' स्वरा आणि परीचं सेटवर 'भांडण'! आता तुम्हीच सांगा बरं माईक नक्की कुणाकडे असावा

स्वरा आणि परीचं सेटवर ‘भांडण’! आता तुम्हीच सांगा बरं माईक नक्की कुणाकडे असावा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

‘झी मराठी’ वाहिनीचा दर्जा आता आधीसारखा राहिलेला नाही, अशी ओरड तर आता जवळपास सगळीकडेच पाहायला, ऐकायला मिळते. पण ही वाहिनी नवे प्रयोग करणं आणि एखाद्या छानशा प्रयोगाने प्रेक्षकांना एखादा सुखद धक्का देणं यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते.

असाच एक नवा आणि उत्कृष्ट प्रयोग घेऊन चॅनलवाले आले आहेत, असंच म्हणायला हवं. येत्या काळात झी मराठीचा अवॉर्ड शो रंगणार असून, त्यात एक खास मेजवानी वाहिनी आपल्यासाठी घेऊन आली आहे. हे खास काहीतरी नक्की काय आहे, ते जाणून घेऊयात.

 

zee marathi inmarathi

 

अष्टपैलू स्वरा

‘सा रे ग म प’ लिटिल चॅम्प्स हा कार्यक्रम सध्या फारच चर्चेत आहे. यात घडणाऱ्या चांगल्या-वाईट गोष्टी, लहानगे गायक आणि त्यांनी सादर केली सुदंर गाणी या सगळ्यामुळे या कार्यक्रमाचा चाहता असणारा प्रेक्षकवर्ग आवडीने हा रिऍलिटी शो पाहत आहे. ही लहान मुलं म्हणजेच उभरते कलाकार आहेत, असं म्हणायला हवं. गाण्याच्या बरोबरीनेच त्यांच्यातील इतर कलागुण सुद्धा दिसून येत आहेत.

गाण्याचं उत्तम सादरीकरण करणारी स्वरा जोशी ही तितकीच चांगली नकलाकार सुद्धा असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. तिच्या नकला, काहीवेळा केलेला अभिनय आणि मिश्किल वागणं यामुळे ती सगळ्यांचीच लाडकी झाली आहे.

 

swara joshi inmarathi

 

परीची जादू…

या रिऍलिटी शो प्रमाणेच सध्या चर्चेत असलेला आणखी एक कार्यक्रम म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी असे एकसे बढकर एक कलाकार या मालिकेत असताना सुद्धा परी सर्वाधिक भाव खात असल्याचं पाहायला मिळतंय. परी म्हणेजच मायरा वायकुळ हिच्या गोड आणि निरागस अभिनयाचं कौतुक प्रेक्षकवर्ग अगदी मनापासून करत आहे.

 

pari majhi tujhi reshimgath inmarathi

 

परीची भूमिका साकारणारी मायरा आता सगळ्यांची लाडकी झाली आहे. एक बाल कलाकार म्हणून ती सगळ्यांची लाडकी ठरलेली असतानाच, एका नव्या भूमिकेत आता पाहायला मिळणार आहे. परीची ही नवी भूमिका, म्हणजेच ‘झी मराठी अवॉर्ड २०२१’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन!

झी मराठी वाहिनीने नुकताच एक प्रोमो त्यांच्या इंस्टग्रामवर टाकला आहे. यात स्वरा आणि मायरा भांडताना दिसतायत. हे भांडण सुरु आहे, अँकरिंग नक्की कोण करणार, या विषयावरून… मायरा सुरुवातीला, “वन, टू, थ्री माईक चेक” असं बोलताना दिसतेय, तर त्यानंतर तिच्या हातून माईक काढून घेत, “तू चांगली अॅक्टर असलीस, तरी मला माईकवर कसं बोलायचं ते जास्त माहित आहे” असं स्वरा तिला म्हणताना दिसतेय.

लिटिल चॅम्प स्वरा जोशी आणि बालकलाकार मायरा वायकुळ या दोघीजणी मिळून येत्या अवॉर्ड शोचं सूत्रसंचालन करणार असल्याचं या प्रोमो बघून नक्कीच सांगता येऊ शकतं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

 

अर्थात, प्रोमोमध्ये त्यांचं सुरु असलेलं लुटूपुटूचं भांडण त्या दोघी मिळून प्रेक्षकांचं कसं मनोरंजन करणार याचा प्रत्यय देणार आहे हेही खरं… त्यामुळे या दोघींची नेमकी कशी जुगलबंदी रंगते आणि या दोन बालकलाकार सूत्रसंचलनाची जबाबदारी कशी पार पाडतात, याविषयी आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

मग मंडळी, तुम्हाला काय वाटतं या दोघींपैकी कोण छान सूत्रसंचालन करू शकेल? ही जुगलबंदी कशी रंगेल? तुमची मतं कमेंटमधून मांडायला विसरू नका…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?