' ‘बिग बॉस’च्या भरभक्कम आणि बाणेदार आवाजामागचा खरा चेहेरा कोणाचा आहे? – InMarathi

‘बिग बॉस’च्या भरभक्कम आणि बाणेदार आवाजामागचा खरा चेहेरा कोणाचा आहे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

बिग बॉस १५ वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान अढळ ठेवणारा कार्यक्रम. या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील सदस्यांना एकच घरात जाऊन राहायचं असतं आणि आपलं अस्तित्व तिथे निर्माण करून, साम, दाम, दंड, भेद करून आपलं अस्तित्व तिथं ठिकवून ठेवायचं असतं.

बिग बॉसच्या घरात सगळं बघायला मिळतं. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, दुःख, शत्रूत्व, गटबाजी, सगळं सगळं तिथे दिसतं. जीवाला जीव देणारी माणसं सुद्धा तिथे भेटतात, तर एकमेकांचे पाय ओढून एकमेकांना मागे ओढणारे शत्रू सुद्धा.

 

bigg boss inmarathi

 

सर्वात आधी बिग बॉस हे हिंदी भाषेत, सोनी वाहिनीवर सुरु झालं, त्याची लोकप्रियता बघून नंतर प्रादेशिक भाषांमध्येसुद्धा हा शो सुरु करण्यात आला. हा कार्यक्रम आपल्या अगळ्या वेगळ्या गेम स्ट्रक्चरसाठी तर लोकप्रिय आहेच पण बिग बॉसच्या दमदार आवाजासाठी सुद्धा लोकप्रिय आहे.

कार्यक्रम सुरु असताना जो आवाज येतो कीं “बिग बॉस चाहते है”, आणि “१० जनवरी सुबह ८ बजे” हा बाणेदार आणि भरभक्कम आवाज नेमका कोणाचा आहे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. इतकच काय तर प्रेक्षक सोडून खेळाडूंनासुद्धा या आवाजामागच्या चेहऱ्याला बघण्याची एक उत्सुकता असते.

कोण आहे ती व्यक्ती, बिग बॉस या गेम शोसाठी आवाज देण्याव्यतिरिक्त काय कामं करते, तिचं आयुष्य कसं आहे असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडलेले आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी त्याचं कोड्याचं उत्तर घेऊन आलो आहोत. बिग बॉसचा तो अदृश्य आवाज कोणाचा आहे चला ते पाहूया.

बिग बॉसच्या या आयकॉनिक आवाजामागे कोणी एक नसून दोन व्यक्ती आहेत. होय, बिग बॉस चाहते है असा आदेश देणारा आवाज हा अतुल कपूर यांचा आवाज असून, “१० जनवरी सुबह ८ बजे” हा आवाज विजय विक्रम सिंह यांचा आहे. आपण दोघांबद्दल या लेखात जाणून घेणार आहोत.

 

atul kapoor vijay vikram singh inmarathi

अतुल कपूर :

अतुल कपूर एक डबिंग आर्टिस्ट असून, ते २००२ पासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचा जन्म २८ डिसेंबर १९६६ साली लखनऊ, उत्तर प्रदेश येथे झाला. त्यांनी आपलं ग्रॅज्युएशन लखनऊ विद्यापीठातून पूर्ण केलं. अतुलचं इंग्रजी आणि हिंदी भाषेवर विशेष प्रभुत्व आहे.

त्यांनी कारकिर्दीत अनेक हॉलिवूड सिनेमांना हिंदीत डब करण्यासाठी आपला आवाज दिला आहे. अनेक सिनेमांना आवाज दिलेला असूनसुद्धा आणि बिग बॉससारख्या गजलेल्या शोसाठी आवाज देऊन सुद्धा ते स्वतःला मीडिया आणि प्रसिद्धी पासून लांब ठेऊ इच्छितात. त्यांना आपलं आयुष्य अगदी खाजगी राहावं असं वाटतं.

अतुल कपूर यांनी टॉय स्टोरी ३ मधील चॅटर टेलिफोन, शरलॉक होम्स : अ गेम ऑफ शॅडोज मधील प्रोफेसर जेम्स मोरिआर्टी, दि क्रॉनिकाल्स ऑफ रिडीक मधील Alexander Toombs, दि अव्हेंजर्स, आयरन मॅन पार्टस मधील जार्विस, स्नो व्हाईट अँड दि हंट्समन मधील एरिक, इत्यादी अशा नावाजलेल्या पात्रांना आवाज दिला आहे.

 

atul kapoor inmarathi

 

गेल्या २० ते २५ वर्षांपासून या क्षेत्रात आपला आवाज देऊन त्यांनी आपली अशी ओळख निर्माण केली आहे, की जिला कोणी कधीच पुसून काढू शकत नाही.

विजय विक्रम सिंह :

विजय विक्रम सिंह हे बिग बॉसचे नरेटर आहेत. दिवस भरात ज्याही काही हालचाली होत असतात, ते सांगण्याचं कामं ते करतात. अनेक जण बिग बॉसच्या मुख्य आवाजाला म्हणजेच अतुल कपूरच्या आवाजाला विजयचाच आवाज समजून बसतात. कारण दोघांचेही आवाज जवळपास सारखेच आहेत आणि एकसारखेच भारदस्त आहेत.

विजयचा जन्म २६ नोव्हेंबर १९७७ साली कानपूर उत्तर प्रदेश येथे झाला. ते जरी मध्यमवर्गीय कुटुंबातून असले तरी त्यांनी त्यांचं आयुष्य मात्र बदललं होतं. ते शिक्षण पूर्ण करून एका MNC मध्ये Business Development Manager म्हणून कार्यरत होते. त्यांच्या एका सहकर्मचाऱ्याने त्यांच्या आवाजाची खूप प्रशंसा केली.

 

vijay vikram singh inmarathi

 

तेव्हापासून आपण गाणं तर गाऊ शकत नाही पण आपल्या या भारदस्त आवाजाचा योग्य उपयोग कसा करून घेऊ शकतो याचा ते सतत विचार करू लागले. २००५ साली त्यांच्या कंपनीतर्फे बदली होऊन ते मुंबईला आले आणि तिथे त्यांच्या अनेक मित्रांनी त्यांना आवाजाचा योग्य उपयोग करण्याचे तसेच या क्षेत्रातही आपण एक यशस्वी करियर कसं बनवू शकतो याचे अनेक मार्ग सुचवले.

एकदा त्यांना त्यांच्या एका मित्राने ९२.७ Big FM मध्ये Business Development Manager म्हणून काम करण्याची संधी दिली. या बरोबरच आपल्याला कला क्षेत्रातीलसुद्धा बरीच माहिती तिथून मिळू शकेल हेही सांगितले.

आपली पत्नी गीतांजली सिंह हिच्याशी विचार विनिमय करून विजयने ही संधी स्वीकारण्याचे ठरवले आणि तिथून त्यांचं आयुष्यच पालटलं. विजयने आपल्या कॅरियरची सुरुवात २००९ साली Dance India Dance या रिऍलिटी शो मध्ये व्हॉइस आर्टिस्ट म्हणून केली. तेव्हा पासून ते आजही या शोसोबत जोडलेले आहेत.

याशिवाय ९४.३ My FM वर त्यांनी चांदनी रातें नावाचा एक कार्यक्रम RJ म्हणून होस्ट केला होता.

 

94.3 my FM inmarathi

 

आपलं अभिनयकौशल्य तपासून बघण्यासाठी त्यांनी Alexander vs Chanakya या नाटकात चाणक्यांची भूमिका साकारली होती. हे दोन्हीही कलाकार पडद्यावर तर आहेतच आपण खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या फार जवळ आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?