' ते सध्या काय करतात? इंडियन आयडॉल स्पर्धांमधील हे विजेते आठवतायत का? – InMarathi

ते सध्या काय करतात? इंडियन आयडॉल स्पर्धांमधील हे विजेते आठवतायत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

नव्या स्पर्धा, नवे चेहरे, नव्या संकल्पना यांनी मनोरंजन विश्व नेहमी चकाकत असते. यामध्ये टीव्हीवरील रिऍलिटी शोजचा महत्त्वाचा सहभाग असतो. ‘इंडियन आयडॉल’ हा अशाच कार्यक्रमांपैकी एक! गेल्या १२ सीझनमध्ये या शोने अनेक नवनवीन आणि उत्कृष्ट गाणारे गायक, गायिका आपल्याला दिले.

यातले अनेकजण पार्श्वगायनात यशस्वी झाले, तर अनेकजण स्वत:चे शो करू लागले. पण तरी तुम्हाला उत्सुकता असेलच की या अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे विजेते सध्या काय करतात?

आजपर्यंत इंडियन आयडॉल चे १२ सीझन झाले. त्यातील दोन लहान मुलांसाठी होते. या सर्व सीझनमधील विजेते सध्या काय करत असतील बरे? चला तर मग आपण जाणून घेऊ इंडियन आयडॉलचे हे विजेते सेलिब्रिटी गायक, गायिका सध्या काय करतात.

 

indian idol inmarathi

 

१. अभिजीत सावंत :

आपला मराठमोळा अभिजीत इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनचा विजेता ठरला. त्याने खूप कमी कालावधीत आपला स्वत:चा असा चाहता वर्ग तयार केला. तुम्ही अशा प्रकारची स्पर्धा जिंकली तरी त्याचा बॉलीवूडमध्ये फारसा उपयोग होतोच असे नाही, हेच आपल्याला अभिजीत सावंत याच्या उदाहरणातून दिसून येते.

 

abhijit sawant inmarathi

 

अभिजीतने २००५ साली इंडियन आयडॉलचा पहिला सीझन जिंकला होता. त्यानंतर चित्रपट आणि संगीत क्षेत्रात तो २००८ पर्यंत चांगला सक्रिय होता. ‘आपका अभिजीत सावंत’ हा त्याचा पहिला सोलो अल्बम होता.

२००५ ते २०१७ या काळात त्याने एकूण ११ गाणी चित्रपटांसाठी गायली. ‘लॉटरी’ या चित्रपटात त्याने भूमिका देखील केली. ‘एशियन आयडॉल’ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत त्याने तिसरे स्थान मिळवले. आजकाल तो आपल्या नवीन अल्बमच्या तयारीत आहे.

२. संदीप आचार्य :

इंडियन आयडॉल सीझन २ चा विजेता संदीप आचार्य आता कोणाला फारसा लक्षातही नसेल कारण ही स्पर्धा जिंकल्यानंतर अवघ्या ६ वर्षांतच त्याचे निधन झाले. त्याने काही काळ काम केले. पण त्यानंतर तो आजारी होता. त्याच्या प्रदीर्घ आजारातच त्याचे निधन झाले. त्यावेळी तो २९ वर्षांचा होता.

 

sandeep acharya inmarathi

 

इंडियन आयडॉल जिंकल्यानंतर त्याने एक वर्षभर सोनी म्युझिक सोबत काम केले. बिकानेर राजस्थान येथे जन्मलेल्या संदीपचा मृत्यू गुडगावच्या एका हॉस्पिटलमध्ये झाला. त्याने अनेक जुन्या गाण्यांची कव्हर सॉंग गायली होती.

३. प्रशांत तमांग :

दार्जिलिंगचा हा मुलगा मूळचा नेपाळी. कलकत्त्यात पोलिस दलात काम करत होता. ही स्पर्धा जिंकल्यानंतर प्रशांत तमांगने नेपाळी चित्रपटातून काम करायला सुरुवात केली. त्याने आता पर्यंत तीन चित्रपटांमध्ये काम केले असून ‘गोरखा पलटन’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटासाठी त्याने प्ले बॅक सिंगिंगही केली होती.

 

prashant tamang inmarathi

 

२०१६ साली त्याने ‘ये माया हनैमा’ या चित्रपटात काम केले. निशाणी आणि परदेशी हे दोन त्याचे गाजलेले चित्रपट. सध्या तो नेपाळी चित्रपट सृष्टीत कार्यरत आहे.

४. सौरभी देबर्मा :

सीझन ४ ची विजेती सौरभी ही ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ धारक आहे. तिने ‘अपसाईड डाऊन’ गाण्याचा रेकॉर्ड केला. पहिल्यांदाच या सीझनची विजेती महिला ठरली. या आधी कधीही या शोमध्ये एखादी मुलगी शेवटपर्यंत पोहोचली नव्हती.

मुळची त्रिपुरा येथील सौरभी सध्या अनेक अल्बमसाठी गाणी गाते. तिन तिची अनेक सोलो गाणी देखील गायली आहेत. या सीझनचा रनरअप ठरला होता कपिल थापा. या कपिल थापासोबतच सौरभीने लग्न केलं आहे.

 

sourabhee debbarma inmarathi

५. श्री राम :

सीझन ५ चा विजेता ठरला तो श्री राम. आतापर्यंतच्या सर्व विजेत्यांमधील सर्वात यशस्वी झालेला हा गायक. मूळ आंध्रप्रदेशातील श्री राम सध्या हिंदी आणि साऊथ सिनेसृष्टी गाजवत आहे. त्याने अनेक मोठ्या चित्रपटांसाठी प्ले बॅकसिंगिंग केलेले आहे.

 

sreeram inmarathi

 

नेक दिग्गज कंपोझरसोबत त्याने काम केले आहे. आंध्रप्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर’ पुरस्कार त्याला बहाल करण्यात आला आहे. त्याने अनेक जुन्या गाण्यांचे रिमेक व्हर्जन गायले आहे. त्याने गाण्यासोबतच साऊथच्या चित्रपटातही काम केले आहे. हँडसम असलेल्या श्रीरामचा फॅनफॉलोईंग खूप मोठा आहे.

६. विपुल मेहता :

२०१२ मध्ये सहाव्या सिझनचा विनर होता, विपुल मेहता. त्याने एक अल्बमसुद्धा बनवला होता. तो खूपचं लोकप्रिय झाला होता. विपुल सध्या फिल्म इंडस्ट्रीपासून लांब असला तरी अनेक लाइव्ह शो करताना दिसतो.

 

vipul mehta inmarathi

 

७. अंजना पद्मनाभन

२०१३ मध्ये इंडियन आयडलचे सातवे पर्व सुरु झाले होते. या पर्वामध्ये अनेक लहान मुलांना परफॉर्म करण्याची संधी देण्यात आली होती. या पर्वाची अंजना पद्मनाभन विजेती ठरली होती. सध्या ती बेंगलोरमध्ये रहात आहे.

 

anjana padmanabhan inmarathi

 

८. अनन्याश्रीतम नंदा :

ओरिसा येथील अनन्या ही सीझन ८ ची विजेती होती. आजवर तिने एकूण ३१ गाणी चित्रपटांसाठी गायली असून त्यात ‘एम.एस.धोनी, बेबी’ अशा चित्रपटांचा समावेश आहे. लहान वयात अनन्याने खूप मोठी कामगिरी केली आहे. पण २०१७ नंतर तिने कोणतेच नवीन गाणे गायले नाही.

 

ananya sritam nanda inmarathi

९. एल.व्ही. रेवंथ :

विशाखापट्टणमच्या एल. व्ही. रेवंथने ( लोल्ला वेंकटा रेवंथ कुमार शर्मा ) इंडियन आयडलचे ९ वे पर्व जिंकले होते. एका यशस्वी ‘इंडियन आयडॉल’ विजेत्याचे तो उत्तम उदाहरण आहे. २०० हून अधिक तेलगू, कन्नड आणि हिंदी गाणी त्याने गायली आहेत.

त्यानंतर त्याने ‘बाहुबली’ आणि ‘अर्जुन रेड्डी’ या दाक्षिणात्य हिट चित्रपटांमधील गाणी गायिली आहेत. तो स्वत:चे स्टेज शो करतो. तेलगू चित्रपटसृष्टीत तो सुपर सिंगर म्हणून परिचित आहे.

 

l v revanth inmarathi

 

१०. सलमान अली :

सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारा सलमान अली हा इंडियन आयडॉल १० चा विजेता आहे. हरियाणाचा पठ्ठा असलेला सलमान हा केवळ परीक्षकांच्या कौतुकास पात्र ठरला असे नाही तर शोमध्ये आलेल्या पाहुण्यांनी देखील त्याच्या धमाकेदार परफॉर्मन्सचे कौतुक केले होते.

 

salman ali inmarathi

 

११. सनी हिंदुस्तानी :

अकराव्या पर्वाचा विजेता सनी हिंदुस्तानी ठरला. भटिंडाच्या या गायकाची कहाणी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच आहे. कुटुंबाच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीमुळे सनीला लहानपणीच शू पॉलिश सारखे काम करावे लागले. केवळ गाण्याचा ध्यास आणि आवड या जोरावर सनीने ही स्पर्धा जिंकली.

परीक्षकांनी त्याला ‘नुसरत फतेह अली खान’ यांची उपमा दिली होती. त्याला २५ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले होते. शो चालू असतानाच त्याला चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली होती.

 

sunny hindustani inmarathi

 

१२. पवनदीप राजन :

इंडियन आयडॉल जिंकण्यापूर्वी पवनदीपने ‘द व्हॉईस ऑफ इंडिया’ ही स्पर्धा जिंकली होती. त्याचे वडील प्रसिद्ध कुमाऊं गायक आहेत. स्वत:च्या यूट्यूब चॅनलसाठी त्याने अनेक गाणी तयार केली आहेत. अडीच वर्षांचा असतानाच त्याने “सर्वात तरुण तबला वादक” ही पदवी जिंकली आहे.

 

pawandeep rajan inmarathi

 

इंडियन आयडॉल ही देशातील एक मोठी स्पर्धा आहे. स्पर्धेतून बाहेर झालेल्या किंवा स्पर्धा जिंकलेल्या कित्येक गायक गायिकांनी पुढे जाऊन संगीत क्षेत्रात अमाप यश मिळवले आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?