' बिग बॉसच्या अलिशान घरात राहण्यासाठी ही लोकं किती मानधनं घेतायत, माहीत आहे?

बिग बॉसच्या अलिशान घरात राहण्यासाठी ही लोकं किती मानधनं घेतायत, माहीत आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

सध्या दररोज रात्री घराघरांमध्ये ‘बिग बॉस सांगु इच्छितात’ अशी दमदार आवाजातील घोषणा घुमतीय. अर्थात काही घरांनी हिंदी बिग बॉस पाहण्याचा पर्याय निवडला असला तरी महाराष्ट्रातील बहुसंंख्य कुटुंबांनी बिग बॉसच्या मराठमोळ्या घराला पसंती दिली आहे.

बिना शर्टचा जय, वाद घालणारी मीरा, कागाळ्या करणारी सुरेखा तर गोंधळलेला विशाल अशा अनेक कलाकारांबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. यापैकी काही सदस्यांच्या नावाने प्रेक्षक खडे फोडतात तर काहींना भरभरून मतं देत घराबाहेर जाण्यापासून वाचवतात.

मात्र आपल्या कुटूंबापासून १०० दिवस लांब रहायचं ते देखील कोणत्याही संपर्क साधनाविना, हे सोपं काम नाही. घरातील कामं असो वा टास्क या सगळ्यासाठी बिग बॉसच्या या सदस्यांना निर्मात्यांकडून गलेलठ्ठ रक्कम दिली जाते.

 

big boss inmarathi

 

अर्थात कोणत्या कलाकाराला नक्की किती मानधन दिलं जातं, याची खरी आकडेवारी फारशी कुणालाच ठाऊक नसते मात्र यंदाच्या सिझनमध्ये खेळणाऱ्या कलाकारांना सुमारे किती मानधन मिळतं? आपल्या मनोरंजानासाठी कुणाच्या खात्त्यात किती रक्कम जमा होते? हे ठाऊक आहे का?

१. तृप्ती देसाई

स्त्रीवादी कार्यकर्त्या तृप्ती ताई बिग बॉसच्या घरात दादागिरी करणार का? असा प्रश्न पडला होता, त्या घरात आल्याने प्रेक्षकांनी नाराजीही व्यक्त केली होती. मात्र बाहेरच्या जगात अरेरावी करणाऱ्या ताईंनी बिग बॉसमध्ये काहीशी मवाळ भुमिका घेतली आहे.

 

trupti big boss inmarathi

 

तृप्तीताईंना दर आठवड्यासाठी सुमारे २० हजार रुपये मानधन दिलं जातं.

२. संतोष चौधरी

कोळीगीतांचा राजा म्हणून ओळखले जाणारे दादुस अर्था संतोष चौधरी हे प्रेक्षकांचेच नाहीत तर घरातील कलाकारांचंही लाडकं व्यक्तीमत्व!

 

santosh inmarathi

 

मिश्किल आणि साधाभोळा स्वभाव असलेल्या दादुसना घरात आल्यापासून दर आठवड्याला साधारण ३७ हजार रुपये मानधन दिलं जातं.

३ जय दुधाणे

हिंदी शो मधून आलेला जय दुधाणे हा घरातील सर्वात हॉट सदस्य म्हणून ओळखला जातो. आपल्या सिक्स पॅकचं प्रदर्शन व्हावं यासाठी विना शर्टाचा फिरणारा, खेळात आक्रमक आणि घरातील मुलींशी फ्लर्ट करणारा जय तरुण प्रेक्षकांना आवडतो, तर काहींना त्याचं वागणं आगाऊपणाचं, किंवा प्रसिद्धीसाठी केलेला खेळ वाटतो.

मात्र एकूणच सध्या घरातील सदस्यांपैकी सोशल मिडीयावर सतत चर्चेत असणाऱ्या सदस्यांमध्ये जयचं नाव अग्रगण्य आहे. यासाठीच तो घरातला सर्वात महागडा सदस्य आहे.

 

jay inmarathi

 

सध्या त्याला प्रत्येक आठवड्यासाठी १ लाख २५ हजार रुपये रक्कम तो बिग बॉसच्या निर्मात्यांकडून मिळवतोय. त्याच्याइतकं मानधन इतर घरातील ज्येष्ठ, अनुभवी कलाकारांनाही मिळत नाहीये.

४. मीरा जगन्नाथ

अभिनेत्री मीरा जगन्नाथ घरात आली आणि अनेकींनी तिची तुलना बिग बॉस सिझन १ ची विजेती मेघा धाडे हिच्याशी केली. चढा आवाज, ‘हम करे सो कायदा’ ही वृत्ती, कायमच स्वतःचे प्रस्थ माजवून राहणारी मीरा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय असतेच मात्र तिला विरोध करणा-यांच प्रमाण अधिक आहे.

 

meera jagannath inmarathi

 

असं असलं तरी तिला हा खेळ बरोबर उमगलाय असं म्हणणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाही, तिची वाढती प्रसिद्धी लक्षात घेता तिला दर आठवड्याला ५५ हजार रुपये मानधन दिलं जातं.

५. गायत्री दातार

तुला पाहते रे या मराठी मालिकेतून पदार्पण केलेली तसेच काही डान्सिंग शोमध्ये सहभागी झालेली गायत्री घरात आली खरी, मात्र त्यानंतर तिच्याबाबत प्रेक्षकांकडून नकारात्मक प्रतिसाद ऐकू येऊ लागले.

 

gayastree inmarathi

 

तिचा आरडाओरडा, इतरांच्या सल्ल्याने खेळला जाणारा खेळ अशा काही मुद्द्यांवरून प्रेक्षक नाराज असल्याचं चित्र सोशल मिडीयावर दिसतं. दर आठवड्याला गायत्री निर्मात्यांकडून ४७ हजार रुपयांचं मानधन घेत आहे.

कट्टर फॅन्सना देखील उल्लू बनवणारी ‘बिग बॉस’ची ही ८ सिक्रेट्स…

या तीन सदस्यांपैकी कुणाला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढाल? वाचा आणि कमेंट करा

६ सुरेखा कुडची

मालिकांमधून खाष्ट सासुची भुमिका करणारी अभिनेत्री सुरेखा कुडची घरातील सदस्यांनाही धाकात ठेवतील आणि शोमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करतील असा कयास होता, मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही.

पहिल्या आठवड्यात फारशा कॅमेऱ्यासमोर न आलेल्या सुरेखा यांनी दुसऱ्या आठवड्यानंतर आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. ठराविक कलाकारांशी पंगा घेणा-या सुरेखा यांच्याबाबतही मतमतांतरे आहेत.

 

surekha inmarathi

 

सुरेखा या अनुभवी कलाकार असल्या तरी त्यांना अनेक तरुण कलाकारांपेक्षाही कमी म्हणजेच दर आठवड्याला ३७ हजार रुपये मानधन दिलं जातं.

७. विशाल निकम

फत्तेशिकस्त सारख्या सिनेमांमधून पदार्पण करणारा अभिनेता विशाल निकम हा सध्या बिग बॉसमुळेे चर्चेत आहे. साधाभोळा असलेला विशाल टास्कदरम्यान मात्र फार आक्रमक होतो, सदस्यांना धक्काबुक्की करतो याबाबत प्रेक्षक नाराज आहेत.

 

vishal inmarathi

 

स्वतःचं डोकं वापरून खेळण्याचा सल्लाही त्याला प्रेक्षकांतर्फे दिला जातो. विशालला घरात राहण्यासाठी प्रति आठवडा ५५ हजार रुपये मानधन मिळतं.

८. स्नेहा वाघ

मराठीच नव्हे तर हिंदी मालिकांमध्येही ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे स्नेहा वाघ! तिचं रुप, घरातील हसरा वावरं प्रेक्षकांना काही प्रमाणात आवडत असलं तरी तिच्या खेळाच्या पद्धतीबाबत मतमतांतरं आहेत.

 

sneha wagh inmarathi

 

अविष्कार दारव्हेकर या आपल्या आधीच्या नव-यासोबत घरात वावरताना ती संयम राखण्याचा प्रयत्न करते आणि यासाठी सोशल मिडीयावर कौतुकही होत आहे.

स्नेहाला प्रत्येक आठवड्यासाठी सुमारे ४५ हजार रुपये मानधन मिळतं.

९. विकास पाटील

मराठी मालिकांमधील लोकप्रिय चेहरा असलेला विकास पाटील घरात आवडत्या सदस्यांपैकी एक आहे. शांत डोक्याने खेळणारा हुशार खेळाडू म्हणून त्याचं कौतुक होतं.

 

vikas inmarathi

 

घरात राहण्यासाठी त्याला दर आठवडा ४५ हजार रुपयेय मानधन दिलं जातं.

१०. अक्षय वाघमारे

मराठी सिनेमांमधील हिरो आणि अरुण गवळी यांचा जावई अभिनेता अक्षय वाघमारे प्रेक्षकांना आवडतोय. एरव्ही साधाभोळा असणारा अक्षय आणि विशाल यांची दररोज होणारी भांडणं हा चर्चेेचा विषय असतो.

 

akshay inmarathi

 

अक्षयला घरात राहण्यासाठी ६० हजार रुपये मानधन मिळतं.

११. मीनल शहा

हिंदी शो रोडीज मधून खिलाडूवृत्ती शिकलेली मीनल शहा सध्या प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरातही आवडतीय.

 

minal inmarathi

 

भांडणांपेक्षाही घरातील टास्कमध्ये रमणारी, खेळ जिंकण्यासाठी विविध युक्त्या लढवणाऱ्या मीनलला ३७ हजार रुपये मानधन दिलं जातं.

१२. सोनाली पाटील

कोल्हापुरी ठसका घेऊन आलेली अभिनेत्री सोनाली पाटील घरात चर्चेत असतेच.

 

sonali inmarathi

 

लहान-मोठ्या मुद्द्यांवरून आपला आवाज शिगेला पोहोचवणा-या सोनालीला घरात राहण्यासाठी सुमारे ६० हजार रुपये मानधन दिलं जातं.

१३ शिवलिला पाटील 

किर्तनकार शिवलिला पाटील हिच्या घरातील पदार्पणामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. किर्तनकार महिलेने अशा शो मध्ये सहभागी होऊ नये यासाठी बरीच चर्चा झाली होती.

 

shivleela inmarathi

 

मात्र या सगळ्या टिकेनंतर अकेर तब्बेतीचं कारण देत शिवलिला दुसऱ्याच आठवड्यात घराबाहेर पडली आणि चर्चेला पुर्णविराम मिळाला. अवघ्या आठवड्याभराची पाहुणी असलेल्या शिवलिला ७० हजार रुपये मानधन दिलं जात होतं.

१४. डॉ उत्कर्ष शिंदे

शिंदेशाही घराण्याचे सुपुत्र डॉ उत्कर्ष शिंदे हे देखील घरातील वादग्रस्त व्यक्तीमत्व! दुटप्पीपणाबाबत पहिल्याच आठवड्यात त्याला मांजरेकरांनी खडेबोल सुनावले. सध्या तो सुधारण्याचा प्रयत्न करत असला तरी अनेक प्रेक्षकांची नाराजी अजूनही कायम आहे.

 

dr utakarsh inmathi

 

त्याला दर आठवड्यासाठी ६५ हजार रुपये मानधन मिळतं.

१५. अविष्कार दारव्हेकर

एकेकाळी मराठी मालिकांतील सुप्रसिद्ध चेहरा असलेला अविष्कार घरात आल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या, सुटलेलं पोटं, वाढतं वजन यावरून प्रेक्षकांनी त्याची टिंगलही केली. खेळातही तो फारशी चमक दाखवू शकला नाही.

 

avishkar inmarthi

 

स्नेहा वाघ हिला मारहाण केल्याच्या आरोपानंतर त्यांचा घटस्फोट झाला मात्र आता तिच्या सोबतच घरी राहताना तो तिच्याशी जुळवून घेताना, तिचं कौतुक करतानाही दिसतो. त्याला एका आठवड्यासाठी ३७ हजार रुपये दिले जातात.

 

sneha inmarathi

 

एकूणच हे कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी घरात भरभक्कम रक्कम मिळवतात. अर्थात हिंदी असो वा मराठी बिग बॉसच्या कलाकारांच्या मानधनाबाबत कधीही संपूर्ण खुलासा केला जात नाही. मात्र काही सोर्सेस तसेच काही वृत्त वाहिन्यांनी प्रसारित केलेल्या माहितीनुसार सदस्यांना दिले जाणारे साधारण मानधन इथे नोंदवले आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?