' गाडीची चावी नाही, तर संजूबाबाच्या हातात पडला चक्क लोकलचा सेकंड क्लासचा पास… – InMarathi

गाडीची चावी नाही, तर संजूबाबाच्या हातात पडला चक्क लोकलचा सेकंड क्लासचा पास…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

हिंदी चित्रपटसृष्टीतील आदरानं घेतली जाणारी नावं म्हणजे सुनिल आणि नर्गिस दत्त. या नावांचा एक दरारा इंडस्ट्रीत कायम राहिला. अगदी विवाहित राज कपूरसोबतचं नर्गिसचं जगप्रसिध्द अफेयरही कधी या नावांभोवती घडलेल्या काळ्या चर्चेचं वलय ठरलं नाही. मात्र या दोघांचा मुलगा संजय दत्त कायमच विवादांच्या भोवर्‍यात राहिला.

संजय दत्तच्या आयुष्यातही सर्वसामान्य मुंबईकरासाखे प्रसंग आले आहेत, हे फार कमी जणांना माहित आहे.

 

sanjay-dutt-inmarathi

 

स्टार किड्स ही संकल्पना अस्तित्वात आलेल्या पिढीतलं एक नाव म्हणजे संजय दत्त! संजय दत्तचे अनेक भले-बुरे किस्से प्रसिध्द आहेत. मात्र त्याचा संघर्ष फार कमीवेळा लोकांसमोर आला आहे. संजय दत्तच्या पिढीत साधारणपणे सिनेमाच्या वेडापायी इंडस्ट्रीत आलेले कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक, गीतकार, निर्माते होते.

गोल्डन ट्रायो मधला राज कपूर जरी स्टार किड असला तरीही त्याला इतरांसारखीच उमेदवारी करावी लागली होतीच. याच पिढीतला सुनिल दत्त नावाचा तरूण हिंदी चित्रपटात आला. पंजाबी खानदानी तेहजीब पुरेपूर असणारा सुनिल कायमच आदराचा विषय ठरला. दत्तसाब म्हणून इंडस्ट्रीत परिचित सुनिल म्हणजे सामाजिक भान असणारा कलाकार होता.

 

sunil dutt inmarathi

नर्गिस आणि राज कपूर यांचं नातं सर्वश्रुत असतानाही एका अपघातानं राज-नर्गिस या प्रेमकथेचा दी एन्ड झाला आणि नर्गिस-सुनिl या दोघांच्या नव्या कथेला सुरवात झाली. हे नातं कधीच सवंग गॉसिपचा विषय बनलं नाही.

सुनिल दत्त या नावाचा करिष्माच असा होता की कोणाची बोट दाखविण्याची हिम्मतच व्हायची नाही.

आयुष्यभर प्रेमाला अधिकृत नात्याची मान्यता मिळावी म्हणून आटापिटा केलेल्या नर्गिसला आदर्श असा जोडीदार मिळाला होता. नंतरच्या आयुष्यात हे जोडपं भारतीय राजकारणात सक्रिय बनलं. तीन अपत्यांपैकी संजय नंतर इंडस्ट्रीत आला. या दोघांच्या अगदी विरुध्द आयुष्य जगलेला संजय दत्त इंडस्ट्रीत आणि बाहेर चाहत्यांतही संजूबाबा म्हणून लाडका झाला.

 

sanju baba inmarathi

 

संजूबाबाचं अंमली पदार्थाच्या आहारी जाणं, त्याचा स्वभाव बघता वाया गेलेला स्टारकिड अशीच त्याची प्रतिमा बनली आहे. बीटाऊनमधल्या उच्चभ्रू कुटुंबातील या मुलाच्या वाट्याला काही संघर्षच आला नसेल किंवा सामान्य मुंबईकर कसा जगतो हे त्याला माहितच नसेल असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की सामान्य मुंबईकरांप्रमाणेच त्यानंही लोकलनं प्रवास केलेला आहे.

शाळा संपल्यानंतर मुंबईतील एल्फिस्टन कॉलेजमधे प्रवेश घेतल्यानंतर संजूबाबाला वाटलं होतं, की आपले वडिल आपल्या दिमतीला कार देतील आणि आपण रुबाबात कॉलेजमधे जाऊ. कॉलेजच्या पहिल्या दिवशी सुनिल दत्तनी संजूबाबाला जवळ बोलवलं. संजूबाबाच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.

त्यावेळी पापा खिशात हात घालून कारची किल्ली काढून हातावर ठेवतील याची त्याला खात्री होती. प्रत्यक्षात मात्र सुनिल दत्तनी संजूबाबाच्या हातावर लोकलचा सेकंडक्लासचा पास आणि थोडे पैसे त्याच्या हातावर टेकवले. हे पाहून संजूबाबा चकीत झाला आणि त्यानं विचारलं, की घरात इतक्या कार असताना लोकलनं प्रवास का करायचा? यावर सुनिल दत्तनी दिलेलं उत्तर कोणत्याही आदर्श पित्याला साजेसं होतं.

 

local trains inmarathi

 

ते म्हणाले होते, की ‘जेव्हा तू स्वत: कमवायला लागशील तेव्हा ही चैन करायची. आधी स्वत:च्या पायावर उभं रहायला शिक’. इतकं सांगून ते थांबले नाहीत तर पुढे त्यांनी कॉलेजला कसं पोहोचायचं हेदेखील सांगितलं.

‘बांद्रा स्टेशनपर्यंत रिक्षानं जा किंवा चालत जा, बांन्द्र्याहून लोकल पकडून चर्चगेटला जा’, वडिलांनी इतकं सविस्तर सांगितल्यावर ते थट्टा करत नाहीयेत, तर खरंच बोलत आहेत हे संजूबाबाच्या लक्षात आलं.

संजूबाबा वडिलांना घाबरून असे त्यामुळे यावर पुढे काही चर्चा करण्याचा प्रश्नच नव्हता. संजूबाबानं गपचूप लोकलचा पास घेतला आणि लोकल पकडली.

संपूर्ण महाविद्यालयीन शिक्षण त्यानं अशा प्रकारे धावत पळत लोकल पकडत, प्रसंगी लोकलला लटकत पूर्ण केलं आहे. कधी पैसे कमी पडले तर रिक्षा, बसची चैन परवडत नसे. अशा वेळेस चालत जाणे हा एकमेव पर्याय असे.

स्टारकिड असला तरीही त्याला सामान्यांच्या संघर्षाची चुणूक दाखविण्याचं पापा सुनिल यांचं कारण हेच होतं, की त्याचे पाय सतत जमिनीवर रहावेत, परिस्थितीचा आदर करता यावा, समोरच्याचा आदर ठेवता यावा.

 

sanjay and suil dutt inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?