' लसींचं सर्टिफिकेट घेतलंत ना? मग आता पाप मुक्तीचं सर्टिफिकेट या मंदिरातून घ्या! – InMarathi

लसींचं सर्टिफिकेट घेतलंत ना? मग आता पाप मुक्तीचं सर्टिफिकेट या मंदिरातून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आजकाल कुठेही जायचं म्हंटल तरी बाकी वस्तूपेक्षा कोरोनाची लस घेतलेलं सर्टिफिकेट हे घ्यावाच लागतं. सरकारने कोरोनाचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक केले आहे. त्यामुळे आजकाल लोकांमध्ये फक्त आणि फक्त लसीच्या सर्टिफिकेट बाबत चर्चा सुरु असते.

जसं लसींच सर्टिफिकेट आपण कोव्हीन अँपवर जाऊन डाउनलोड करतो तसेच आपण आयुष्यात केलेल्या पापांच सर्टिफिकेटदेखील मिळवू शकतो. आश्चर्य वाटले ना? हो पण प्रत्यक्षात असं एक मंदिर आहे जिथे हे सर्टिफिकेट मिळते चला तर मग जाणून घेऊयात या मंदिराबद्दल…

 

vaccine certificate inmarathi

 

हिंदू धर्मात पापमुक्तीचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. मात्र या कोणत्याही उपायात पापमुक्त झाल्याचं प्रमाणपत्र मिळण्याची सोय नाही. आजचा जमाना हा प्रमाणपत्राशिवाय कशावरही विश्र्वास न ठेवण्याचा असल्यानं आता तुम्हालाही तुम्ही पापमुक्त झालात याचं चक्क प्रमाणपत्र मिळण्याची सोय ती देखिल अत्यप दरात उपलब्ध आहे –

जगात असं कोणिही सापडणार नाही ज्यानं काही पाप केलं नसेल. गंगेत डुनकि मारली की पापं धुतली जातात अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. म्हणूनच आयुष्यात किमान एकदा तरी हिंदू धर्मीय गंगा अंघोळ करण्याचं स्वप्न बघत असतात. अनेक पिढ्यांची पापं धुवून धुवून गंगा प्रदुषित झाली हा भाग वेगळा. तुम्हाला पापमुक्तीचा हा एकमेव मार्ग माहित असेल तर हा लेख तुम्ही वाचायलाच हवा.

 

ganga river 1 InMarathi

 

राजस्थानमधील बांसवाडा पासून ८५ किमी अंतरावर असणार्‍या प्रतापगड जिल्ह्यातील अरनोड गावात असणारं गौतमेश्र्वराचं मंदिर म्हणजेच महादेवाचं मंदिर आदिवासी लोकांचं हरिद्वार मानलं जातं. याठिकाणी असणार्‍या भगवान शंकरांच्या मस्तकावर झर्‍याचं पाणी वहातं.

देशभरातून अनेक भक्त या मंदिराला मोठ्या भक्तीभावानं भेट देत असतात. या गौतमेश्र्वर महादेवाच्या मंदिराजवळ एक कुंड आहे, ज्याला मंदाकिनी कुंड म्हणून संबोधलं जातं. या कुंडातील पाणी अत्यंत पवित्र समजलं जातं. या कुंडात डुबकी मारली की पापमुक्ती होते असा भक्तांमध्ये विश्र्वास आहे.

 

gautam inmarathi

 

या कुंडातील पाणी गंगाजलासमान पवित्र मानून ते कलश भरभरून सोबत घेऊन जातात. या मंदिराची गुहा इतकीच खासियत नसून इथे भक्तांना चक्क पापमुक्तीचं प्रमाणपत्रही दिलं जातं. अर्थात हे प्रमाणपत्र हवं असल्यास नाममात्र शुल्क चुकतं करावं लागतं. अकरा रूपये भरले की हे प्रमाणपत्र तुमचं आणि तुम्ही पापमुक्त असल्याचा लेखी पुरावाही. या अकरा रुपयात एक रुपया सर्टिफ़िकेटचा आणि दहा रुपये दोषनिवारणाचे आकारले जातात. देशात हे एमकेव असं मंदिर आहे, जिथे पापमुक्तीचं प्रमाणपत्र मिळतं.

 

gautam 1 inmarathi

 

काय आहे या मंदिरामागची कथा?-

असं म्हणतात की सप्तऋषींमधील गौतम ऋषींवर गोहत्येचा कलंक होता. गो हत्या धर्मात भयंकर मानली जाते. या पापातून मुक्ती मिळविण्यासाठी गौतम ऋषींनी या मंदिरातील मंदाकिनी कुंडात स्नान केलं होतं आणि त्यानंतर त्यांना या पापातून मुक्ती मिळाली होती. गौतम ऋषींना जशी पापमुक्ती मिळाली तशी सर्व भक्तांनाही मिळते असा विश्र्वास आहे.

 

gautam 3 inmarathi

 

असं म्हणलं जातं की, आजतागायत या कुंडातील पाणी कधीच आटलं नाही. वर्षभर बाराही महिने याठिकाणी सुंदर अशी हिरवळ पसरलेली असल्यानं इथे निसर्गसौंदर्य भरपूर आहे त्यामुळेच पर्यटकांचंही हे आवडतं ठिकाण आहे

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?