' तुमचं मॉइश्चरायझर, फेसक्रीम खराब झालंय का, हे ओळखण्याच्या सोप्या ट्रिक्स! – InMarathi

तुमचं मॉइश्चरायझर, फेसक्रीम खराब झालंय का, हे ओळखण्याच्या सोप्या ट्रिक्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मॉइश्चरायझर किंवा फेसक्रीम आपल्या सुंदर चेहऱ्याला अधिक उजळवण्यासाठी खूप उपयोगी ठरतात आणि सध्याच्या फॅशनच्या जमान्यात त्यांचा भाव बरंच वधारलाय म्हणे!

त्यात जाहिराती आहेतच ,की आपल्याला अधिक भुरळ घालण्यासाठी, याचं सर्व कारणांमुळे सध्या सगळीकडे मॉइश्चरायझर आणि फेसक्रीमची चलती आहे, मुली सोडा, मुलं देखील हे वापरण्यात मागे नाहीत.

पण आपण मॉइश्चरायझर किंवा फेसक्रीम खरेदी करताना एक गोष्ट मात्र साफ विसरतो ते म्हणजे त्याची एक्सपायरी डेट तपासणे! आणि सध्या डिस्काऊंट ऑफरमध्ये फेसक्रीम आणि मॉइश्चरायझरची एक्सपायरी डेट वगैरे कोण बघत बसतंय. यामुळे होतं काय तर  मॉइश्चरायझर किंवा फेसक्रीम एक्सपायरी डेटच्या आत असले तर ठीक, पण नसेल तर त्याचे त्वचेवर उलटे परिणाम होऊ शकतात.

 

face-cream-marathipizza01

 

काही जण तर जण एकाच मॉइश्चरायझर किंवा फेसक्रीमचा दीर्घकाळ वापर  करतात आणि त्याचा परिणाम त्वचेला हानी पोचल्यावर दिसून येतो. एक्सपायर क्रीम किंवा मॉइश्चरायझर्सच्या वापरामुळे तुमच्या त्वचेमध्ये इरिटेशन आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या फेसक्रीमची एक्सपायरी डेट ओळखण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगत आहोत.

काही मॉइश्चरायझर खराब होताना, त्यातून एक विचित्र प्रकारचा दुर्गंध येण्यास सुरुवात होते. जर तुमच्या मॉइश्चरायझरमधून अशाप्रकारची दुर्गंधी येत असल्यास तत्काळ ते फेकून द्यावे.

अनेकवेळा मॉइश्चरायझरचा वापर केल्यानंतरही त्वचा खरबडीत होते. अशावेळी त्या मॉश्चरायझराचा वापर करणे बंद करावे.

 

dry skin inmarathi

 

जर तुमच्या मॉइश्चरायझरमध्ये कणी किंवा दाट होऊ लागल्यास ते खराब झाले असल्याचे समजावे. कारण जेव्हा मॉइश्चरायझर खराब होऊ लागते, तेव्हा त्यातील केमिकल वेगळे होण्यास सुरुवात होते.

सर्वसाधारणपणे कोणतेही मॉइश्चरायझर तुमच्या त्वचेप्रमाणे खरेदी करावे. जर तुम्हाला तुमच्या मॉइश्चरायझरमध्ये ब्लॅक स्पॉट दिसण्यास सुरुवात झाली, तर त्यात बुरशी किंवा बॅक्टेरिया जमा होऊ लागल्याचे समजावे.

मॉइश्चरायझर हे सूर्य प्रकाशात अतिशय संवेदशील असतात. त्यामुळे ते खराब झाले असल्यास सूर्य प्रकाशात ठेवताच त्याचा रंग पिवळा होतो. तेव्हा ब्यूटी प्रोडक्ट हे नेहमी थंड ठिकाणीच ठेवावेत. तसेच तुम्ही कोणतेही स्किन केअर प्रोडक्ट कराल, तेव्हा ते एअर टाइट असल्याची खात्री करून घ्या. तसेच ते सूर्य प्रकाश अथवा गरम वातावरणापासून सुरक्षित जागी ठेवा.

सर्वसाधारणपणे कोणत्याही मॉइश्चरायझर क्रीमची एक्सपायरी डेट ही १८ ते २४ महिन्यांनी असते. त्यामुळे दीड वर्षानंतर तुम्हाला त्याची एक्सपायरी डेट नक्की चेक केली पाहिजे. तसेच तुम्ही कोणतेही क्रीम खरेदी करताना, त्याची एक्सपायरी डेट नक्की तपासा.

यापुढे मॉइश्चरायझर किंवा फेसक्रीम खरेदी करताना आणि वापरताना नक्की काळजी घ्या!

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?