' क्रिकेटमधील असे काही गमतीशीर नियम, जे कदाचित तुम्हाला ठाऊकही नसतील… – InMarathi

क्रिकेटमधील असे काही गमतीशीर नियम, जे कदाचित तुम्हाला ठाऊकही नसतील…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लॉकडाऊन नंतर आता क्रिकेटप्रेमींसाठी सुगीचे दिवस आले आहेत असे म्हणता येईल. भारत विरुद्ध इंग्लंड सिरीजनंतर, आता सुरु झालेली आयपीएल त्यांनंतर टी-२० वर्ल्ड कप म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीच आहे.

धोनीची भारतीय संघाचा मेंटॉर म्हणून निवड होणं, कोहलीने टी-२० वर्ल्ड कपनंतर कर्णधारपद सोडण्याची केलेली घोषणा या बातम्यांमुळे आजूबाजूला क्रिकेटची झिंग चढेल असं वातावरण तयार झालं आहे.

 

dhoni ravi and virat inmarathi

 

अशाच या ‘क्रिकेट फिव्हर’च्या वातावरणात, क्रिकेटमधील काही गमतीशीर नियम जाणून घेऊया.

बेल्स शिवाय क्रिकेट खेळणे

तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल, की बॉल स्टम्प्सला लागतो पण बेल्स पडत नाहीत. अशा वेळेला बॅट्समनला नॉट आऊट दिले जाते. पण क्रिकेटमध्ये असाही नियम आहे, की तुम्ही बेल्स शिवाय क्रिकेट खेळू शकता.

२०१७ साली अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिजच्या सामन्यात जोरदार वारा असल्यामुळे बेल्स स्टम्प्सवर टिकणं कठीण झालं होतं. त्यावेळी बेल्स शिवाय सामना खेळण्यात आला.

असाच प्रसंग एकदा २०१९ च्या ऍशेस मालिकेत सुद्धा घडला होता. चौथा सामना चक्क बेल्सशिवाय खेळवला गेला होता.

 

cricket without bails inmarathi

 

कसोटी डाव न खेळणे (Skipping an Innings)

२००० मध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या एका कसोटी सामन्यात असे घडले होते. मुसळधार पावसामुळे सामना बंद करावा लागला.

हॅन्सी क्रोनिए आणि नासिर हुसेन यांनी आपसात चर्चा करून, इंग्लंडचा पहिला डाव आणि दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव स्किप करण्याचा निर्णय घेतला.

 

hansie cronje and naseer hussain inmarathi

 

हा निर्णय घेण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पहिल्या डावात २४८/८ धावा केल्या. इंग्लंडला विजयासाठी २४९ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, ज्याचा त्यांनी दोन विकेट्स राखून पाठलाग केला.

ग्लोव्हजच्या संपर्कात नसेल तर नाबाद

फलंदाज बॅटिंग करताना बॉल ग्लोव्हजला लागून विकेटकीपरने पकडला तर तो फलंदाज बाद मानला जातो. पण यात एक असा नियम आहे की फलंदाजाच्या ग्लोव्हजला बॉल लागला असताना, त्याच्या ग्लोव्हज आणि बॅटचा संपर्क झालेला असला पाहिजे. तसा संपर्क होत नसेल तर फलंदाजाला आऊट देण्यात येत नाही.

 

caught behind inmarathi

 

डेड बॉलचा नियम

बॉल हा क्रिकेट ग्राउंड व्यतिरिक्त कोणत्याही वस्तूला लागला तर तो ‘डेड बॉल’ म्हणून घोषित केला जातो. सामन्यादरम्यान असं अनेक वेळा झालं आहे. बॉल स्पायडर कॅमेराला लागला असला, तरीही तो डेड बॉल घोषित केला जातो.

 

spider camera inmarathi

 

अपील नाही, तर विकेट नाही

एखाद्या विकेटनंतर विरोधी संघाने विकेटसाठी अपील करणे गरजेचे आहे तसे अपील केले नाही, तर पंच फलंदाजाला आऊट घोषित करू शकत नाहीत.

 

rishabh pant appeal inmarathi

 

लेग बिफोर विकेट

नावात ‘लेग’ बिफोर विकेट असं म्हटलं असलं, तरी शरीराचा कुठलाही भाग स्टम्पसमोर आला असेल आणि त्यामुळे बॉल स्टम्पकडे जाण्यापासून रोखला गेला असेल, तर फलंदाजाला लेग बिफोर विकेट म्हणून बाद दिलं जातं.

 

sachin head before wicket inmarathi

खेळातली सद्भावना टिकावी

फलंदाज बाद झाल्यावर, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार अपील मागे घेऊ शकतो परंतु हे केवळ पंचांच्या संमतीने घडू शकतं. अपील मागे घेणं हे खेळाची सद्भावना टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. असं वागणं हे एका उत्तम खेळाडूचे लक्षण आहे.

 

alastair cook with umpires inmarathi

 

पेनल्टी रन्स

जर सामना चालू असताना फलंदाजाने मारलेला चेंडू जमिनीवर ठेवलेल्या विकेट कीपरच्या हेल्मेटला जाऊन लागला तर पेनल्टी घोषित केली जाते. फलंदाजी करणाऱ्या संघाला पेनल्टी म्हणून ५ धावा दिल्या जातात.

 

keeper helmet ball inmarathi

 

डबल बॅट

एखाद्या बॅट्समनला बॉलरने बॉल टाकल्यानंतर एकाच बॉलमध्ये एकापेक्षा जास्त वेळा बॅटने बॉल मारला, तर त्याला बाद ठरवलं जाऊ शकतं. परंतु जर हे अनवधानाने घडलं असेल, तर फलंदाज नॉट आऊट ठरतो.

 

double bat out inmarathi

 

टोपीला लागून उडालेला झेल

जर बॉल पकडताना तो क्षेत्ररक्षकाच्या टोपीला किंवा हेल्मेटला लागून उडाला आणि तो झेल पकडला, तर फलंदाज नॉटआऊट असतो. परंतु बॉल क्षेत्ररक्षकाच्या शरीराला कोणत्याही भागाला लागून नंतर खेळाडूने पकडला, तर तो खेळाडू आऊट मानला जातो.

 

catching a ball inmarathi

 

टाइम आऊट

एक फलंदाज आऊट झाल्यावर, पुढच्या खेळाडूला मैदानावर येण्यासाठी ३ मिनिटांचा कालावधी दिला जातो. या कालावधीपेक्षा जास्त वेळ त्याला लागला, तर त्याला बाद ठरवले जाते. याच नियमामुळे पुढच्या क्रमांकाचा खेळाडू कायम फलंदाजीच्या तयारीत असलेला पाहायला मिळतो.

 

cricket team on field inmarathi

 

क्षेत्ररक्षणात व्यत्यय

क्रिकेटच्या कायद्यातील ३७ कलमानुसार एखादा फलंदाज शब्दाद्वारे किंवा कृतीने विरोधी पक्षाला जाणूनबुजून अडथळा आणत असेल. किंवा कधीकधी विकेट्सच्या दरम्यान धावताना, एखादा फलंदाज स्टम्प्सच्यामध्ये जाऊन बॉल रोखण्याचा प्रयत्न करत असेल. असे झाल्यास, फलंदाजाला या नियमांतर्गत पंच आऊट घोषित करू शकतो.

 

obstructing the field inmarathi

 

या सगळ्या गंमतीशीर नियमांमुळे तुम्हाला पुढील सामने पाहताना अजून मजा येईल. तुमच्या क्रिकेटप्रेमी मित्र मैत्रिणींना या नियमांमुळे एखादा खेळाडू कसा आऊट होतो किंवा आऊट होत नाही हे सांगू शकता. मग लेख कसा वाटला ते नक्की कळवा. आणि तुमच्या क्रिकेटप्रेमी मित्रांसह शेअर सुद्धा नक्की करा.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?