' पैसा, प्रसिद्धी अगदी क्षणात धुळीला मिळू शकते, हे या ८ जणांकडे बघून लक्षात येतं...

पैसा, प्रसिद्धी अगदी क्षणात धुळीला मिळू शकते, हे या ८ जणांकडे बघून लक्षात येतं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल. हे काही अंशी खरंच आहे ते. एखाद्या व्यक्तीला आलेले अनुभव पाहून आपण तीच कृती करण्यापूर्वी दहा वेळा विचार केला पाहिजे पण जर आपण तसे नाही केले तर? किंवा दुसर्‍या एखाद्या परिस्थितीत आपण थोडा अधिक आत्मविश्वास दाखवला तर काय होईल?

 

over confidence inmarathi
thinkingispower.com

 

त्यावेळी नक्कीच ‘अति केलं आणि हसं झालं’ ही परिस्थिती उद्भवेल, हो ना? तेच झाले काही लिजंड समजल्या जाणार्‍या सेलेब्रिटींच्या बाबतीत. त्यांनी कष्टाने कमावलेले ‘नेम आणि फेम’ दोन्ही त्यांच्या काही चुकांमुळे त्यांना गमवावे लागले. कसे ते पाहूया.

१. राज कपूर :

नावाजलेले दिग्दर्शक आणि अभिनेता तसेच हिंदी चित्रपट सृष्टीतील ‘शोमन’ म्हणून प्रसिद्ध असलेले राज कपूर, त्यांची स्वत:ची निर्मिती असलेल्या चित्रपट ‘मेरा नाम जोकर’च्या अपयशाने पूर्णत: कर्जबाजारी झाले होते.

 

mera naam joker inmarathi

 

हा चित्रपट पडद्यावर काहीच जादू दाखवू शकला नाही. त्यामुळे ते प्रचंड आर्थिक अडचणीत आले होते. पण या अनुभवातून त्यांनी काही शहाणपण घेतले होते असे वाटत नाही, कारण त्यांचे पुढील चित्रपट ‘संगम’ किंवा ‘बोंबी’ यांच्या प्रदर्शनासाठी तसेच निर्मितीच्या वेळेस त्यांना अशाच आर्थिक तंगीचा सामना करावा लागला होता.

२. अमिताभ बच्चन :

‘रिश्ते मे हम तुम्हारे ‘बाप’ लगते हैं’ असे म्हणणार्‍या बॉलीवूडच्या ‘शहनशहा ‘ अमिताभ बच्चन यांना देखील अशा आर्थिक त्सुनामीचा सामना करावा लागला होता. त्यांनी स्थापन केलेल्या ‘एबीसीएल’ या कंपनीला चित्रपट निर्मिती आणि इतर त्यासंबंधित गोष्टींमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आणि त्यामुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले होते.

याबद्दल आपल्या ब्लॉगमध्ये लिहिताना त्यांनी लिहिले होते, “२००० साली जेव्हा सारे जग नवीन वर्षाचे स्वागत करत होते तेव्हा मी माझ्या दुर्भाग्याचे स्वागत करत होतो. माझ्याजवळ न पैसा होता, ना कोणताही चित्रपट किंवा मालकीची कोणतीही कंपनी.” आपल्या या आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी त्यांनी तेव्हा मिळेल तो चित्रपट, जाहिरात तसेच टिव्ही शो करण्यास सुरुवात केली होती.

 

amitabh kbc inmarathi

 

३. गोविंदा :

हिंदी सिनेमाचा ‘राजाबाबू’ असलेल्या गोविंदा यानेदेखील अशा आर्थिक तंगीचा सामना केलेला आहे. हा चार्मिंग अॅक्टर कधीकाळी संपन्नतेपासून इतका लांब होता की रिक्षा किंवा टॅक्सीचे भाडे देण्याचे पैसेदेखील त्याच्याकडे नसायचे.

 

govinda inmarathi

 

आपल्या मुलीच्या चित्रपटाच्या प्रिमियर सोहळ्यात मुलाखत देताना हा अभिनेता भावुक झाला होता आणि आपल्या पूर्वायुष्याबद्दल बर्‍याच गोष्टी त्याने शेअर केल्या होत्या. त्यात आपल्या आर्थिक स्थितीबद्दल सुद्धा त्याने बर्‍याच गोष्टी सांगितल्या होत्या.

४. जॅकी श्रॉफ :

‘हीरो’ चित्रपटापासून आपली फिल्मी कारकीर्द सुरू केलेल्या ‘जग्गू ‘ दादाने आपल्या बालपणात गरीबीचे चटके सोसले आहेत. यशस्वी झाल्यावर देखील त्यांना आर्थिक संकट सोसावे लागले. जेव्हा त्यांनी साजिद नदीयाडवाला यांच्याकडून घेतलेले कर्ज ते फेडू शकले नाहीत, तेव्हा आपले राहते घर, मालमत्ता सारे काही त्यांना विकावे लागले होते. त्या पडत्या काळात त्यांना सलमान खान याने मदत केली होती.

 

jacky shroff featured inmarathi

 

५. शाहरुख खान :

हिंदी सिनेमाच्या अनेक दिग्गजांपैकी ‘किंग’ खान ही मोठी हस्ती. पण त्यालाही आर्थिक संकट आणि कर्जबाजारीचा सामना करावा लागला आहे. अनेक यशस्वी चित्रपटात काम केलेल्या शाहरुखने चित्रपट निर्मितीत सुद्धा पैसे गुंतवले. त्याची निर्मिती असलेला ‘रा वन’ हा चित्रपट हा खर्चिक चित्रपट होता आणि अपेक्षेइतका चालू शकला नाही.

त्यामुळे हा ‘किंग’ देखील आर्थिक संकटात सापडला होता. ‘रा वन’ ही माझी मोठी चूक होती असेही या अभिनेत्याने कबूल केले होते.

 

ra one sharukh khan inmarathi

 

६. प्रीती झिंटा :

गोड चेहर्‍याची आणि दिलखुलास हास्याची देणगी मिळालेली ही अभिनेत्री! अनेक यशस्वी चित्रपटात काम केल्यावर ‘इश्क इन पॅरिस’ नावाचा चित्रपट तिने निर्माण केला, जो पुर्णपणे अयशस्वी ठरला. तिची आर्थिक परिस्थिती बिघडायला सुरवात झाली. तिची आर्थिक स्थिती खूपच खालावली. असेही म्हटले जाते, की या आर्थिक घसरणीच्या वेळी सलमान खानने तिची मदत केली होती.

 

salman khan and preity zinta inmarathi

 

७. शिल्पा शेट्टी कुंद्रा :

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हिला देखील आर्थिक गणिते जुळवता आली नाहीत आणि कर्जबाजारी होण्याची वेळ तिच्यावर आली. तिने हे ही मान्य केले की एक वेळ अशी आली होती, की आयपीएलमधील तिच्या मालकीच्या ‘राजस्थान रॉयल्स’ संघाकडे स्वत:ची जाहिरात करण्याइतके देखील पैसे नव्हते.

 

shilpa shetty inmarathi

 

८. अभय देओल :

अभय देओल हा अभिनेता आपल्या कूल अॅक्टिंगसाठी आपल्या चाहत्या वर्गात प्रसिद्ध आहे. त्याने सुद्धा चित्रपट निर्मितीचा अनुभव घेत आर्थिक नुकसान सोसले आहे. इतकेच नाही तर त्याला त्यासाठी आपले राहते घर देखील विकावे लागले आहे. ‘वन बाय टू’ या चित्रपटाची त्याने निर्मिती केली होती हा चित्रपट पूर्णपणे अयशस्वी ठरला होता.

 

abhay deol inmarathi

 

मित्रांनो, असे अनेक प्रसंग, व्यक्ती आहेत ज्यांच्याकडून आपण आर्थिक गणिते फसण्याच्या चुका झाल्यावर काय होऊ शकते हे शिकले पाहिजे. तसेच आपल्याकडून असे काही होऊन आपल्यावर तशी वेळ येऊ नये म्हणून ही जागरूक राहिले पाहिजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?