' बाप तसा पोरगा : खुद्द शाहरुखलासुद्धा एकदा पोलिस स्टेशनची हवा खावी लागली होती! – InMarathi

बाप तसा पोरगा : खुद्द शाहरुखलासुद्धा एकदा पोलिस स्टेशनची हवा खावी लागली होती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कालपासून सोशल मीडिया एकाच बातमीने तुडुंब भरून वाहतोय तो म्हणजे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची नारकोटिक्स डिपार्टमेंटद्वारे अटक.

२ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या एका क्रुजवर अरेंज केलेल्या रेव्ह पार्टीवर NCB च्या लोकांनी छापा टाकला आणि एक मोठी रेड टाकून गर्दुल्ल्या लोकांचा खेळ उद्ध्वस्त केला.

याच पार्टीत बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला या पार्टीत बघून NCB ने त्याला तातडीने चौकशीला घेतलं आणि टेस्ट करून त्याला अटकसुद्धा झाली, नंतर मीडियानेसुद्धा हैदोस घालायला सुरुवात केली.

शाहरुखच्या संस्कारांपासून ते थेट त्याच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभी राहायला सुरुवात झाली, गेल्या काही दिवसांपासूनच त्याच्याविरुद्ध बोलणाऱ्या लोकांच्या हातात सुद्धा आयतं कोलीत मिळालं, सिम्मी गरेवालच्या शोमध्ये त्याने केलेलं स्टेटमेंटसुद्धा पुन्हा व्हायरल होऊ लागलं!

 

aryan khan arrest inmarathi

आज आर्यन खानला एक दिवस NCB च्या कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं, पण याच आर्यनच्या वडिलांना म्हणजे खुद्द शाहरुखला एकदा काही काळ पोलिस स्टेशनची हवा खायला लागली होती, काय आहे तो किस्सा नेमका जाणून घेऊया!

९० च्या काळातली ही घटना आहे, त्यावेळेस शाहरुख केतन मेहताच्या ‘माया मेमसाब’ या चित्रपटाचं शुटींग करत होता, मुख्य भूमिकेत केतन मेहता यांची पत्नी दीपा साही, फरूक शेख आणि शाहरुख हे होते.

सिनेमा तसा फारसा चालला नाहीच, पण यातला शाहरुख आणि दीपा यांच्यातला एक प्रचंड इंटीमेट सीनची खूपच चर्चा झाली होती. त्या वेळेस बॉलिवूड गॉसिप कव्हर करणाऱ्या एका प्रसिद्ध मॅगजिनमधून एक खळबळजनक बातमी पसरली होती.

त्या मॅगजिनमध्ये आलेली बातमी अशी होती की माया मेमसाबमधल्या त्या इंटीमेट सीनचं शुटींग करण्यासाठी दिग्दर्शक केतन मेहता यांनी शाहरुख आणि दीपाला एका हॉटेल रूममध्ये एक रात्र घालवण्याचं सुचवलं होतं, ज्याणेकरून त्यांच्यात चांगलं बॉंडिंग तयार होईल.

 

shahrukh deepa sahi inmarathi

 

तो जमाना सोशल मीडियाचा नव्हता, ते स्मार्टफोन्स नव्हते त्यामुळे वर्तमानपत्रात किंवा मॅगजिनमध्ये येणाऱ्या या न्यूजवर लोकांचा विश्वास सहज बसायचा.

अर्थात या बातमीबद्दल इंडस्ट्रीतल्या कोणीच स्पष्टीकरण दिलं नाही, पण ही बातमी जेव्हा आली तेव्हा शाहरुखच्या नाकाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या. शाहरुखचा उद्दामपणा आपल्याला काही नवीन नाही, एअरपोर्टवर ऑफिसरशी घातलेली हुज्जत असो किंवा वानखेडे स्टेडियममधला राडा, ९० च्या काळात तर शाहरुख हे गारुड प्रेक्षकांच्या मनावर असल्याने तो आणखीनच उद्दाम आणि उर्मट वागायचा.

ही बातमी वाचल्यावर शाहरुखचा पारा चढला आणि त्याने थेट त्या मॅगजिनच्या एडिटरला फोन लावून याबाबत चौकशी केली, त्यावर त्या एडिटरने शाहरुखला एवढंच सांगितलं की “हा लेख म्हणजे एक गंमत आहे, याकडे मस्करी म्हणूनच बघ!”

हे ऐकून शाहरुख आणखीनच संतापला आणि त्याने थेट त्या मॅगजिनचे ऑफिस गाठून त्या एडिटरला शिवीगाळ केली आणि त्याला मारण्याची धमकीसुद्धा दिली.

 

shahrukh in wankhede inmarathi

 

प्रकरण तेवढ्यावेळापुरतं थंड झालं, शाहरुख जसा फिल्मसेटवर पोचला आणि शुटींग सुरू झालं त्यानंतर काहीच क्षणात तिथे पोलिस आले आणि त्यांनी शाहरुखला आपल्यासोबत येण्यास सांगितले.

सुरुवातीला शाहरुखला याबद्दल काहीच कल्पना नव्हती, पण नंतर त्याला असं कळलं की मॅगजिनच्या एडिटरला आपण शिवीगाळ केल्याने पोलिस आपल्याला अटक करायला आले आहेत.

शाहरुखने पोलिसांना सहाय्य केले आणि त्याने एक संपूर्ण रात्र पोलिस स्टेशनमध्ये काढली, त्यानंतर त्याला बेल मिळाली पण आपल्या रागावर आपला कंट्रोल नसल्याने आपल्याला हे सहन करावं लागलं याची जाणीव शाहरुखला झाली आणि पोलिस स्टेशनमधून घरी जाताना त्याने त्या एडिटरची सुद्धा भेट घेऊन माफी मागितली.

शाहरुखसारख्या स्ट्रगल करणाऱ्या तरुणाला तेव्हा एका शिवीगाळ आणि धमकीच्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांनी सोडलं नाही, तर आर्यन खानवर बेकायदेशीर ड्रग्स घेतल्याचा गुन्हा सिद्ध झालाय.

जे बापाने केलं, त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे मुलाने टाकून बापाने कामावलेल्या सगळ्यावर बोळा फिरवला. आर्यनच्या अटकेनंतर सगळं बॉलिवूड पुन्हा एकत्र झालंय, भाईजान सलमान खानने शाहरुखची भेट घेतली, अभिनेता सुनील शेट्टीनेसुद्धा मीडियाला स्टेटमेंट दिलं.

 

aryan khan 2 inmarathi

 

सुशांतच्या मृत्यूनंतर उघड झालेलं बॉलिवूडचं ड्रग रॅकेट नेमकं कोणाकोणाला आपल्या जाळ्यात अडकवणार आहे हे तर येणारी वेळच ठरवेल, पण बॉलिवूडमधल्या या ड्रग्सच्या सेवनावर, विक्रीवर काहीतरी कडक कारवाई व्हायलाच हवी.

आज करोडो लोक या सेलिब्रिटीजना फॉलो करतात, हे सेलिब्रिटीज त्या प्रेमाची परतफेड जर अशी करत असतील तर यांना वेळीच जमिनीवर आणणं हे प्रेक्षकांचं काम आहे.

या सगळ्या प्रकरणावर कायदेशीर कारवाई होईल, तपाससुद्धा होईल, पण आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटणाऱ्या बॉलिवूडला कायद्याची चपराक बसायलाच हवी!

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?