' २७५ लहान धबधब्यांपासून तयार होणारा महाप्रचंड धबधबा! – InMarathi

२७५ लहान धबधब्यांपासून तयार होणारा महाप्रचंड धबधबा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पावसाळ्यात मनाला सर्वात जास्त भुरळ घालतो धबधबा! एखाद्या उंच डोंगरावरून कोसळणारा धबधबा पाहण्यासारखे नेत्रसुख नाही, त्याचे तुषार अंगावर झेलताना येणारा रोमांच, मनात धडकी भरवणारा पण सतत ऐकत रहावासा वाटणारा आवाज या गोष्टी तर आपल्याला त्याच्याकडे अजूनच आकर्षित करत असतात.

म्हणूनच, की काय पावसाळा सुरु झाला रे झाला की सगळ्यांचीच पावले आपोपाच धबधब्यांकडे वळतात. महाराष्ट्रात असे असंख्य धबधबे आहेत, जे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे नावारूपाला आले आहेत.

पावसाळ्याच्या दिवसात लोणावळा, माळशेज घाट, किंवा तसं ठिकाणी होणारी गर्दी तर आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे. अगदी नवी मुंबई परिसरातील खारघर येथे असलेला पांडव कडा धबधबा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे.

 

malshej-ghat-waterfall-inmarathi

 

सह्याद्रीतील अनेक ट्रेक्स सुद्धा अशा धाडब्यांच्या वाटांमधून जातात. तिथे धमाल करायला लोक गर्दी करतात. तुफान वाहणाऱ्या धबधब्यांनी साऱ्या परिसराचं सौंदर्य भरून राहिलेलं असतं. दूर दूर हून पर्यटक त्यांचा जलप्रपात पाहण्यासाठी खास गर्दी करतात.

जगात अनेक ठिकाणी असे अप्रतिम धबधबे अस्तित्वात आहेत. कॅनडा आणि अमेरिकेच्या हद्दीवर असलेला नायगरा फॉल्स तर जगप्रसिद्ध आहेच…

मात्र जगभरात अनेक ठिकाणी असे धबधबे आहेत, ज्यांच्याविषयी आपल्याला फार माहिती नसते. कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांच्याकडे एखादे खास वैशिष्ट्य असते.

आज आम्ही तुम्हाला जगातील एका अश्या खास धबधब्याबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल फारच कमी लोकांना माहित आहे. या धबधब्याचं सुद्धा एक आगळंवेगळं वैशिष्ट्य आहे.

या धबधब्याचची खासियत ही की तब्बल २७५ धबधब्यांपासून हा महाकाय धबधबा तयार होतो.

 

iguasu-falls-marathipizza01

 

या धबधब्याचे नाव आहे- इगुआजू फॉल्स! अर्जेंटीना आणि ब्राझीलच्या सीमेवरील हा नयनरम्य धबधबा आहे. हा चित्त थरारक व सुंदर धबधबा तब्बल २७५ छोट्या-छोट्या धबधब्यां पासून तयार झाला आहे.

 

iguasu-falls-marathipizza02

 

इगुआजू नावाच्या या धबधब्याचा शोध एका ब्रिटीश चमूने १५४२ मध्ये लावला होता. अर्जेंटीना व ब्राझीलच्या सफरीवर असलेले हे लोक रात्रीच्या वेळी या धबधब्याजवळ पोहोचले होते. सकाळी ते झोपेतून उठले तेव्हा तिथले दृश्य पाहून थक्कच झाले.

येथील निसर्गसौदंर्य खरोखरंच अफलातून आहे. पाहताक्षणीच या सौंदर्याची मनाला भुरळ पडते. 

 

iguasu-falls-marathipizza03

 

इगुआजू नदीवर बनलेला हा धबधबा पाच किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे. जे २७५ धबधबे मिळून हा बनलेला आहे, ते या ५ किलोमीटरच्या परिसरात एकत्र येण्यास सुरुवात होते. या ठिकाणी अर्जेंटीना, ब्राझील व पॅराग्वे या देशांच्या सीमांचा संगम सुद्धा आहे.

तिथला सर्वात उंच धबधबा ६४ मीटर व अन्य ३० ते ४० मीटर उंच आहेत.

 

iguasu-falls-marathipizza04

 

हे ठिकाण ब्राझील आणि अर्जेंटीना दोन्ही देशांनी राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित केले असून तिथे विविध प्रकारचे वन्यजीव आढळून येतात. या धबधब्यामुळेच इगुआजू नदी दोन भागांत विभागली जाते, म्हणजेच हा नितांत सुंदर धबधबा, नदीचे दोन भागांमध्ये विभाजन करतो असं म्हणता येईल.

 

iguasu-falls-marathipizza05

या धबधब्याच्या जवळपास दोन विमानतळ सुद्धा आहेत. पहिला कॅतारात्स डेल इगझू आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि दुसरा म्हणजे फोझ दो इगचू आंतरराष्ट्रीय विमानतळ… हे विमानतळ गुअझू पासून २५ किलोमीटर दूर आहेत.

ब्राझील शहरातून हा धबधबा पाहण्यासाठी हेलीकॉप्टर राइड्स पण उपलब्ध आहेत. पर्यटक अगदी आनंदाने या हेलिकॉप्टर राइड्सचा सुद्धा आनंद घेतात.

 

iguasu-falls-marathipizza06

 

असा हा धबधबा खूप विलोभनीय आणि मनमोहक आहे, जर जीवनात संधी मिळाली तर नक्की या धबधब्याला भेट द्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?