' पाकिस्तानात चक्क एक 'हिंदू' महिला बनली आहे नागरी प्रशासक अधिकारी!

पाकिस्तानात चक्क एक ‘हिंदू’ महिला बनली आहे नागरी प्रशासक अधिकारी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

नुकताच यूपीएससी परीक्षांचा निकाल लागला यात महाराष्ट्रातील अनेक मुलांनी उत्तम मार्क्स पाडत राज्याचे नाव मोठे केले आहे. आज स्पर्धा परीक्षांना देशभरातून लाखो विद्यार्थी बसत असतात त्यातले केवळ काहीच विद्यार्थ्यांना यश मिळते तर काही विद्यार्थी आणखीन जोमाने पुढच्या वर्षी प्रयत्न करत असतात.

ज्यांना स्पर्धा परीक्षांच्या, क्लासेसच्या फिया परवडत नाहीत असे तरुण देखील अहोरात्र मेहनत घेऊन परीक्षेत उत्तमरित्या पास होत असतात. पुणे हे विद्येचे माहेरघर म्हटले जाते याच पुण्यात संपूर्ण महाराष्ट्रातून मुलमुली स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी येत असतात.

 

upsc inmarathi

 

आजकाल दहावी बोर्ड असो किंवा स्पर्धा परीक्षा जिकडे तिकडे मुलींचा नंबर दिसून येतो आहे. मुलींची ही प्रगती केवळ आपल्या देशातून नसून आपल्या सख्ख्या शेजारी असलेल्या पाकिस्तानात देखील होत आहे.

पाकिस्तान हा देश खरंतर आपल्यातलाच एक भाग होता, मात्र फाळणीनंतर तो एक वेगळा देश म्हणून ओळखला जाऊ लागला. पाकिस्तान हा देश स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देखील फारशी कामगिरी करू शकला नाही. आजही तिकडे रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत आहे त्यातच कोरोनामुळे वाढती बेकारी त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

pakistan flag inmarathi

 

एकीकडे पाकिस्तानात वाढणारी बेरोजगारी, दहशवादाचा विळखा, गगनाला भिडलेले भाव यासगळ्यात एक सुखाची बाब म्हणजे पाकिस्तानातील एका हिंदू महिलेने तिकडची सर्वोच्च मानली जाणारी CSS ( central superior services) ही परीक्षा देऊन उत्तमरित्या पास झाली आहे.

डॉ. सना रामचंद असे त्या मुलीचे नाव असून ती पेशाने डॉक्टर आहे. ज्या देशात मुलींच्या शिक्षणासाठी त्यांना झगडावे लागते त्या देशात या मुलीने आपल्या कर्तृत्वावर डॉक्टर बनली. पण तीच करियर इथवर थांबले नाही. पुढील शिक्षणाच्या  ओढीने तिने पाकिस्तानमधील प्रतिष्ठित मानली जाणारी परीक्षा पास करून दाखवली.

 

sana inmarathi

 

सना मूळची सिंध प्रांतातील शिखरपुर जिल्ह्यातील एका खेडेगावातील रहिवासी. आई वडिलांच्या खातर तिने मेडिकल फिल्ड निवडले आणि ती  डॉक्टरदेखील झाली. घरून ऍडमिन्सट्रेशन जॉबसाठी पाठिंबा नव्हता मात्र सनाने आपल्या जिद्दीवर कठीण परीक्षा पास करून दाखवली.

 

२ % पेक्षा कमी विद्यार्थी होतात पास 

 

css inmarathi

 

आपल्या देशात जसे CA परीक्षांचे निकाल लागतात ज्यात केवळ २% विद्यार्थी पास होतात तशीच पाकिस्तानातील या परीक्षेत हजारो विद्यार्थी बसतात मात्र केवळ २% विद्यार्थी यात पास होतात. आधी डॉक्टरकीची कठीण परीक्षा त्यानंतर css सारखी अतिकठीण परीक्षा पास करणे त्यातही ती एका महिलेने ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची आणि कौतुकास्पद गोष्ट आहे.

आज आपल्या देशात देखील अनेक स्त्रिया उत्तमरित्या घर आणि ऑफिस यातला समतोल सांभाळत आहेत. घरच्यांची काळजी घेऊन ऑफिसमध्ये उत्तम कामगिरी बजवताना दिसून येत आहेत.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?