' भंगारात विकली गेलेली बाळू मामांची खुर्ची आज लंडनच्या कॅफेत दिमाखात उभी आहे – InMarathi

भंगारात विकली गेलेली बाळू मामांची खुर्ची आज लंडनच्या कॅफेत दिमाखात उभी आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

काही वर्षांपूर्वी बघतोस काय मुजरा कर नावाचा मराठी सिनेमा येऊन गेला होता. त्यातील तीन शिवभक्त तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी थेट इंग्लंड गाठतात आणि आपली भवानी तलवार आणण्याचा घाट घालतात. सिनेमात जरी असे दाखवले असले तरी प्रत्यक्षात मात्र ती आणणे इतक्या सहजासहजी शक्य नाही.

आपल्या देशावर अनेक परकीय आक्रमणे झाली, त्यातील अनेकांनी आपली मंदिरे उद्ध्वस्त केली, लाखो करोडोंचे ऐवज लुटून नेले. आपला कोहिनुर हिरा आज लंडनच्या एका संग्रहालयात ठेवला आहे. जगभरातून लोक तो पाहण्यासाठी येत असतात.

 

kohinoor diamond InMarathi

 

कोहिनुर हिऱ्याप्रमाणेच  सध्या आणखी एक गोष्ट चर्चेत आली आहे ती म्हणजे बाळू लोखंडेंची खुर्ची. आपल्या सगळ्यांच्या व्हाट्सअॅपवर सध्या एकच व्हिडिओ व्हायरल होत आहे तो याच खुर्चीचा…

खुर्ची ही अशी एक गोष्ट आहे ज्यावरून घरातले, ऑफिसमधले आणि राजकारणी एकमेकांशी सतत भांडत असतात. गेल्या दोन वर्षांपासून सत्तेतल्या खुर्चीसाठी राजकीय पक्ष कसे संगीत खुर्ची खेळत आहेत ते आपण उघड्या डोळ्यांनी बघत आहोत. तर बाळू लोखंडेची खुर्ची इंग्लंडपर्यंत पोहचली तरी कशी?

balu inmarathi 1

 

सुनंदन लेले यांनी सोशल मीडियावर या संदर्भातला एक व्हिडिओ पोस्ट करत त्यावर असे कॅप्शन दिले की, ‘ब्रिटिशांनी भारताची लूट केली त्याचा हा ऐतिहासिक पुरावा’. सुनंदन लेले हे क्रीडा पत्रकार आहेत. परदेशात होणाऱ्या सामन्यांचे ते वार्तांकन करत असतात. ते इंग्लंड दौऱ्यावर असताना त्यांना ही खुर्ची मँचेस्टरच्या एका कॉफी शॉपच्या बाहेर दिसली.

 

 

बाळू लोखंडे आहेत तरी कोण?

बाळू लोखंडे सावळज असं त्या खुर्चीवर लिहले आहे. सावळज हे सांगली तालुक्यातील एक गाव जिथं बाळू लोखंडे यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. त्यामुळे साहजिकच त्यांच्याकडे डेकोरेशनचे सामन असणारच.

जसा काळ बदलतो तसे आपणही आणि आपला व्यवसाय ही बदलत जातो. आज प्रत्येकाला काहीतरी वेगळे हवं असत त्यामुळेच बाळू लोखंडे यांनी त्यांच्याकडच्या लोखंडी खुर्च्या भंगारात विकून टाकल्या आणि नव्या प्लास्टिक खुर्च्या वापरू लागले.

 

balu inmarathi 2

 

इंग्लंडपर्यंत खुर्ची कशी पोहचली?

तब्बल १३ किलो इतके वजन असणाऱ्या या लोखंडी खुर्च्या बाळू लोखंडे यांना त्रासदायक वाटू लागल्या तसेच हातळण्यासाठी देखील कठीण होत्या. प्लास्टिकचा जमाना येणार हे लक्षात येताच त्यांनी सगळ्या खुर्च्या भंगारात विकून टाकल्या. आज मुंबईमध्ये सगळा भंगार माल एकत्र केला जातो आणि धनिक मंडळी त्यावर बोली लावून मोठी रक्कम देऊन या वस्तू विकत घेतात.

बाळू लोखंडे यांची खुर्ची अशीच मुंबईमध्ये आली असणार आणि मँचेस्टरच्या कॉफीशॉपच्या मालकाची नजर त्यावर गेली असणार, आपल्या हॉटेलमधील पाहुण्यांना बसण्यासाठी खुर्ची भरभक्कम हवी या हेतूने त्यांनी विकत घेतली असणार असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

e waste inmarathi

पुलंनी देखील आपल्या पाळीव प्राणी या कथाकथनामध्ये एक गमंतीशीर किस्सा सांगितला आहे, ते इंग्लंड दौऱ्यावर गेले असताना तिकडच्या एका प्राणी संग्रहालयाला भेट दिली तिथे त्यांना आपला भारतीय कावळा दिसला. त्या कावळ्याने पुलंना बघून न बघितल्यासारखे केले त्याच्या या कृतीवर ते पुढे म्हणाले, हे म्हणजे भारतीयांनी परदेशात एकमेकांना बघून न ओळख दाखवण्यासारखे आहे.

आज अनेक मराठी तरुण परदेशी लोकांना आपल्या चविष्ट पदार्थाची गोडी लावत आहेत. आज अनके मराठी तरुण सातासमुद्रापलीकडे जाऊन आपले नाव कमावत आहेत. ज्या ब्रिटिश लोकांनी देखील प्रगती केली असली तरी त्यांना आपल्या वस्तू वापरण्याशिवाय गत्यंतर नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?