'एका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये शिफ्ट होण्यापूर्वी जरा रीअॅलिटी जाणून घ्या!

एका शहरामधून दुसऱ्या शहरामध्ये शिफ्ट होण्यापूर्वी जरा रीअॅलिटी जाणून घ्या!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

गावातून लोक शहरांकडे येतात, थोडेसे पैसे आणि खूप मोठी स्वप्न घेऊन. शहरांच्या चकमकीत त्यांना आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरलेली दिसतात, पण शहरात कमावलेल्या पैशांचा खूप मोठा हिस्सा हा खाणे खाण्यात आणि राहायच्या जागेचे भाडे देण्यातच जातो. शहर दुरून जेवढे रंगीत व सुंदर दिसते, त्यापेक्षा वास्तविक पाहता कित्येक पट जास्त खर्चिक असते.

citiy-marathipizza01
business.rediff.com

आज आम्ही तुम्हाला अश्या शहरांविषयी सांगत आहोत ज्या शहरांमध्ये राहायलाच नव्हे तर खाण्यासाठी देखील मोठी किंमत मोजावी लागते.

दिल्ली,मुंबईच्या व्यतिरिक्त अजूनही देशात इतर अनेक शहरे अशी आहेत, जिथे एका रूमचे भाडे १२ हजारापेक्षाही जास्त आहे देशाची राजधानी दिल्ली मध्ये साध्या परिसरात एका रूमचे भाडे १२ ते १६ हजारापर्यंत आहे, तिथेच देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई मध्ये त्याच रूमचे भाडे ३६ हजार पर्यंत आहे.

citiy-marathipizza02
चला राहाण्याच तर सोडून द्या, आता जरा बोलू खाण्याविषयी! खाण्यासाठीही हि शहरे कोणत्याही अँगलने स्वस्त नाहीत. दिल्लीमध्ये एका वेळेच्या जेवणासाठी १५० ते २०० रुपये मोजावे लागतात,तिथेच गुरूग्राम दिल्लीपेक्षाही महाग होत चालला आहे, इथे एका वेळच्या जेवणासाठी ३५० ते ४०० रुपये मोजावे लागतात.

citiy-marathipizza03
जर फिरण्याचे बोलाल किवा ऑनलाईन टॅक्सी सेवेबद्दल म्हणाल तर दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि बंगलोर या शहरांना हरवणे कोणाच्याही हातात नाही. दिल्ली मध्ये जिथे १२ रुपये पासून टॅक्सीची सुरवात आहे,तिथेच मुंबईत त्याचा दर २०, तर बंगलोरमधेही दिल्लीप्रमाणे १२ रुपये दर आहे.

citiy-marathipizza04

त्यामुळे कोणत्याही एक शहरातून दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हायचा विचार करत असाल तर नीट विचार करून निर्णय घ्या, अन्यथा बजेट विस्कळीत होणे अटळ आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?