' मोहम्मद अझरुद्दीन 'अजूनही' संघात स्थान मिळायची वाट बघतोय...!!

मोहम्मद अझरुद्दीन ‘अजूनही’ संघात स्थान मिळायची वाट बघतोय…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

मोहम्मद अझरुद्दीन म्हटलं की २००० सालापूर्वीच्या भारतीय क्रिकेट संघाचा एक डॅशिंग कर्णधार आठवतो. ताठ कॉलर, मैदानावरचा दमदार वावर उत्तम क्षेत्ररक्षण या सगळ्या गोष्टी आजही क्रिकेट चाहत्यांना आठवत असतील. नंतर मात्र भारतीय क्रिकेट विश्वात भूकंप घडला. मॅच फिक्सिंगचे आरोप, काही खेळाडूंवर झालेली कारवाई या सगळ्या गोष्टींनी क्रिकेटविश्व हादरलं.

 

mohammad azaruddin inmarathi

 

अजय जडेजासारख्या गुणी खेळाडूंची कारकीर्द यामुळे उध्वस्त झाली असं म्हणायला हवं. याच गुणी खेळाडूंच्या यादीत आणखी एक नाव नेहमीच घेतलं जातं, ते म्हणजे मोहम्मद अझरुद्दीन! भारताच्या या खमक्या खेळाडूची कारकीर्द सुद्धा बंदीमुळे संपुष्टात आली. पुढे त्याला मॅच फिक्सिंगच्या प्रकरणात क्लीन चिट मिळाली हेदेखील सगळ्यांना ठाऊक आहे.

अर्थात या मोहम्मद अझरुद्दीनला आता कुठल्याही संघात स्थान मिळणार नाही, यात काहीच शंका नाही. पण एक मोहम्मद अझरुद्दीन आहे, जो संघात स्थान मिळण्याची अजूनही वाट पाहतोय…! गोंधळलात ना? हा ज्युनियर मोहम्मद अझरुद्दीन म्हणजे अझरुद्दीनचा मुलगा किंवा कुणी नातेवाईक मात्र नाहीये. मग हा आहे तरी कोण? जाणून घेऊयात.

 

mohammad azharuddin kerala inmarathi

आयपीएलमध्ये RCB च्या गोटात सामील…

यष्टीरक्षक फलंदाज असणारा २७ वर्षांचा मोहम्मद अझरुद्दीन सध्या विराटच्या रॉयल चॅलेंजर्स संघाचा सदस्य आहे. श्रीकर भरत हा संघातील प्रमुख यष्टीरक्षक मानला जात असल्याने, त्याला अजूनही संघात स्थान मिळालेलं नाही. तो अजूनही संघात स्थान मिळण्याची वाट पाहतोय.

एक दमदार फलंदाज म्हणून मध्यंतरी मोहम्मद अझरुद्दीन, हे नाव फारच चर्चेत आलं होतं. त्याची कारकीर्द नक्की कशी होती, त्याविषयी थोडंसं…

रणजी पदार्पण…

६ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५-१६ च्या रणजी हंगामात या गुणी फलंदाजाने गोव्याच्या संघाविरुद्ध रणजी पदार्पण केलं. केरळमध्ये जन्मलेला हा तरुण खेळाडू रणजीपटू झाल्यापासून संघाचा नियमित सदस्य झाला आहे. रणजीमध्ये स्थान मिळवण्याआधी त्याने आपल्या चांगल्या कामगिरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

 

mohammad azharuddin junior inmarathi

 

वयाच्या ११ व्या वर्षी अंडर १३ आणि वयाच्या १३ व्या वर्षी अंडर १५ च्या संघामध्ये त्याने जागा पटकावली होती. त्याचं टॅलेंट लहानपणापासूनच पाहायला मिळत होतं. पुढे २०१३ मध्ये त्याने अंडर १९ च्या केरळ संघात सुद्धा स्थान मिळवलं आणि धमाका सुरूच ठेवला. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत त्याने स्फोटक फलंदाजीचा प्रत्यय दिला होता.

संजू सॅमसन मुख्य यष्टीरक्षक असल्याने, तो फलंदाज म्हणून संघाचा महत्त्वाचा सदस्य झाला आणि छाप पडत राहिला.

दोन वर्षांतच त्याने अंडर २२ च्या संघातही स्थान मिळवलं आणि या संघाचा भाग होणं त्याच्या रणजी पदार्पणाचं मुख्य कारण ठरलं. त्याने  सुरूच ठेवली आणि त्याचं फळ लवकरच मिळालं ते रणजीच्या मुख्य संघात स्थान मिळण्याच्या रूपात…

१३७ धावांची धमाकेदार खेळी

यंदाच्या जानेवारी महिन्यात हा ज्युनियर अझर अधिकच चर्चेत आला. मुश्ताक अली टी-२० सामन्यात ३७ चेंडूत शतक झळकावत त्याने मुंबईच्या संघाविरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. या खेळीत त्याने एकूण ५४ चेंडूत १३७ धावा कुटल्या आणि टी-२० मधील त्याचा सर्वात मोठा स्कोर उभा केला.

 

azharuddin 137 inmarathi

 

नावामागचं गुपित

मोहम्मद अझरुद्दीन याचं नाव भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याच्या नावावरूनच ठेवण्यात आलं आहे. कुटुंबातील हा सातवा मुलगा होता. त्याचा मोठा भाऊ अझरचा चाहता! मग या भावानेच आपल्या या धाकट्या भावाचं नाव मोहम्मद अझरुद्दीन ठेवायचं ठरवलं. हे नाव धारण करून धाकटा भाऊ मैदानावर उतरला आणि त्याने मैदान गाजवलं सुद्धा…

 

mohammad azharuddin 37 balls 100 inmarathi

आजवरच्या कामगिरीचं फलित म्हणून त्याला रॉयल चॅलेंजर्सच्या गोटात जागा मिळाली. विराट, एबीडी, मॅक्सवेल असे काही दिग्गज, सिराज आणि चहल सारखे समवयस्क गुणी खेळाडू यांचा समावेश असणारी ड्रेसिंग रूम शेअर करता येणं हे त्याचं भाग्य आहे हे नक्की…

मात्र असं असूनही, त्याला आरसीबीच्या अंतिम संघात अद्याप स्थान मिळालेलं नाही. बाकांवर बसून तो नक्कीच कंटाळला असेल. शिवाय, भारतीय संघात जागा मिळवण्याचं स्वप्न प्रत्येकच क्रिकेटरप्रमाणे तोदेखील उराशी बाळगून आहे.

एक गुणी फलंदाज आणि यष्टीरक्षक असणारा मोहम्मद अझरुद्दीन आजही आरसीबी आणि भारतीय संघात स्थान मिळण्याची वाट पाहतोय…

 

virat kohli and mohammad azharuddin inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?