' अनेकांचं आवडतं Nutella! ज्याचं कनेक्शन आहे थेट महायुद्ध आणि नेपोलियनशी!

अनेकांचं आवडतं Nutella! ज्याचं कनेक्शन आहे थेट महायुद्ध आणि नेपोलियनशी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

खाण्याच्या बाबतीत सर्वांसोबत घडणारी गोष्ट म्हणजे मोकळ्या वेळेत, सहज बसलेले असताना काहीतरी खाण्याची इच्छा होणे. मग घरात काही खायला आहे का हा शोध सुरु होतो? आणि अशा वेळेला घरात न्यूटेला मिळालं तर अनेकांना अत्यंत आनंद होतो. ते न्यूटेला पोळी किंवा ब्रेडला लावून खाल्लं म्हणजे मन आणि पोट तृप्त होतं.

हे न्यूटेला म्हणजे खवय्यांसाठी एक पर्वणीच आहे. काही जण पोळी, ब्रेड सोबत न्यूटेला खातात, तर काहीजण नुसतेच चवीसाठी खातात. न्यूटेला खाणारे कायम असं म्हणतात, की याची कोणाबरोबरच तुलना होऊ शकत नाही. पण जगभरात चाहते असणारं हे न्यूटेला कोणी बनवलं हे माहिती आहे का तुम्हाला?

 

nutella inmarathi

 

चला मग आज तेच जाणून घेऊया, की या अनेकांच्या लाडक्या न्यूटेलाचा जन्म कधी आणि कसा झालाय…

१८०६ मध्ये नेपोलियन बोनापार्टने फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये आपलं स्थान बनवण्यासाठी ब्रिटिश व्यवसाय बंद करण्याचे प्रयत्न सुरु केले, त्यामुळे याकाळात चॉकलेटची किंमत प्रचंड वाढली होती. परंतु त्याही परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी इटलीमधील व्यावसायिकांनी चॉकलेटमध्ये हेझलनट घालण्यास सुरुवात केली.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी…

तशीच काहीशी परिस्थिती १०० वर्षांनी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी आली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी कोकोचा अपुऱ्या पुरवठ्यामुळे न्यूटेलाचा जन्म झाला.

१९४६ मध्ये इटालियन शेफ पिएत्रो फेरेरो याने आपल्या कल्पकतेतून हेझलनट, साखर आणि कोको एकत्र करून एक गोड पदार्थ तयार केला आणि या पदार्थाला त्याने ‘गीआंडूजोत’ हे नाव दिलं. हे नाव त्यावेळेच्या कार्निवल मधील पात्रावरून दिलं गेलं होतं.

 

hazlenut inmarathi

 

जेव्हा न्यूटेला बनवलं गेलं, तेव्हा ते आत्तासारखं ब्रेडवर लावून खाण्यासाठी बनवलं नव्हतं. त्याकाळी ते चॉकलेट केकसारखं होतं आणि दोन ब्रेडच्यामध्ये घालून, सँडविचसारखं खाल्लं जात असे. न्युटेला हे नाव सुद्धा या पदार्थाला १९६४ मध्ये देण्यात आले.

गीआंडूजोतच्या निर्मिती नंतर ते सर्वच लोकांच्या पसंतीस पडलं. आई आपल्या लहान मुलांना ब्रेडवर ते लावून देऊ लागली. परंतु मुलं ब्रेड बाजूला करून फक्त चॉकलेटच खात असत. त्यावर फेरेरोने विचार केला आणि त्याने ब्रेडवर सहजपणे लावता येईल अशा पद्धतीने चॉकलेट क्रिम तयार केलं.

 

nutella on bread inmarathi

न्यूटेलाचा जन्म…

फेरेरो यांचं मूळ गाव हे अल्बा, पिडमॉण्ट होतं. हे गाव हेझलनटच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध होतं. याच हेझलनटचा वापर करून त्यांनी सुरुवातीला चॉकलेट तयार केले आणि नंतर त्यातच चॉकलेटच्या मदतीने मलई प्रकारातील सुपरक्रेमा हा पदार्थ १९५१ मध्ये तयार केला. १९६४ मध्ये पिएत्रो फेरेरो यांच्या मुलाने, मिशल याने पदार्थामध्ये बदल करून त्याला नवीन चव देण्याचा प्रयत्न केला.

यात त्याने एका काचेच्या भांड्यात हेझलनट आणि कोको क्रीमपासून मलई स्वरूपातील चॉकलेट बनवून विकण्यास सुरुवात केली. आणि या पदार्थाला काहीतरी नवीन नाव द्यावे या विचाराने त्याने त्याला न्यूटेला हे नाव दिलं.

यातील एला या नावाचा अर्थ लॅटिन भाषेत गोड असा होतो. नट हा इंग्रजी शब्द युरोपमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी वापरला होता. तेव्हा लोकांना आवडलेला हा नवीन पदार्थ आजही तितकाच आवडत आहे. हा काही लोकांच्या नाश्त्यातील एक महत्वाचा भाग बनला आहे.

 

nutella and bread inmarathi

 

हळूहळू विस्तार झाला

न्यूटेलाने जागतिक बाजारात आपलं खास स्थान मिळवलं. १९६५ मध्ये जर्मन बाजारात स्थान मिळवल्यावर युरोपातील फ्रान्सच्या मार्केटमध्येही त्यांनी न्यूटेला विकण्यास सुरुवात केली. तिथे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. १९७८ मध्ये त्यांनी सिडनी जवळील लिथीगोव येथे न्युटेलाचा प्लांट सुरु केला.

न्युटेला जगभरात इतकं प्रसिद्ध झालं, की त्याच्या चाहत्यांनी २००७ सालापासून ५ फेब्रुवारीचा दिवस ‘वर्ल्ड न्युटेला डे’ असा साजरा करण्यास सुरुवात केली. सारा रोसो या इटालियन – अमेरिकन ब्लॉगर आणि न्यूटेलाच्या चाहत्याने हा दिवस साजरा करण्याची कल्पना मांडली होती.

 

world nutella day inmarathi
timebulletin.com

न्युटेलाची जगभरात इतकी मागणी आहे की प्रत्येक २.५ सेकंदाला १ काचेचा जार विकला जातो. मिशल फेरेरो यांचं जेव्हा निधन झालं तेव्हा ते इटलीचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. आता त्यांचा मुलगा गिओवानी, हे त्यांचा व्यवसाय सांभाळतात.

तर यापुढे जेव्हा तुम्ही ब्रेड सोबत न्युटेला खाण्यासाठी घ्याल तेव्हा त्याचा इतिहास नक्की आठवा. न्यूटेलाच्या जारमधील क्रीमच्या मागे नेपोलियन बोनापार्ट पासून सुरु झालेला प्रवास व्हाया पिएत्रो फेरेरो यांच्या मार्फत तुमच्या जार पर्यंत येऊन थांबला आहे. हे आठवून झालं की मस्त जार मधून भरपूर न्युटेला घ्या आणि ते ब्रेडवर लावून मस्तपैकी त्याचा आनंद लुटा…

 

Napoleon Bonaparte inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?