' फेसबूक गंडलं, तुम्ही बोंबाबोंब केली, पण झुकरबर्गला केवढा मोठा फटका बसलाय?

फेसबूक गंडलं, तुम्ही बोंबाबोंब केली, पण झुकरबर्गला केवढा मोठा फटका बसलाय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

दोन दिवसांपासून रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडलेल्या आर्यन खानबाबत गरमागरम चर्चा रंगणाऱ्या सोशल मिडीयालाही बडबड करून दम लागला आणि थोडा ब्रेक घेऊ म्हणत फेसबूक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सला ब्रेक लागला, विनोदाचा भाग सोडा, पण एकदंरित सगळीच गडबड सुरु झाली.

रात्री साडेआठच्या सुमारास प्रत्येक घराघरातील काही फोन्स रिबूट करण्यात आले तर काहींनी वायफाय राऊटर बंद करत इंटरेनट सेवा पुरवणा-यांच्या नावाने बोटं मोडली, तर काहींनी फ्लाईट मोड ऑन करत आपल्या इंटरनेटला जागं करण्याचा प्रयत्न केला.

 

restart inmarathi

 

अखेर गुगल न्यूज किंवा टिव्हीवरील ब्रेकिंग न्युजमुळे हा प्रॉब्लेम केवळ आपला नसून जगातील नेटक-यांचा आहे हे लक्षात आल्यानंतर अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

यापुर्वीही फेसबूक, व्हॉट्सअपला ब्रेक लागला होता, मात्र तेंव्हा हा प्रॉब्लेम काही मिनीटात सुटल्याने यावेळीही लवकरच चॅट सुरु करता येईल किंवा इन्स्टाग्रामचे रील्स बघता येतील या वेड्या आशेपायी अनेक घराघरात त्या दरम्यान जेवणं उरकूनही घेतली गेली आणि हातावर पाणी पडताच पुन्हा फोनकडे आशाळभुत नजरेनं पाहिलं जाऊ लागलं.

 

social media inmarathi

 

घड्याळ्याचे काटे सरकत होते, मात्र इंटरनेट सुरु होत नसल्याने अखेर समस्त भारतीयांच्या काळाजातील धडधड वाढू लागली. अनेकांना घाम फुटला तर काहींना बेचैन वाटू लागलं. तासभर झाल्यानंतरही परिस्थिती पुर्ववत होत नसल्याने भारतातील घराघरात संताप व्यक्त केला जाऊ लागला.

 

tension inmarathi

 

मात्र तुमची ही अवस्था असली तरी अमेरिकेत फेसबूकच्या ऑफिसमध्ये बसलेल्या मार्क झुकरबर्गची काय अवस्था झाली असेल याची तुम्हाला कल्पनाही नसेल.

खोटं वाटतंय? मग या काही तासात झुकरबर्गचं नेमकं किती नुकसान झालं? याचे आकडे पाहिले तर तुम्हाला याची खात्री पटेल.

 

mark inmarathi

 

तर, केवळ आपल्या लाडक्या व्यक्तींचे चॅट्स दिसत नाहीयेत किंवा फेसबूकवर एखादी पोस्ट करता येत नाही म्हणून होणारी चीडचीड मान्य आहे, मात्र ज्याचं करोडोंचं नुकसान झालं त्यानी काय करावं?

तर झालं असं की, सोमवारी रात्री जगभरातील बहुतांश सर्व युजर्झसाठी फेसबूक, व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम या सगळ्या साईट्सचा सर्व्हर डाऊन झाला.

६ तासांच्या या खेळखंडोबामुळे मार्क झकरबर्गला तब्बल ७ बिलीयन म्हणजे ५५ हजार २१७ कोटी रुपयांचं नुकसान झालं.

शेअरमार्केटही गडगडलं

फेसबूक ठप्प होताच अमेरिकेतील शेअरबाजारात उलथापालथ झाली. अनेकांनी याला सायबर अॅटॅकचं नाव दिल्याने फेसबुकच्या शेअर्समध्ये लक्षणीय घट झाली. फेसबुकच्या शेअरमध्ये तब्बल ५ टक्क्यांनी घट झाल्याने झकर्बगला चांगलाच फटका बसला.

 

mark 1 inmarathi

 

मार्कचं वैयक्तिक नुकसान

याचा थेट परिणाम केवळ फेसबुक कंपनीच नव्हे तर मार्क झुकरबर्गला प्रत्यक्षातही भोगावे लागले.

 

mark money inmarathi

 

बिलेनिअर इंडेक्सने जाहीर केल्यानुसार मार्कच्या वैयक्तिक संपत्तीही घट होऊन आता ती संपत्ती १२०.९ अरब डॉलर इतकी नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत तो आता चौथ्या स्थानापासून पाचव्या स्थानावर येऊन ठेपला आहे.

इतर अॅप्सची चलती

व्हॉट्सअप, फेसबूक प्रेमींनी काल इतर अॅप्सशिवाय पर्याय नव्हता. मनोरंजनासाठी काहींनी युट्यूबची मदत घेतली, तर काहींनी टेलिग्रॅम, शेअरचॅट अशा अॅप्सवर टाइमपास करू लागले. यादरम्यान ट्विटवरही दंगा सुरु झाला.

 

telegram inmarathi

 

something is better than nothing म्हणत दुस-या अॅप्सचा पर्याय स्विकारणा-या युझर्सना इत अॅप्स आवडली, आणि यानंतरही त्यांनी त्या अॅप्सचा वापर सुरु केला तर भविष्यात व्हॉट्सअप, फेसबुकच्या युझर्समध्ये घट होण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे.

एकंदरित तंत्रज्ञानावर विसंबून राहताना असे घोळ होऊ शकतात याचाही विचार होणं गरजेचं आहे. यामुळे काही युझर्सची चीडचीड झाली तर काहींनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत कुटुंबासह वेळ घालवला, मात्र या सर्वांमुळे फेसबुक आणि मार्क झकरबर्गच्या झालेल्या नुकसानाची तुलना करणं कठीण आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?