' सेलिब्रिटींच्या या ७ जोड्या म्हणजे नुसत्याच अफवा की आणखीही (!) काही...!?

सेलिब्रिटींच्या या ७ जोड्या म्हणजे नुसत्याच अफवा की आणखीही (!) काही…!?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

नाते आणि त्यातील गुपित ही तशी वैयक्तिक गोष्ट आहे. त्यातही जर एखादा बॉलीवूड कलाकार त्यात सहभागी असेल तर ते नाते कायम प्रकाशझोतात राहते. हल्ली कलाक्षेत्रातील कलाकार त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या पर्सनल गोष्टींमुळे अधिक चर्चेत असतात. त्यांची जगण्याची स्टाईल, त्यांच्या आवडीनिवडी आणि त्यांची अफेयर्स या विषयांची बरीच चर्चा घडते.

विषय जेव्हा त्यांच्या अफेयर्सचा येतो तेव्हा ही बॉलीवूड कपल्स चाहत्यांना ‘कपल गोल्स’ देत असतात. नात्यांच्या या लपंडावात अनेकांनी चाहत्यांसमोर आपल्या प्रेमाची, आपल्यातल्या नात्याची कबुली दिली तर काहींनी आपली रिलेशनशीप मात्र सीक्रेट ठेवली आहेत आणि त्या नात्याला क्लोज मैत्रीचे नाव दिले आहे.

 

alia ranbir inmarathi

 

तरीही जुन्यांसारखे काही नवीन नेक्स्ट जनरेशन कपल्स आहेत, ज्यांच्या छुप्या नात्याच्या कहाण्या तिखट, मीठ-मसाला लावून सांगितल्या जातात. आपणही अशाच काही फेमस कपल्स बद्दल जाणून घेऊ…

१. टायगर श्रॉफ-दिशा पटनी

बॉलिवूडमधली हिट अँड हॉट जोडी म्हणजे टायगर आणि दिशा यांची! ‘बागी २’ चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर केल्यावर त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चांनी बॉलिवूडमध्ये जोर धरला. त्यांच्या मैत्रीच्या चर्चा रंगू लागल्या.

अनेक इव्हेंटमध्ये, कार्यक्रमांमध्ये, पब्लिक प्लेसमध्ये ते एकत्र दिसतात. पण दोघांनीही आपल्यातील नात्याचा अजूनही खुलासा केलेला नाही. दोघे परस्परांना आपले चांगले मित्र मानतात असेच त्यांचे म्हणणे आहे.

 

tiger shroff disha patani inmarathi

 

२. विकी कौशल-कतरिना कैफ

मध्यंतरी विकिसोबत काम करण्याची इच्छा असल्याचे कतरीनाने संगितले होते. तेव्हापासून तिच्यात आणि विकी कौशलमध्ये काही सुरू असल्याचे बोलले जात आहे.

इतकेच नाही तर एका पुरस्कार सोहळ्यामध्ये विकी कतरीनाशी फ्लर्ट करताना दिसला होता. अनेक कार्यक्रमात ते गुफ्तगू करताना दिसले आहेत. असे असले तरी अजून त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही.

 

vicky kaushal and katrina inmarathi

 

३. आदर जैन-तारा सुतारिया

‘स्टुडंट ऑफ द ईयर २’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यावर तारा सुतारियाचा ‘मरजाँवा’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. करीना कपूरचा भाऊ आदर जैनसोबत ती सध्या रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे.

तारासोबत वेळ घालवायला आणि फिरायला आवडत असल्याचे आदरने एका मुलाखतीत सांगितले होते. अमिताभ बच्चन यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीमध्ये देखील हे दोघे एकत्र दिसले होते.

 

adar jain tara sutaria inmarathi

४. सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा आडवाणी

सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले कपल म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी! दोघांचा मित्र असलेल्या कारण जोहरच्या एका पार्टीमध्ये करणने दोघांची ओळख करून दिली होती. तसेच करण जोहारच्याच एका ‘चॅट शो’मध्ये जेव्हा आलिया भट हिला, सिद्धार्थ मल्होत्राने कोणाला डेट करावे असे विचारले गेले असता तिने कियाराचेच नाव घेतले.

 

siddharth malhotra and kiara advani inmarathi

 

५. के. एल. राहूल- अथैया शेट्टी

क्रिकेट आणि बॉलीवूड हे असेच रोमँटिक कपल आहे. कितीतरी क्रिकेट खेळाडू आणि चित्रपट तारका याधीही लग्नबंधनात अडकल्या आहेत.

अशीच आणखी एक नवी जोडी चर्चेत आहे, लोकेश राहूल आणि आथिया शेट्टी यांची… सध्या या जोडीच्या अफेयरच्या चर्चा रंगत आहेत. याबद्दल अथियाला विचारले असता आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ती काहीही बोलणार नसल्याचे तिने स्पष्ट केले.

 

kl rahul and athiya shetty inmarathi

 

६. रोहन श्रेष्ठ-श्रद्धा कपूर

सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ आणि श्रद्धा कपूर यांच्या अफेयरची चर्चा बर्‍याच दिवसांपासून सुरू आहे. श्रद्धा जरी उघडपणे काही बोलत नसली तरी बर्‍याच वेळा या दोघांना एकत्र पाहिले गेले आहे.

 

shraddha kapoor and rohan shreshtha inmarathi

 

मागे एकदा या दोघांनी टर्कीमध्ये एक फोटोशूट केले होते. तसेच काही जणांच्या म्हणण्यानुसार येत्या वर्षभरात ते लग्न करतील अशी चर्चा आहे.

७. माथीयास बोए -तापसी पन्नू

माथीयास बोए आणि तापसी पन्नू यांच्याही नात्याबद्दल चर्चा सुरु आहे. याचे कारण आहे की तापसीने अलीकडेच स्पष्ट केले आहे की ती बॉलिवूडमधील कोणालाही डेट करणार नाही. तिला बोएबद्दल विचारले असता तिने तो माझ्या जवळच्या लोकांपैकी एक आहे असे संगितले होते.

 

tapasi pannu and mathias boe inmarathi

 

माथीयास बोए हा डेन्मार्कचा बॅडमिंटन खेळाडू असून सध्या भारतीय बॅडमिंटन खेळाडूंना प्रशिक्षण देत आहे.

कोणी काही म्हणो या बॉलीवूड तार्‍यांना आपल्या डेटपार्टनर सोबत मिळून आपल्या चाहत्यांना कपल गोल देण्यातच जास्त रस आहे हे नक्की!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?