' अखेर फटका बसलाच... शाहरुख खानच्या 'त्या' जाहिराती आता थांबणार!

अखेर फटका बसलाच… शाहरुख खानच्या ‘त्या’ जाहिराती आता थांबणार!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

एका बाजूला आयपीएलचा माहोल रंगलेला आहे. शाहरुखची मालकी असणाऱ्या कोलकत्ता नाईट रायडर्सच्या संघाने प्ले-ऑफमध्ये धडक मारली, पण शाहरुख मात्र सध्या एका निराळ्याच कारणासाठी चर्चेत आहे.

आर्यन खान ड्रग प्रकरणात अडकला आणि BYJU’S चा ब्रँड अँबेसेडर असलेल्या शाहरुखला लोकांनी लक्ष्य केलं. मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी पालकांनी सजग असावं, असं जाहिरातींमधून सांगणाऱ्या शाहरुखचं वागणं खऱ्या आयुष्यात अगदी उलटं असल्याच्या चर्चा रंगू लागल्या.

‘लोका सांगे ब्रह्मज्ञान…’ असं म्हणत सोशल मीडियापासून ते गल्लीतल्या गप्पांच्या कट्ट्यांपर्यंत सगळ्यांनीच शाहरुखच्या ढोंगीपणावर हल्ला चढवला.

 

shahrukh khan collage inmarathi

 

एखाद्या मोठ्या स्टारला ब्रँड अँबेसेडर करून त्याचं स्टारडम वापरून, लोकांना आपल्या उत्पादनांकडे आकर्षित करायचं हा फंडा तर आता जवळपास प्रत्येकच मोठी कंपनी वापरू लागली आहे. पण त्याच स्टारकडे जर लोक बोटं दाखवू लागले तर मात्र त्याचा फटका ब्रँडला सुद्धा बसतो.

REVITAL ची जाहिरात करत असताना युवराजला कॅन्सर झाला आणि जाहिराती बदलण्यात आल्याचं तुम्हाला आठवत असेल. अशी इतरही अनेक उदाहरणं पाहायला मिळतील. असंच काहीसं BYJU’S च्या बाबतीत घडलं असं म्हणायला हवं. ज्याचा मुलगा ड्रग प्रकरणात अडकलाय, त्याने मुलांच्या भविष्याविषयी सांगावं, हे अनेकांना खटकलं.

 

byjus ad shahrukh inmarathi

ही गोष्ट कंपनीच्या सुद्धा लक्षात आली. या जाहिरातींचा नकारात्मक परिणाम होऊन कंपनीला फटका बसू शकतो, ही बाब कदाचित त्यांच्या लक्षात आली असावी. त्यामुळेच शाहरुखच्या जाहिराती न दाखवण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आलाय.

अर्थात कंपनीने घेतलेल्या निर्णयानुसार सध्या शाहरूखची उपस्थिती असणाऱ्या जाहिराती दाखवण्यात येणार नाहीयेत. त्यामुळे आर्यन खान प्रकरण काहीसं शांत झाल्यावर पुन्हा एकदा BYJU’S ची महती गात असलेला शाहरुख खान पाहायला मिळाला तरी आश्चर्य वाटू नये.

 

shahrukh khan in byjus ad inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?