' अमेरिकेतील रग्गड पगाराची नोकरी सोडून मराठी तरुण बनलाय 'आयएस ऑफिसर'

अमेरिकेतील रग्गड पगाराची नोकरी सोडून मराठी तरुण बनलाय ‘आयएस ऑफिसर’

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

शाहरुख खानचा स्वदेस काय आला आणि एकाएकी परदेशात स्थायिक झालेले आपले भारतीय लगोलग मातृभूमीत परतले. कोण शेती करू लागला, कोण स्वतःचा व्यवसाय करू लागला. उदरनिर्वाह करता करता काहीजण समाजउपयोगी कामे देखील करू लागले.

अनेकांनी तर आपली करियरची वाट बदलून वेगळ्याच क्षेत्रात आपले नाव कमावले. इंजियरिंग करून मनासारखी नोकरी मिळत नाही म्हणून फूड जॉईन्ट काढले, चहाचे वेगवेगळे प्रकार विकू लागले.

 

anubhav vadhva inmarathi
Startup Stories

 

परदेशात शिक्षणासाठी आज भारतातंतून लाखो विद्यार्थी जात असतात सध्या कोरोनामुळे जरी काही निर्बंध असले तरी त्यातून वाट काढत ते पुढे जात असतात. परदेशात शिक्षण घेऊन भारतात स्थायिक होऊन आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द असणारे फार क्वचितच आढळून येतात.

अशातच एका मराठी मुलाने भरभक्कम पगाराची अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात आला आणि यूपीएस्सीची परीक्षा देऊन दुसरा क्रमांक देखील पटकवला कोण आहे तो मुलगा जाणून घेऊयात…

 

vinayak inmarathi

 

विनायक नरवडे असं तरुणाचं नाव आहे, मूळचा अहमदनगरचा रहिवासी आहे. त्याचे वडील सुद्धा डॉक्टर आहेत. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर विनायकने वडिलांच्या पायावर पाय न ठेवता आपली वाट स्वतः निवडली आणि तो इंजियरिंग करायला पुण्याला गेला. पुण्यात इंजियरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

आज इंजिनियर झाल्यांनतर परदेशात जाऊन एमएस करण्याची प्रथा आहे, त्याच प्रथेला पुढेच नेत विनायकने अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर १ वर्ष नोकरी देखील केली. मात्र यावर न थांबता प्रशासकीय सेवेत जाऊन काहीतरी केले पाहिजे या ध्यासाने अमेरिकेतील नोकरी सोडून विनायक पुन्हा मायदेशात परतला.

मूळचा इंजियनर असल्याने विनायकला अभ्यासाची सवय पहिल्यापासूनच होती. भारतात आल्यावर अभ्यासात प्रचंड मेहनत घेतली आणि जिद्दीच्या जोरावर तो भारततातून २७ तर महाराष्ट्रातून २ येण्याचा मान पटकवला.

 

upsc inmarathi

 

विनायकच्या यशात सर्वात मोठा वाटा आहे तो त्याच्या आईवडिलांचा, त्यांच्या पाठिंब्यामुळे मार्गदर्शनामुळे विनायक यशाची शिखरे पार करत गेला आणि यशस्वी देखील झाला. आपल्या मुलाने देखील डॉक्टर झाले पाहिजे असा कोणताही आग्रह न धरता उलट यूपीएसीच्या परीक्षेसाठी सर्वतोपरी मार्गदर्शन त्यांनी केले.

 

vinayak 2 inmarathi

 

आज खाजगी नोकरीच्या अनिश्चतेमुळे अनेक तरुण सरकारी नोकरीकडे वळत आहेत, तर काही जणांना स्पर्धा परीक्षा देऊन देशाची सेवा करायची आहे. त्यासाठी त्यांची वाट्टेल ते करण्याची तयारी असते. एकवेळ उपाशी राहून पैसे जमा करून पुस्तके घेणारे विद्यार्थी आपल्याला अनेक सापडतील. म्हणूनच आपल्या अंगी चिकाटी, मेहनत घेण्याची तयारी असेल तर यश नक्कीच तुमचे असते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?