानंतर केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर आपली मतं मांडली नसती तरच नवल… नेटकरी या पोस्टवर अक्षरशः तुटून पडू लागलेत. नेटकऱ्यांनी यावरून सुबोध भावे यांनाच रडारवर घेतल्याचं पाहायला मिळतंय. त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला. यातल्याच काही निवडक कमेंट्स खास तुमच्यासाठी

 

 

संतोष कुलकर्णी यांनी तर आधी सुबोध भावे यांनाच उलट प्रश्न विचारल्याचं पाहायला मिळतंय. अशीच ही आणखी एक कमेंट पहा.

 

 

सरकारने पेट्रोल आणि डिझेलची सक्ती केलेली नाही, असं म्हणत इथे कोपरखळी मारलेली पाहायला मिळतेय.

 

 

सुबोध भावे यांना टार्गेट करण्याची संधी इथेही सोडलेली दिसत नाहीये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा या कमेंटमधून शाब्दिक चिमटा काढलाय असं म्हणायला हवं.

 

 

सुबोध भावे यांनी स्पष्टपणे आवळे विचार मांडत धाडस दाखवलंय असं यांची म्हणणं दिसतंय. असं म्हणत असतानाच, केंद्र सरकारकडे बोट दाखवत सध्याचं राजकारण पातळी सोडू लागलं आहे, हेदेखील सांगायचं प्रयत्न केला गेलाय.

 

 

इथेही सुबोध भावे यांच्यावरच टीका झालेली दिसतेय. एकुणात काय, तर पेट्रोल, डिझेल राहिलं बाजूला आणि लक्ष्य ठरले भावे…

 

 

विजू माने यांनी पोस्ट केलेला बिलाचा फोटो शोधून काढत इथे वेगळ्याच पद्धतीने विनोद निर्मिती झाली आहे. कलाकार मंडळींना ट्रोल करण्याची संधी सामान्य कुणी सोडत नाही हे मात्र खरं…

 

 

एकीकडे टीका तर दुसरीकडे स्तुती… एकामागोमाग एक आलेल्या या दोन कमेंट्स एकत्र वाचताना तुम्हाला नक्कीच हसू आलं असेल.

 

 

काट्याने काटा काढावा असं म्हणतात, ते यांनी फारच मनावर घेतलेलं दिसतंय. उपरोधिक पोस्टवर तितकंच उपरोधिक उत्तर देत यांनी सुद्धा काही लाईक्स कमवलेत नाही का?

 

 

अनेकांनी सुबोध भावे यांच्यावरच निशाणा साधला असला, तरी त्यांच्या बाजूने बोलणारी मंडळी कमी आहेत असंही नाही. या दोघांनी सुद्धा केंद्र सरकारवर निशाणा साधलाय असं म्हणायला हवं.

 

 

पुन्हा एकदा सुबोध भावेंना टोला… ही कमेंटसुद्धा काही वेगळी नाहीये, नाही का?

एकूण काय तर करायला गेलो एक आणि झालं भलतंच असं काहीसं सुबोध भावेंच्या बाबतीत घडलं असं म्हणायला हवं. पेट्रोल आणि डिझेलच्या भावाविषयी व्यक्त होणं चूक नाहीच.

एक नागरिक असल्याने सुबोध भावे यांनी मांडलेलं म्हणणं चुकीचं ठरवता येणार नाही. मात्र एखादी प्रसिद्ध व्यक्ती काही बोलायला गेली, तर सामान्य माणसं त्याविषयी त्यांची मतं मांडणार हेदेखील खरं… आता या अशा गोष्टींची कलाकार मंडळींना सुद्धा सवय असतेच नाही का… सुबोध भावेंचाच डायलॉग वापरायचा झाला, तर अशा गोष्टी घडत असतात, “उसमें क्या हैं”

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?