' दारुबंदीच्या दिवशी रेव्ह पार्टी; NCBच्या रडारवर आर्यन खानपासून बॉलीवूडचे अनेक चेहरे – InMarathi

दारुबंदीच्या दिवशी रेव्ह पार्टी; NCBच्या रडारवर आर्यन खानपासून बॉलीवूडचे अनेक चेहरे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कालचा दिवस अगदी सगळ्यांच्या लक्षात राहणार दिवस असतो, तो म्हणजे २ ऑक्टोबर, आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस. सरकारी कर्मचाऱ्यांना हक्काची सुटी तर तळीरामांसाठी हा दिवस म्हणजे अगदी नकोसा, आज जरी कोरोनामुळे आपल्या सण समारंभ, थोर पुरुषांच्या जयंत्या यांवर जरी निर्बंध आले असले तरीसुद्धा देशात साध्या पद्धतीने सण समारंभ साजरे होताना दिसून येत आहेत.

 

gandhi 11 inmarathi

कालचा दिवस गांधी जयंती पेक्षा वेगवेगळ्या घटनांमुळे जास्त चर्चेत राहिला. सोशल मीडियावर फिरणाऱ्या गांधींच्या विचारांना अनेकांनी विरोध केला त्यावर उलटसुलट चर्चा रंगल्या. एकीकडे एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने गांधींच्या पुतळ्यावरून टाहो फोडला तर दुसरीकडे महेश मांजरेकर यांनी गोडसे या नवीन चित्रपटाची घोषणा केली. यावरून देखील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

गांधी जयंती सप्ताहात खरं तर दारूबंदी असते मात्र बॉलीवूडकरांनी दारुपेक्षा ही जास्त हानिकारक अशा ड्रग्सची पार्टी चक्क एका क्रूझवर केली. मात्र आधीच एनसीबीच्या रडारावर असलेल्या बॉलीवूडकरांना याचा विसर पडला असला कारण याच पार्टीवर एनसीबीने कारवाई करून अनेक हस्तींना पकडले आहे.

नेमकं काय घडलं?

एका क्रूझवर बॉलीवूडची पार्टी होणार आहे अशी टीप एनसीबीच्या अधिकाऱ्यांना ३,४ दिवस आधीच लागली होती. या पार्टीत अनेक बॉलीवूडची मंडळी असणार आहेत अशी प्राथमिक माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. हुशार बॉलीवूडकरांनी यावेळी पार्टी चक्क एक क्रूझवर ठेवली होती. मुंबईपासून थोड्या अंतर गेल्यावर पार्टी सुरु होऊन ड्रग्स घेण्यास सुरवात केली.

 

cruise inmarathi

 

 

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी लगेचच आपली शोधमोहीम सुरु केली आणि ड्रग्स विकणाऱ्याला आणि घेणाऱ्याला अटक करायला सुरवात केली. हळूहळू या मंडळींची नावं यायला लागली. त्यात बॉलीवूडचा किंग असलेल्या शाहरुख खानच्या मुलाचे नाव समोर आले, त्याची आठ तास चौकशी केली गेली असं सूत्रांच म्हणणं आहे. याआधी देखील अशाच बॉलीवूडच्या लोकांची चौकशी केली गेली आहे, कोण आहेत ते कलाकार चला तर मग जाणून घेऊयात…

भारती सिंग :

विनोदी कार्यक्रमातून सगळ्यांचे पोट दुखेपर्यंत हसवणारी कॉमेडी क्वीन,भारती हि देखील मागच्या नोव्हेंबरमध्ये एक ड्रग्स प्रकरणात अडकली होती. भारती आणि तिच्या पतीच्या घरातून, ऑफिसमधून गांजा आणि ड्रग्स एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सापडले होते.

 

bharti inmarathi

 

अरमान कोहली :

लोकांच्या विस्मरणात गेलेला हा कलाकार पुन्हा एकदा लक्षात आला तो ड्रग्स प्रकरणामुळे, त्याच्या राहत्या घरात ड्रग्स सापडल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती तसेच त्याचा बेल देखील मुंबई कोर्टाने नाकारला होता.

 

arman kohli inmarathi

 

अर्जुन रामपाल :

काही दिवसांपूर्वी अर्जुन रामपालची व्यावसायिक पार्टनर गॅबेरीएला डोमेट्रियस हिच्या भावाला चरस बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती तसेच गोव्यातील एक पार्टीत ड्रग्स पुरवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.

 

arjun inmarathi

 

 हिना पांचाळ :

बॉलीवूडच्या पार्ट्यांमध्ये आता मराठमोळे चेहरे सुद्धा दिसायला लागले आहेत. बिग बॉस आणि आयटम नंबरमुळे चर्चेत आलेली मराठी अभिनेत्री हिना पांचाळ. इगतपुरीमध्ये घडलेल्या रेव्ह पार्टीत ती सहभागी झाली होती. म्हणून तिला अटक देखील करण्यात आले होते.

 

heena inmarathi

 

रिहा चक्रवर्ती :

सुशांत सिंग प्रकरणामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे रिहा, सुशांत सिंगला ड्रग्स देण्याचे काम ती करत होती, तसेच सुशांतच्या मृत्यूमागे तिचा हात आहे असेही तिच्यावर आरोप करण्यात आले होते. एनसीबीने तिची सखोल चौकशी केली होती.

 

sushant-rhea-italy inmarathi
indiatoday.in

याचबरोबरीने दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर या स्टार्सची देखील एनसीबीकडून चौकशी करण्यात आली आहे. बॉलीवूडची दुनिया म्हणजे एक मायाजालच आहे, आणि इथे काम पाहिजे असेल तर अशाच पार्ट्यांमध्ये जावे लागते, असे बोलले जाते आणि मग नकळतच कलाकार कलेच्या मागे न लागत नशेच्या आहारी जातात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?