' एकच किडनी असलेलं विचित्र गाव; तुम्हाला ठाऊक नसलेलं दुर्दैवी भयाण सत्य

एकच किडनी असलेलं विचित्र गाव; तुम्हाला ठाऊक नसलेलं दुर्दैवी भयाण सत्य

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

काही देश स्वतंत्र होतात, पण प्रगत होत नाहीत. प्रगत देशाची व्याख्या केली तर त्यामध्ये “जिथे लोकांना उदरनिर्वाहासाठी आरोग्याशी तडजोड करावी लागत नाही” हा एक महत्वाचा मुद्दा सांगता येईल. लोकांच्या आरोग्याची काळजी घेणं हे त्या देशातील सरकारची जबाबदारी असते हे सर्वजण मान्य करतील.

नेपाळ या स्वतंत्र देशातील ‘होक्से’ गावाबद्दल या लेखात सांगत आहोत, जिथे लोकांची काळजी घेण्यासाठी सरकारची स्थापना तर झालेली आहे. पण, तिथल्या स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधी, शेतकरी व्यक्तींसाठी आवश्यक असलेलं खरेदी-विक्रीचं मार्केट उपलब्ध करून देण्यास नेपाळचं सरकार पूर्णपणे अयशस्वी ठरलं आहे हे नुकतंच अधोरेखित झालं आहे.

 

village inmarathi

 

काठमांडूच्या पूर्वेस वसलेल्या होक्से या गावात इतक्या आर्थिक अडचणी आहे की, प्रत्येक कुटुंबातील निदान एका व्यक्तीला जगण्यासाठी आपली किडनी विकावी लागते. होक्से गावाला ‘किडनी वैली’ या नावाने सुद्धा ओळखलं जातं.

हे वाचाताना अंगावर शहारे येतात, तर विचार करा, या गावात राहणारी कुटूंब या दुर्दैवी तरिही सत्य कसं पचवत असतील.

चिखलाने बनवलेल्या विटांच्या घरात इथले लोक रहातात आणि प्रति २ रुपये इतक्या कमी किमतीत इथले मजूर काम करण्यासाठी तयार होतात. ४०० लोकसंख्या असलेल्या या गावातील बहुतांश लोक एकाच किडनीवर जगतात, त्यामुळे होक्से गावात किडनी संबंधित आजार हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

 

kedney 1 inmarathi

 

जागतिक आरोग्य संघटनेने एक पत्रक काढून या गोष्टीवर आपली काळजी व्यक्त केली आहे.

नेपाळी चलनातील २ लाख रुपये इतकी किंमत प्रत्येक व्यक्तीला आपल्या किडनी देण्यासाठी मिळते आणि तो व्यक्ती ती किंमत मिळवून घर बांधतो किंवा जमीन खरेदी करतो आणि पुढचे काही दिवस मजेत जगतो.

 

kedney inmarathi

 

किडनी काढून घेणारे काही लोक हे होक्से गावातील अशिक्षित लोकांना असं सांगतात की, “तुम्ही आम्हाला किडनी द्या आणि तिथे तुम्हाला नवीन किडनी येईल.” अडाणी लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि शस्त्रक्रियेसाठी तयार होतात.

लहान मुलं, वयस्कर माणसं कोणीही या गरिबीचा सामना करण्याच्या प्रथेपासून वाचले नाहीत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, काही लोकांचं अपहरण करून त्यांची किडनी काढून घेतली जाते आणि ती इतर देशात पाच पट किमतीत विकली जाते. कित्येक लोक किडनी विकल्यानंतर चर्चा होऊ नये म्हणून इतरांना सांगत सुद्धा नाहीत.

होक्से गावातील लोकांची परीक्षा इथेच संपत नाही. आर्थिक परिस्थिती सोबतच त्यांना नैसर्गिक आपत्तीला सुद्धा नेहमीच तोंड द्यावं लागतं.

गीता नावाच्या एका ३७ वर्षीय महिलेने एका वर्तमानपत्राशी बोलतांना असं सांगितलं होतं की, ” २०२१ च्या सुरुवातीला मी स्वतःची किडनी विकून आलेल्या २ लाख रुपयात जमीन खरेदी केली आणि तिथे घर बांधलं. पण, एप्रिल महिन्यात त्याच जागेवर भूकंप आला आणि माझं घर पडलं. आता मी परत आधीसारखं तंबूत राहत आहे.”

 

village 1 inmarathi

 

एप्रिल मध्ये आलेल्या भूकंपानंतर होक्से गावासारखी परिस्थिती अजूनही बऱ्याच गावांमध्ये होत आहे असं काही वृत्तवाहिन्यांनी सांगितलं आहे. नेपाळ सरकारने ही परिस्थिती बघून २००७ मध्ये ‘किडनी विक्रीबंदी’ कायदा पास केला आहे. पण, या कायद्याची अंमलबजावणी फक्त ठराविक भागातच होत आहे.

गरिबीला कंटाळून हतबल झालेल्या होक्से या गावातील लोकांना उत्पन्नाचे नवीन साधनं उत्पन्न व्हावेत अशी आपण माणुसकीच्या नात्याने इच्छा व्यक्त करूयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?