' फाजील आत्मविश्वास नडला: १८०० जणांमध्ये NCB ने आर्यनलाच पकडलं कारण… – InMarathi

फाजील आत्मविश्वास नडला: १८०० जणांमध्ये NCB ने आर्यनलाच पकडलं कारण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

दोन व्यक्तींचं भांडण झाल्यावर ”मी कोण आहे ठाऊक आहे का?” किंवा ”मी कुणाच्या बापाला घाबरत नाही” अशा धमक्या तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील. काहीजण जन्मजात ‘हम करे सो कायदा’ किंवा ‘माझं कुणी काहीही वाकडं करू शकत नाही’ अशा आविर्भावात वावरतात, मग ती सेलिब्रिटी किड्स असली तर विचारायलाच नको.

आई, वडील हे कलाकार, खेळाडू, उद्योगपती असतील तर मग मुलं तोऱ्यात मिरवतातच मात्र कोणतंही दुष्कृत्य करायला पुढे-मागे पहात नाहीत, कारण काहीही झालं तरी पैसा, प्रसिद्धी यांच्या बळावर आपण सहीसलामत सुटणार किंबहुना पोलिस आपल्यापर्यंत पोहचू शकणार नाहीत असा अतिरेकी आत्मविश्वास त्यांना पालकांकडून दिला जातो.

 

star kids inmarathi

 

नेमकं हेच घडलं शाहरुखचा मुलगा आर्यन खान याच्याबाबत! क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीची नेमकी टीप एनसीबीला मिळणं आणि तब्बल १८०० जणांच्या उपस्थिततही बड्या बापाची मुलं असलेल्या ८ जणांनाच बेड्या पडणं कसं शक्य झालं? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

झालं असं, की क्रूझवर इतरही अनेकजण उपस्थित होते, मात्र मुंबईकडून गोव्याला निघालेल्या या क्रूझवर एका रेव्ह पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक आमली पदार्थांची विक्री आणि सेवन केलं जाणार आहे अश टीप एनसीबीच्या अधिका-यांना आधीच मिळाली होती,

 

arayan khan inmarathi

 

त्यानुसार नियोजन करून पार्टी सुरु होण्यापुर्वीच एनसीबीचे अधिकारी पार्टीच्या वेषात क्रुझवर वावरत होते, क्रूझवरील इतर लोकांमुळे या अधिका-यांचा संशय कुणालाही आला नाही आणि सगळेच बेसावध राहिले.

“माझ्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्स सुद्धा घ्यावेत”, वाचा शाहरुख अजून काय म्हणाला होता

NCB चे काम काय असते? रेड टाकण्याची नेमकी पद्धत काय आहे? जाणून घ्या

आर्यनला कसं पकडलं

पार्टीसाठी आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांना व्हीआयपी गेस्ट म्हणून आमंत्रण देण्यात आलं होते, मर्चंट हे देखिल दिल्लीतील प्रसिद्ध नाव असल्याने हे दोघेजण आपली प्रसिद्धी, पैसा यांचा बडेजाव दाखवत पार्टीत हजर झाले. 

आपण या पार्टीतील व्हीआयपी पाहूणे आणि त्यातही वडील शाहरुख खान पाठीशी यांमुळे आपल्याला कोणीही पकडू शकणार नाही मुळात सर्वसामान्य नागरिकांची जशी चौकशी केली जाते, तशी माझी चौकशी होणारच नाही या फाजील आत्मविश्वासासह आर्यन क्रूझवर वावरत होता. मात्र नियमाप्रमाणे त्यालाही सिक्युरिटी चेकसाठी बोलवण्यात आलं आणि नेमका तिथेच तो गडबडला.

 

arayan inmarathi

 

एरव्ही अशा तपासणीची सवयच नसल्याने चौकशीदरम्यान तो घाबरला, आणि त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसणारी भीती, बदलणारे हावभाव यांमुळे एनसीबीच्या अधिकाऱ्यांना त्याचा दाट संशय आला. यावेळी त्याच्यासह उर्वरित सदस्यांची चौकशी करताच ही रेव्ह पार्टी असल्याचं सिद्ध झालं आणि त्यानंतर गोव्याला निघालेली ही वरात थेट एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?