'इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये iphones अतिशय महाग का मिळतात?

इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये iphones अतिशय महाग का मिळतात?

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आयफोन तर सगळ्यांनाच हवा असतो, पण मध्ये मांजरीप्रमाणे आडवी येते किंमत! आता कुठे आयफोनच्या किंमती (जुन्या मॉडेलच्या बरं का!) काहीश्या उतरल्यात, तरीही सामान्य माणसासाठी त्या अजूनही त्या ‘स्वस्त’ श्रेणीमध्ये येत नाहीत, कारण आयफोन खरेदी करायचा म्हणजे पूर्ण किंवा अर्ध्या पगाराला तिलांजली द्यावी लागणार हे ठरलेले असतं. त्यात हे दु:ख देखील असते की “इतर देशात आयफोन स्वत मिळतो, पण आपल्या देशात महाग”! आता iPhone 7 आणि iPhone 7 Plus चं उदाहरण घ्या ना, सध्या संपूर्ण जगात भारतातच या दोन फोनच्या किंमती सर्वात जास्त आहेत. म्हणजे इन शॉर्ट आयफोन घेता न येण्याला एकमेव गोष्ट जबाबदार असते ती म्हणजे त्याची भरमसाठ पाच आकडी किंमत! चला तर जाणून घेऊया या आयफोनच्या रग्गड किंमतीमागचे भारतीय अर्थकारण!

iphone-marathipizza01
businesstoday.in

 

कस्टम ड्युटी

भारतात आकारण्यात येणारी कस्टम ड्युटी हि नेहमीच अनेक गोष्टींच्या किंमतीमधील भरमसाठ वाढीस कारणीभूत ठरते. Zauba.com या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, आयफोनच्या एकून किंमतीवर सरकारला देण्यात येणारी इम्पोर्ट ड्युटी ११.४३ टक्के आहे. ही इम्पोर्ट ड्युटी आयफोनची किंमत + शिपिंग आणि हँडलिंग चार्जेस वर आकारण्यात येते.

 

सेन्ट्रल गव्हर्मेन्ट टॅक्सेस

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयफोन आणि त्यासोबतच्या अॅक्सेसरिज या एकाच इम्पोर्ट ड्युटी कोड मध्ये येत नाहीत, म्हणजे आयफोन मॉडेलला वेगळी इम्पोर्ट ड्युटी आकारली जाते आणि चार्जर्स, हेडफोन्स आणि इतर ज्या काही अॅक्सेसरिज आयफोन सोबत येतात, त्यांवर प्रत्येकी वेगळी इम्पोर्ट ड्युटी आकारली जाते. एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या इम्पोर्ट ड्युटीचे सोपस्कार पार पडून आयफोनची किंमत ठरते असं तुम्हाला वाटतं असेल तर तुम्ही चुकताय, कारण यांनतरही आयफोनवर वेगवेगळ्या राज्यामुसार VAT आकाराला जातो. प्रत्येक राज्याचा विचार करता स्मार्टफोन वर सरासरी किमान १२.५% VAT आकारतात.

iphone-marathipizza02
hindustantimes.com

 

स्टेट गव्हर्मेन्ट टॅक्सेस

एवढं देखील पुरेसं नाही म्हणूनच की काय, काही राज्यांमध्ये ऑक्ट्राइ आणि एज्यूकेशनल सीजच्या अतिरक्त भाराची देखील भर पडते. हेच प्रमुख कारण आहे ज्यामुळे आपल्याला प्रत्येक राज्यात आयफोनची किंमत वेगवेगळी असल्याचे आढळते. परिणामी प्रत्येक भारतीय माणूस आयफोनसाठी इतर जगातील नागरिकांपेक्षा वेगवेगळी आणि जास्तच किंमत मोजतो.

 

भारतीय रुपयामधली घट

इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतात आयफोन महाग असण्याचे हे देखील एक प्राथमिक कारण मानले पाहिजे. गेल्या काही काळापासून अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये भारतीय रुपया सातत्याने कोसळत आहे. आयफोनची डॉलर मधील किंमत भारतात रुपयामध्ये रुपांतरीत होते आणि म्हणूनच आपल्या रुपयाची कमी किंमत आय’फोनच्या महाग किंमतीस कारणीभूत ठरते.

खालील इमेज पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल.

iphone-marathipizza03
igeeksblog.com

 

iPhone 6s आणि iPhone 6s Plus च्या वरील विविध मॉडेलचा उदाहरण म्हणून विचार केल्यावर लक्षात येते की, iPhone 6s 16GB मॉडेल अमेरिकेमध्ये 649 डॉलरला, ओस्ट्रेलियामध्ये 1,079 ओस्ट्रेलियन डॉलरला आणि इंग्लंडमध्ये 540 युरोला उपलब्ध आहे. हा किंमतीमधला फरक हे स्पष्ट दर्शवतो की, आपण भारतीय अमेरिकेतील किंमतीपेक्षा 306 डॉलर जास्त देतोय, ओस्ट्रेलियातील किंमतीपेक्षा 231 ओस्ट्रेलियन डॉलर जास्त देतोय आणि इंग्लडमधील किंमतीपेक्षा 80 युरो जास्त देतोय.

तर, हे सर्व घटक आहेत भारतात आयफोनच्या किंमती सर्वात जास्त असण्याला. हा किंमतीमधला फरक तेव्हाच कमी होऊ शकतो, जेव्हा भारतीय सरकार पायघड्या घालून आयफोन निर्मितीला भारतात परवानगी देईल आणि तो दिवसही जास्त दूर नाही असे म्हणायला हरकत नाही, कारण त्या दृष्टीने सरकारने पाउल टाकत Foxconn कंपनीमार्फत भारतात आयफोनचे उत्पादन सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

अधिक माहितीसाठी हे वाचा- खुशखबर: आता भारतात होणार आयफोनचे उत्पादन!

आता मेड इन इंडिया वाला आय’फोन कधी उगवतो ते देवच जाणो, पण एकदा का त्याने मार्केट मध्ये पाउल टाकले की त्याची किंमत अतिशय कमी असणार आहे आणि त्यावर भारतीय विक्रेते तुटून पडतील यात शंकाच नाही. 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?