' या तीन सदस्यांपैकी कुणाला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढाल? वाचा आणि कमेंट करा

या तीन सदस्यांपैकी कुणाला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढाल? वाचा आणि कमेंट करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

बिग बॉस प्रेमींना सध्या पर्वणीच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण एकाचवेळी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये ‘बिग बॉस’चा खेळ रंगत आहे. त्यामुळे एरव्ही रटाळ मालिकांना कंटाळलेल्या प्रेक्षकांना डबल धमाका अनुभवता येत आहे.

असं असलं तरी मराठमोळ्या ‘बिग बॉसची मजा काही औरच’ असं म्हणणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बिग बॉस मराठी सिझन ३ ची सगळीकडे चर्चा आहे. शो सुरु होऊन दोन आठवडे उलटल्याने सदस्य घरात स्थिरावले आहेत तर प्रेक्षकांनीही आपल्या आवडत्या सदस्यांचं कौतुक करत नावडत्या कलाकारांच्या नावाने सोशल मिडीयावर शिमगा करायला सुरुवात केली आहे.

 

big boss inmarathi

 

प्रत्येक सिझनमध्ये नावडत्या कलाकारांची भलीमोठी यादी तयार होते, यंदाही या यादीत काही नावांची भर पडली असून या तीन सदस्यांच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढतीय.

बघूयात घरातील कोणते सदस्य प्रेक्षकांच्या डोक्यात जातात? कोणत्या सदस्यांना पाहिल्यानंतर प्रेक्षकांचा संताप अनावर होतो? वाचा या सदस्यांबद्दल आणि तुम्हीच ठरवा, की तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही कोणत्या सदस्याला घराबाहेर काढाल?

१. गायत्री दातार

 

gayastree inmarathi

 

‘तुला पाहते रे’ म्हणत मालिका विश्वात दाखल झालेली अभिनेत्री गायत्री दातार आता बिग बॉसच्या घरात आली आहे. एकंदरित चिरका आवाज, घसाफोड करून बोलण्याची पद्धत आणि स्वतःचा मुद्दा दामटवणं या मुद्द्यांवरून तिच्यावर सातत्याने टिकेची तोफ डागली जात आहे.

पहिल्या आठवड्यात गायत्रीच्या निष्क्रियतेवरून प्रेक्षक नाराज असताना दुस-या आठवड्यात तिची आरेरावी, मैत्रिण आणि घरातील सदस्य मीरा हिच्याच मताने खेळ खेळणं, स्वतःची मतं ठामपणे न मांडणं अशा अनेक मुद्द्यांसाठी प्रेक्षकांचा संताप अनावर होत असल्याचं चित्र सोशल  मिडीयावर दिसत आहे.

 

big boss inmarathi

 

२. डॉ. उत्कर्ष शिंदे

शिंदेशाही घराण्याचा वारसा जपत घरात आलेल्या डॉ. उत्कर्ष शिंदे याच्याकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या, मात्र पहिल्या आठवड्यापासूनच दुटप्पीपणासाठी तो ओळखला जाऊ लागला.

घराचा कॅप्टन, तसेच कार्याचा संचालक अशा विविध महत्वाच्या जबाबदा-या खांद्यावर असतानाच त्याने कायम मित्रांची बाजू घेत पक्षपातीपणा केला. आपल्या संघाशी नसलेला प्रामाणिकपणा, चुकीच्या मित्रांची बाजू घेणं अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून महेश मांजेरकरांनीही त्याला खडेबोल सुनावले होते, यावरूनच प्रेक्षकांमधूनही राग व्यक्त केला जात आहे.

 

dr utakarsh inmathi

 

त्याच्यावर सोशल मिडीयात प्रचंड टिका होत असतानाच त्याचा भाऊ गायत आदर्श शिंदे हा त्याच्याबाजुने नेटक-यांशी लढताना दिसत आहे.

३. जय दुधाणे

स्पिट्सव्हिला या शोमधून आपल्या व्यक्तीमत्वाची छाप पाडणारा हॅंडसम बॉय जय घरात आल्यानंतर हा नक्कीच राडा घालणार यावर सगळ्यांचंच एकमत झालं होतं. व्यायामाने कमावलेली आपली बॉडी वारंवार दाखवण्यासाठी शर्टलेस फिरणारा, कायम मुलींशी फ्लर्ट करणारा जय सुरुवातीला प्रेक्षकांना आवडला, मात्र त्यानंतर एकंदरित त्याचा सतत वाढणारा राग, अरेरावी, घरातील वयाने मोठ्या सदस्यांशी घेतला जाणारा पंगा, इतरांना विनाकारण दोष देत ‘हम करे सो कायदा’ य़ा पद्धतीने वावरणा-या जयला प्रेक्षकांना रोषाला सामोरं जावं लागत आहे.

 

jay inmarathi

 

सोशल मिडीयावर जयविरोधात अनेक प्रक्षोभक मतं मांडली जात असल्याने त्याला होणारा विरोधही वाढता आहे.

 

jay big boss inmarathi

 

या तिन्ही कलाकारांविरोधात प्रेक्षकांचा संताप वाढत आहे. याव्यतिरिक्त मीरा जगन्नाथ, तृप्ती देसाई, अक्षय वाघमारे या सदस्यांवरही टिका होत असली तरी प्रामुख्याने उत्कर्ष, गायत्री आणि जय यांविषयी प्रेक्षकांमधील नकारात्मकता वाढत आहे.

तुम्हाला संधी मिळाली तर या तिघांपैकी कोणत्या सदस्याला घराबाहेर काढाल? कोणाचा आवाज बंद कराल? नॉमिनेशन करून कोणाला धडा शिकवाल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?